सप्तम स्कंध - अध्याय सातवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । व्यासम्हणेनृपती । एवंदशातयाप्रती । तवपातलादक्षिणार्थी । विश्वामित्रकोपिष्ट ॥१॥

नृपापाहूनमूर्छित । शीतलजलेंसिंचित । नृपझालासचेत । विश्वामित्रपाहिला ॥२॥

पुन्हाहोयमूर्छित । मुनितयाआश्वासित । कोपेंनृपासिबोलत । सत्वरदेईदक्षणा ॥३॥

माथाअसतांऋण । नित्यदुःखाचेंवर्धन । त्वरितकीजेऋणदान । सत्यजरीसंभाळणें ॥४॥

सत्येंसूर्यप्रकाशत । सत्येंचिवाहेमारुत । सत्येंचिधारणकरीत । धरासर्वांनृपाळा ॥५॥

सत्येंधर्मसत्येंकर्म । सत्येंचिसाधेदुर्गम । सत्यरक्षितांसर्वसुगम । भोगमोक्षसत्येंची ॥६॥

ताजव्यामाजीठेऊन । सत्यपाहिलेंमापुन । सहस्रराजसूयाहून । भारीभरलेंसत्यहें ॥७॥

असोमजकायकरणें । दक्षणामाझीतूर्णदेणें । सायंकाळहोताजाणें । अवश्यशापदेईनमी ॥८॥

एवंनिष्ठुरबोलेमुनी । सवेंचगेलानिघूनि । तवएकविप्रकोणी । शिष्यासहनिघाला ॥९॥

पाहूनितयातेसती । बोलेतेव्हांनृपाप्रती । स्वामीविप्र आम्हांप्रती । मायबापतुल्यते ॥१०॥

मायबापाचेंघेतांधन । कायदोषपुत्रालागुन । करावेंयासीयाचन । धनार्थवाटेमममनी ॥११॥

नृपम्हणेशिवशिव । यांचानकरीहाजीव । विप्रधर्मयांचाभाव । परधर्मनकरावा ॥१२॥

ब्राम्हणसर्वांतथोरु । ब्राम्हणवर्णांचागुरु । तयासीनयांचाकरुं । कदांकाळीजाणिजे ॥१३॥

यजनाध्ययनदान । शरणांगताचेंपालन । प्रजेचेंसदारक्षण । हेंचिकर्म आमुचें ॥१४॥

देईन ऐसीवाणी । ठसावलीदृढपणी । द्याऐसेंनिर्लज्जपणी । केवींवदूंसांप्रत ॥१५॥

श्लोक ॥ कालसमविषमकरः परिभवसन्मानमानदःकालः । कालःकरोतिपुरुषंदातारंयाचितांरच ॥२॥

अर्थ । पत्नीम्हणेभूपती । कालसमविषमगती । मानापमाननराप्रती । कालसर्वकरीतसे ॥१६॥

कालचसदानराशी । करीदातायाचकाशी । विश्वामित्रज्ञानराशी । दुःखदझालाकालयोगें ॥१७॥

नृपम्हणेहोकांते । खड्गेंतोडितांशिराते । देहींवाक्यजिभेवरती । धरवेनाकदापी ॥१८॥

स्त्रीम्हणेजरीयाचना । नावडेस्वामीचेंमना । न्यायेमीअंगना । देवसाक्षित्वेंतुमची ॥१९॥

करायामजशासन । अथवाकरायारक्षण । अधिकार असेपूर्ण । सर्वयोगेंमजवरी ॥२०॥

द्यूत अथवामद्यपान । भोगार्थनसेआचरण । गुरुदक्षणेकारण । विक्रयमाझाकरावा ॥२१॥

नजरीदिधलेंधन । मुनीशापीलकोपून । नीचत्वयेईलम्हणून । त्वराकीजेविक्रयीं ॥२२॥

कष्टकष्टम्हणेनृपती । निर्दयदुष्टपापमती । जेंनकरीकल्पांती । आचरीतोंनिंद्यतें ॥२३॥

निष्टुरवाक्यबोलसी । वाणीजरीशोभविसी । विकीतोंआतांतुजसी । धिग्धिग्धिगहाजन्म ॥२४॥

एवंबोलोनिनगरी । नृपवेगेंप्रवेशकरी । उभीकेलीबाजारी । भार्यातेव्हांनृपोत्तमें ॥२५॥

नेत्रींवाहतीजलधारा । सदगदकंठस्वरोच्चारा । नबोलवेंतरीकरीधीरा । बोलेंतेव्हांदुस्तर ॥२६॥

प्राणप्रियाममकामिनी । विक्रयकरणेंमममनी । ऐकावेंहोनगरजनीं । घ्यावीजरीअसेइच्छा ॥२७॥

दासीभावेंजरीघेईजे । मूल्य इचेंदेईजे । सुखेंस्वगृहांनेइजे । धनार्थीमीनृशंस ॥२८॥

ऐकूनिवाक्यपंडित । तूंकोणपत्नीवीकित । विचारितांनृपबोलत । कायपुसतांमजलागी ॥२९॥

मनुष्यनसेमीनृशंस । अथवाआहेराक्षस । कठिणनजाणेंदयेस । पापतेणेंआचरितों ॥३०॥

वृद्धविप्रहोऊनी । आलाविश्वामित्रमुनी । म्हणेघेतोंइजलागुनी । बहूधनिकमीअसे ॥३१॥

स्त्रीमाझीसुकुमार । गृहकृत्यांदुःखफार । दासीदेमजसाचार । कितीधनपाहिजे ॥३२॥

वाक्यतयाचेऐकून । लज्जाआणिदुःखेंकरुन । नबोलेकांहींचवचन । पुनःविप्रबोलतसे ॥३३॥

कर्मरुपवयशील । तवस्त्रीचेंजेंअसेल । घेइतैसेचितूंमोल । देईमजदासीहे ॥३४॥

श्लोक ॥ द्वात्रिंशल्लक्षणोपेतादक्षाशीलगुणान्विता । कोटिमौल्यसुवर्णस्यस्त्रियः पुंसस्तथार्बुदं ॥३॥

अर्थ ॥ मौल्यद्रव्यप्रमाण । धर्मशास्त्रींअसेंवर्णन । जरीअसतीबत्तीसलक्षण । स्त्रीपुरुषामाझारी ॥३५॥

चतुरस्वभावसुंदर । गुणजरीमनोहर । एककोटीस्वर्णभार । अर्बुदस्वर्णपुरुषाचे ॥३६॥

नबोलेकांहींनृपती । विप्रेंद्रव्यठेउनीक्षिती । केशीधरुनीमहासती । ओढिलीबळेंनिर्घुणे ॥३७॥

सोडिसोडीद्विजवरा । बाळपाहूंदेसत्वरा । बाळापाहेसकुमारा । माताझालीदासीही ॥३८॥

पाहूनिरडेरोहित । आईम्हणोनिधांवत । तीम्हणेबाळामजप्रत । शिवूंनकोतान्हया ॥३९॥

तरीनायकेरोहित । आलावेगेंरडतपडत । मातेचापदरओढित । आकांतकरीएकसरे ॥४०॥

विप्रबाळाताडणकरी । नायकेतोपरोपरी । बाळघ्याम्हणेकृशोदरी । द्विजनृपाविकीम्हणें ॥४१॥

विनामुलावांचून । कार्यनसाधे एकटीन । मजवरीकृपाकरुन । बाळघ्याजीम्हणतसें ॥४२॥

विप्रेंपुनःअर्बुदधन । नृपापुढेंठेऊन । मातापुत्राचेबंधन । एकजागींकरीतसे ॥४३॥

निघालाद्विजहर्षेंघरी । उजवेघेईंनृपानारी । गुडघेटेकूनिनमस्कारी । वाक्यतेव्हांबोलतसे ॥४४॥

जरीकेलेंअसेलदान । जरीकेलेंअसेंहवन । जरीदिलेंविप्राभोजन । सेविलीजरीअंबिका ॥४५॥

त्यापुण्येंपुनर्भवी । हरिश्चंद्र असोपतिभावी । वंदोनिचरणीसदभावी । लोटलीतीभर्त्याच्या ॥४६॥

प्राणप्रियादेखेंचरणी । हाहावदेत्याचीवाणी । केवीझालीभिंनराणी । सत्यवतीसात्विका ॥४७॥

जड असेवृक्षजाती । तोहीनसोडीछायेप्रती । संबंध असूननिश्चिती । दुरावलादुर्दैवें ॥४८॥

मजटाकुनीबाळा । कोठेंजासीवेल्हाळा । कोठेंजाऊंयेवेळां । निवारीलकोणदुःख ॥४९॥

राज्यत्यागवनींवास । नझालाकारणदुःखास । नसाहेपुत्रविरहास । स्त्रीवियोगदारुण ॥५०॥

लोकामाजीऐसीस्थिती । भार्याभोगीस्वपती । म्याविकूनदुज्याहाती । दिधलीतुजपतीव्रते ॥५१॥

इक्ष्वाकुवंशपावन । पतीमजसीपावून । दासीझालीसदैवान । उपायकायप्रारब्धा ॥५२॥

बुडालोशोकसागरी । काढीकोणयेअवसरी । एवंविलपेवैखरी । नृपाळाचिदुःखभरें ॥५३॥

व्यासम्हणेजन्मेजया । विश्वामित्राकैंचीदया । चाबुकेंतीसहाणूनिया । नृपासमक्षओढीतसे ॥५४॥

नेतापाहिलीपुत्रनारी । नृपरडेविलापकरी । उष्णश्वासदुःखभरी । सोडूनम्हणेनृपाळ ॥५५॥

जियेचेंमुखदर्शन । दुर्लभ असेमहज्जन । नस्पर्शेजीसप्रभंजन । सूर्यचंद्रनदेखती ॥५६॥

तीआजसुलोचना । कशाघातकरीसहना । सुकुमारबाळताडना । योग्य असेंकींयेसमईं ॥५७॥

ऐसेंम्याडोळादेखिलें । तरीप्राणनाहींगेलें । धिग्धिघजन्मव्यर्थगेले । हाहःकारनृपकरी ॥५८॥

वृक्षगृहादिघेऊन । स्त्रीपुत्रासहब्राम्हण । पाहतांनृपेंगुप्तजाण । विश्वामित्रजाहला ॥५९॥

स्वयेंतोचिमहामुनी । नृपासमीपयेउनी । बोलेतेव्हांकठोरवचनी । दक्षणादेम्हणतसे ॥६०॥

घ्यावीगुरोदक्षिणा । रावकरीप्रार्थना । तोह्मणेत्रिशंकूनंदना । केवींद्रव्यसंपादिलें ॥६१॥

नृपह्मणेयावाचून । कायस्वामीप्रयोजन । सांगतांऐकतांकारण । दुःखहोयमानसी ॥६२॥

कौशिकह्मणेअशस्त । द्रव्यनघेमीनिश्चित । द्रव्यदेमजप्रशस्त । कोठून आणिलेंवदावें ॥६३॥

नृपसांगेस्त्रीपुत्र । विकुनियाद्रव्यपवित्र । येऊनियासत्पात्र । विप्रेनेलीस्त्रीपुते ॥६४॥

सर्वस्वाचीअडीचभार । दक्षिणाघेकृपाकर । उरलेंद्रव्यजेवर । राजसूयदक्षणाते ॥६५॥

ऋषीसीसांगेसूत । द्रव्यपाहुनीगाधिसुत । थोडेह्मणेनृपाप्रत । कोपेंखवळेतयावरी ॥६६॥

आणीककीजेंउत्पन्न । जेणेंदक्षणाहोयपूर्ण । जरीमानिशीहीचपूर्ण । क्षत्रियधमामगपाहे ॥६७॥

तपकेवींमाझेअसें । पराक्रमतुजसीदिसे । वेदाध्ययनसांगतसे । दाखवीनतपोबल ॥६८॥

नृपह्मणेभगवन्न । आणीकद्रव्येदेईन । जरीअवकाशलाभेन । स्वामीकृपेंथोडासा ॥६९॥

चौथाभाग उरलादिन । तोचितूंअवकाशजाण । नवदेकांहींयाहून । मजलागीहरिश्चंद्रा ॥७०॥

एवंभूपादटाऊनी । द्रव्यसर्वघेऊनी । निघूनगेलामहामुनी । कौशिकेंद्रनृपाळा ॥७१॥

जातांचितेथोनीकौशिक । नृपकरीबहूशोक । करुनियाअधोमुख । उच्चस्वरेंबोलिला ॥७२॥

प्रेमतुल्यघेऊनमजसी । कार्यजरीसाधेत्यासी । तेणेंत्वरेमममौल्यासी । देऊनियादासघ्यावा ॥७३॥

शब्दासरिसातात्काळ । स्वयेधर्म उतावेळ । रुपकेलेंअमंगळ । चांडाळरुपेंपातला ॥७४॥

दुर्गंधयुक्तशरीर । वाकडेंसदाअंतर । दाढीमिशाभयंकर । दांतदिसतीबाहेरी ॥७५॥

निर्दयकाळालंबोदर । स्वेदेंभिजलेशरीर । पुरुषाधमतोभ्यासुर । परीक्षार्थपातला ॥७६॥

हातींअसेसडकीकाठी । शवमाळापडल्याकंठी । शवकंथावेष्टिलीकटी । नामकेलेप्रवीर ॥७७॥

मजहवाह्मणेदास । देतोंमीतवमूल्यास । सत्वरसांगद्रव्यास । कितीवांछिसीयेवेळी ॥७८॥

व्यासम्हणेनृपती । नृपेंपाहूनदुष्टाकृती । विचारिलेंतयाप्रती । अससीकोणम्हणुया ॥७९॥

तोम्हणेमीचांडाळ । नृपोत्तमाजाणकेवळ । जाणतीयेथेंमजसकळ । प्रवीरम्हणतीमजलगी ॥८०॥

होवोनिमम आज्ञांकित । तत्पर असावेंसेवेत । प्रेतेंजीयेतीलनित्य । वस्त्रेंत्यांचीआणावी ॥८१॥

क्षत्रिय अथवाब्राम्हण । घेवोसुखेंमजकारण । उत्तममध्यम अधमवर्ण । सुखप्रदज्याचात्यासीं ॥८२॥

धर्मशास्त्राचेंप्रमाण । द्विद्वाक्यहेंचिजाण । धर्माचेनसो उल्लंघन । एवमेवनृपबोले ॥८३॥

चांडाळम्हणेभूपती । धर्महाचनिश्चिति । अविचारेंमजप्रती । येवेळींवदतोस ॥८४॥

बोलेजोकरुनिविचार । त्याचासाधेधर्माचार । सामान्यबोलिलासीक्रूर । जोइच्छीतोघेवो ॥८५॥

वाक्यजरीसत्य असें । निश्चयेमीघेतलेसे । द्रव्यवदेजेंमानसें । लक्षिलेंअसेंस्वमौल्य ॥८६॥

नृपम्हणेनकोअनृत । नर्कजेणेंप्राप्तहोत । त्याहुनबरेंचांडाळत्व । सत्यरक्षणमुख्यत्वें ॥८७॥

एवंजवबोलती । मुनीआलाक्रोधमूर्ति । देतोचांडालधनाप्रति । कांनदेसीदक्षणा ॥८८॥

नृपम्हणेंसूर्यवंश । नृप असेमीक्षत्रियेश । केवीसेवूंचांडाळास । चंडाळकैंसामीहोऊं ॥८९॥

विप्रम्हणेनृपासी । चांडाळातनूनदेशी । तद्धनेंममदक्षिणेसी । नदेतांशापीनतुज ॥९०॥

चांडाळ अथवाब्राम्हण । अथवाअसोअन्यकोण । दक्षिणेचेंप्रयोजन । असेंनृपामजलागी ॥९१॥

विनाचांडाळावांचून । कोणीतुजनघेअन्य । नजायमीदक्षिणेवांचून । निश्चयेंजाणनृपाळा ॥९२॥

नदेसीजरीममधन । अर्धघटिकाराहतांदिन । करीनतुझेंदहन । शापनळेंकरोनिया ॥९३॥

हरिश्चंद्र अतिदुःखित । प्राणमात्रेतोतिष्ठत । मुनिपदींशरणांगत । लोळूलागलाशापभयें ॥९४॥

मुनेआतांव्हांप्रसन्न । अतिदुःखिझालोंदीन । प्रसादमजवरीकरुन । द्रव्यशेषेंदासकरी ॥९५॥

होईनतुझासेवक । नोल्लंघीनकदांवाक्य । येवढेंमाझेंऋषेऐक । चंडाळसेवनकष्टहे ॥९६॥

द्रवलाकिंचितमुनिवर । तथास्तूहोममकिंकर । जेंमीवदेनतेंनिरंतर । अनुत्तरेंआचरावें ॥९७॥

ऐकतांनृपतोषला । मानींस्वयेंपुनर्जन्माला । वंदूनिऋषीशीवदला । आज्ञापावेदासासी ॥९८॥

जेंनृपेंनाकारलें । विश्वामित्रेंतेंचिकेले । स्वयेंचांडाळासीबोले । दासमाझाविकणेमज ॥९९॥

दासकार्यमजनसे । धन इच्छामनीवसे । मौल्यधनकायसे । देतोंसीसांगमजलागी ॥१००॥

चांडाळ अतिआनंदून । मुनीचेसमीपयेउन । म्हणेबहुतदेतोंधन । अवश्यदास इच्छितो ॥१०१॥

प्रयागभूमीदशयोजन । देतोंरत्नमयकरुन । दासदीजेमजलागुन । मुनिश्रेष्ठातपोधना ॥१०२॥

व्यासम्हणे एवंवदोन । अपारदिधलेंतेणेंधन । नृपाझालेंसमाधान । प्रसन्नपाहतांमुनीशी ॥१०३॥

नृपधैर्यकरीमनी । आपलास्वामीहाचिमुनी । करितांम्याऋषिवाणी । नस्पर्शेकदादोंष ॥१०४॥

एवंनृपम्हणेमनी । तवझालीआकाशवाणी । धन्यनृपापुरलीधणी । जाहलासीअनृण ॥१०५॥

स्वर्गीदुंदुभीवाजती । पुष्पवृष्टीनृपावर्ती । आनंदेंदेवकर्ती । धन्यम्हणतीसुरासुर ॥१०६॥

सत्यस्वरुप असेंकेवीं । तेंनपवर्यदाखवीं । निश्चयाचीथोरवी । प्रत्ययनृपाएवं असें ॥१०७॥

धर्मरक्षणएवंकीजे । सत्यएवंपाळिजे । दुःखजैंसहनकरिजे । तरीचजगीधन्यता ॥१०८॥

नृपम्हणेकौशिका । मातापिताबंधूसखा । तूंचिसर्वहरिलेंदुःखा । आज्ञाकरीमजलागी ॥१०९॥

तयासीबोलेमुनी । ममाज्ञेनेंआजपासुनी । चांडाळाचेराहेवचनी । अव्हेरसर्वथानकीजे ॥११०॥

तुझेंअसोकल्याण । सतुष्टझालोंआपण । ऐसेंनृपासीबोलुन । धनघेऊनीमुनीगेला ॥१११॥

एकोनविंशोत्तरपद्यशत । दिव्यदेवीभागवत । हरिश्चंद्राख्यानवर्णित । प्राकृतेंयेथेंपरांबा ॥११२॥

देवीविजयेसप्तमेसप्तमः ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP