सप्तम स्कंध - अध्याय नववा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । नृपपुसेव्यासाप्रती । शताक्षीनामदेवीप्रती । कायकारणेनिश्चिति । पडलेसांगऋषेश्वरा ॥१॥
व्याससांगेकथासुरस । शताक्षीचरित्रंविशेष । ऐकतांहोयपापनाश । धनधान्यसमृद्धी ॥२॥
हिरण्याक्षाचेवंशात । दुर्गमनामेंविख्यात । बलिष्टजाहलातोदैत्य । ब्रम्हवरेकरुनिया ॥३॥
तेणेंहिमाचलीजाऊन । तपकेलेंदारुण । सहस्रवर्षेंसपूर्ण । वायुभक्षणेकरुनिया ॥४॥
ब्रम्हाजाहलाप्रन्न । मागम्हणेवरदान । वेदमागीतलेतेण । बल अपार असावें ॥५॥
इच्छिततयादेउनी । ब्रम्हागेलास्वभुवनी । विस्मरणझालेतैपासूनी । ब्राम्हणासीवेदाचे ॥६॥
स्नानसंध्यानित्यकर्म । राहिलेयज्ञयागादिधर्म । सर्वलोपेअनर्थपरम । पृथ्वीमाजीजाहला ॥७॥
कायहेंकायहेंझाले । वेदकेवींबुडालें । एवंविप्रघाबरले । नसुचेकांहींकोणाशीं ॥८॥
निर्जरझालेसजर । युद्धापातलाअसुर । पळालेसर्वहीसुर । युद्धाशक्तीनसेची ॥९॥
गिरींगव्हरींदडालें । आसुरभयेव्यापिले । तेव्हांमानसींस्तविले । श्रीदेवीसीदेवानी ॥१०॥
नाहोमनायजन । तेणेंजाहलेंआवर्षण । शतवर्षेंदारुण । प्रजासर्वनाशिली ॥११॥
गोमहिषीपशूनर । मृत्यूवशझालेअपार । शवदुर्गंधघरोघर । जाहलेजाणनृपाळा ॥१२॥
शांतचित्तजेब्राम्हण । केलेंदेवीआराधन । समाधिध्यानपूजन । निराहारेआरंभिले ॥१३॥
देवीशींझालेशरण । करितीमातेचेंस्तवन । अंबेआम्हींपामरजन । उपेक्षूनकोसर्वथा ॥१४॥
तूंचिकेलेसिनिर्माण । यावरीकायकोपून । कारणतूंचिकार्यखूण । प्रेरकतूंचिसर्वांतरीं ॥१५॥
श्रीपरांबेवांचूनि । गतीकायसर्वजनीं । मातेजगतारिणी । पोषणकरीआमुचे ॥१६॥
आतांव्हावेंप्रसन्न । आम्हींआलोंतुजशरण । आतांकाय उपेक्षून । प्राप्तहोईलतुजलागी ॥१७॥
अनंतब्रम्हांडकोटी । असतींमातेंतवपोटीं । नमस्कार अनंतकोटी । असोत आमुचेपरांबे ॥१८॥
बीजाचेहिबीजांतरी । वससीमातेचिदाकारी । उपनिषदाचीचातुरी । नचलेतुजवर्णाया ॥१९॥
सर्वभुवनाचिचालक । पालक आणिसंहारक । भुवनेश्वरीतूंचिएक । नमस्कारतुजलागी ॥२०॥
सर्ववेदतूजशोधिती । तरीतेपारनपवती । तेव्हांगर्जोनिबोभाती । हेंहीनाहींनाहींहें ॥२१॥
वाक्यवदतीजैंऐसें । सर्वांठाईतीचदिसें । नाहींऐसेंवाक्यनासे । आहेम्हणतांगवसेना ॥२२॥
ऐसीतूंअतर्कगती । वेदहीतुजनेणती । केवीस्तविजेतीशक्ती । नमस्कार असोतुज ॥२३॥
व्यासम्हणेनृपती । ऐकतांचीएवंभगवती । अनंतनेत्रेपार्वती । रुपदाखवीआपुले ॥२४॥
जेवींकज्जलपर्वत । शरीरतेवींअतिकांत । नीलपद्मापरीशोभत । नेत्रकमळेंजियेची ॥२५॥
कर्कशसमतैसेंवृत । स्तनद्वयविराजित । चतुर्भुजादेवीशोभत । बाणमुष्टीविराजे ॥२६॥
दुजेहातींफुल्लकमल । तिजेहातींमूलफल । अनेकरसस्वादुल । क्षुधातृषाशामकते ॥२७॥
धनुष्यशोभेचौथेहातीं कोटिसूर्याचितीदीप्ती । साक्षात् तीकारुण्यमूर्ती । प्रगटझालीदयेने ॥२८॥
अनंतनयनतेजाळ । शक्तिरुप अतिविशाळ । जगद्धात्रीचकेवळ । नेत्रींस्रवेंवारिधारा ॥२९॥
दुःखिपाहुनिलोकसकळ । स्रवलीसर्वनेत्रीजळ । औषधीवनस्पतीसकळ । प्रफुल्लितजाहल्या ॥३०॥
नदीनदवापीतडाग । पूर्णझालेसवेग । दोषदुष्काळदुर्भाग्य । नष्टझालेक्षणार्धे ॥३१॥
देव आलेबाहेर । मिळालेसर्वमुनिवर । स्तविलीतीदयासागर । करुणालहरीशताक्षी ॥३२॥
वेदांतेचचतुजजाणिजे । ब्रम्हरुपकेविवर्णिजे । स्वमायेचिसर्वकाजे । सहजसाधिशीभक्ताची ॥३३॥
भक्तकामकल्पतरु । भक्तार्थतवशरीर । नित्यतृप्तनिर्धारु । निरुपमरुपहे ॥३४॥
आमुचीकरायाशांती । सहस्रनेत्रतुजप्रती । शताक्षीनामत्रिजगती । विख्याततुझसदाअसो ॥३५॥
क्षुधेनेजाहलोपीडित । स्तुतीहीनाहींकरवत । वेददेईपूर्ववत । दैत्यसंहारकरुनिया ॥३६॥
व्यासम्हणतीभूपती । ऐकताचिवाक्यभगवती । फलमूलादिसर्वांप्रती । देतीझालीपरांबा ॥३७॥
अनेकसरस अनेक अन्न । दीधलेसर्वांलागून । पशूलागीकोमळतृण । देतीझालीजननीती ॥३८॥
आब्रम्हकीटपर्यंत । क्षर्णोंधतृप्तकरीत । कोलाहल ऐकूनित्वरित । दुर्गम आलायुद्धासी ॥३९॥
सहस्रसंख्याअक्षौहीणी । असेत्याचीदैत्यवाहिनी । शस्त्रास्त्रोंसज्जहोऊनी । देवीवरीधाविंनला ॥४०॥
श्रीपरांबेसमोर । उभेमुनीसुरवर । तयासींरोधीतोअसुर । शस्त्रवृष्टीकरीतसे ॥४१॥
तेव्हांझालाकोलाहल । घाबरलेदेवऋषीसकळ । त्राहीरक्षीयेवेळ । आईअंबेआम्हांसी ॥४२॥
शब्दत्यांचाऐकून । तेजोमयकेलेंसुदर्शन । देवमुनीचेचहुकडून । रक्षणार्थनिर्मिलें ॥४३॥
स्वयेचक्राचेबाहेर । उभीराहेसुस्थिर । असुराचीशस्त्रेंअपार । लीलामात्रेंनाशिली ॥४४॥
स्वयेवर्षेबाणजाल । नासिलेदैत्याचेबल । दहादिवस अतितुमुल । युद्धझालेंअतिशये ॥४५॥
देवीचेशरीरांतून । शक्तीझाल्याउत्पन्न । एकबत्तिसाचागण । चौसष्टगण अन्यही ॥४६॥
आणिकहीअसंख्यात । शक्तीनिघाल्याअदभुत । वर्णिलेयेथेंकिंचित । विस्तारवर्णन अन्यस्थळी ॥४७॥
कालीतारारमाबाला । छिन्नाभैरवीश्यामाबगला । भैरवीत्रिपुरासुंदरीमाला । तुलजाआणिकामाक्षी ॥४८॥
जंभिनीमोहिनीहारिणी । गुह्यकालीघोररुपिणी । सहस्रभुजाशूलिनी । प्रगटझाल्याअनेक ॥४९॥
मृदंगवीणापटहद । कर्णेंशींगेंभेरीस्वर । वाजवितीवाद्येंअपार । युद्धोत्सवशिंक्त्यात्या ॥५०॥
दैत्यसैन्याअग्रेसर । पुढेंराहेदुर्गमासुर । युद्धझालेंमहाघोर । दशरात्रींदिवसही ॥५१॥
सैन्यसर्वनाशिलें । दुर्गमेंजेव्हांपाहिले । एकादशदिनीवाहिले । युद्धाआलास्वयेची ॥५२॥
रक्तमाळारक्तवसन । लाविलासेरक्तचंदन । शस्त्रास्त्रेशिसिद्धहोऊन । महारथीबैसला ॥५३॥
येउनिशताक्षीसमोर । युद्धकेलेदोनप्रहार । अतित्रासदभयंकर । पराक्रमीदुर्गमतो ॥५४॥
देवीतेव्हांपंधराबाण । टाकितिझालीमहातीक्ष्ण । चारीअश्वांचारबाण । एकशरसारथ्या ॥५५॥
दोननयनींशरदोन । उभयबाहूमाजीदोन । ध्वजपाडावयाएकबाण । पांचबाणह्रदयांतरी ॥५६॥
रक्ताचीकरीओकारी । मरुनपडलापृथ्वीवरी । तेजत्याचेदेवीशरीरीं । प्रवेशलेंतत्काळ ॥५७॥
सायुज्यतयालाभले । विश्वसर्वशांतझाले । हरिहरब्रह्मादिआले । देवसर्वस्तवाया ॥५८॥
जगतामाजीभ्रमपटला । रुपतुझेंचीतेजाळ । सकळाचेंआदिमूळ । तूंचितुजनमोस्तु ॥५९॥
शोकायोगेंभरणकेले । जगतसर्वरक्षिलें । शाकंभरीनामशोभलें । तुजलागीनमोस्तु ॥६०॥
इतिश्रीदेवीविजयेसप्तमेनवमः ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP