मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|चौचरणी वोव्या| रामपाईं दास कल्याण जहाले चौचरणी वोव्या रामनामकथा पांगुळ मी देवा रामपाईं दास कल्याण जहाले माझ्या स्वामींचे वचन गुरुकृपा चौचरणी वोव्या - रामपाईं दास कल्याण जहाले ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगओवीकल्याण बाडांक ५२ वरून Translation - भाषांतर गणिका अजामेळ पातकाचा मेळ । विमानीं तत्काळ वाईला ॥१॥वाईले पुत्र माहारी अंतुरी । तया विष्णूपुरी दाखवीली ॥२॥कुंटणी पिंगळा पापी अमंगळा । शुकमीसें हेळा उद्धरली ॥३॥गजेंद्र सावजे धरियेला जळीं । तयासी तत्काळीं उद्धरीले ॥४॥भृशंडी काउळा उद्धरिला हेळा । बाळपणीं लिळा दाखवीली ॥५॥भिलटीची फळें उच्चिष्ट खादलीं । ते हि उद्धरिली हेळामात्रें ॥६॥विराध कबंध तारिले प्रसिद्ध । जडमूढबंध६ उद्धरीले ॥७॥तृण वृक्ष ग्रावी तया क्षेम द्यावी । सीघ्र चि पाववी वैकुंठासी ॥८॥पाये लाउनीया शिळा दिव्य बाळा । गोहका प्रेमळा उद्धरीले ॥९॥चित्रकुटीं काक जानकीसन्मुख । शरण येतां रंक उद्धरीला ॥१०॥खग मृग पशू उद्धरी सर्वेशू । कांहीम गुणदोषू न पहातां ॥११॥पंपासरोवरीं मारुती भेटला । सुग्रीव तारीला वैभवेंसी ॥१२॥वाळि निज बाणीं चुके जन्मयोनी । तया निज स्थानीं मोक्षपद ॥१३॥क्रोधा येउनीया समुद्र तारीला । अन्याय क्षमीला सीघ्र काळें ॥१४॥वैरियाचा बंधु शरणांगत आला । चिरंजीव केला क्षणमात्रें ॥१५॥अस्वलें वानरें तारियेलीं प्रेमें । रामें गुणधामें आवलिळा ॥१६॥राक्षस मारूनी उद्धरीले रामें । दिली पूर्णकामें भरता भेटी ॥१७॥अयोध्या नगर वैकुंठासि नेलें । नाहीं कीं पाहिले गुणदोष ॥१८॥कलियुगी दास उद्धरायालागी । मारुती निसंगी ठेवियेला ॥१९॥चहूं वर्णा नामीं अधिकारु बोलिला । जन उद्धरिला नेणो किती ॥२०॥नेणो किती आतां कलियुगामाजीं । स्रिया शूद्र भोजी नाम छंदी ॥२१॥नाम छंद जया लगलासे ध्यास । तयास विश्वास रामपाईं ॥२२॥रामपाईं दास कल्याण जहाले । पदीं स्थिरावले श्रीगुरूच्या१ ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP