चौचरणी वोव्या - गुरुकृपा

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


जनीं जनार्दन हें तो वाक्य खरें । परंतु विचारें विवरावें ॥१॥
विवरावें बरें वंद्य निंद्य काया । रंक आणि राया येक कैसे ॥२॥
कैसे विषामृत१ मूर्ख आणि संत । पापी आणि भक्त येक नव्हे ॥३२॥
नव्हे येक कांहीं उपाधी पहातां । भेद हा तत्त्वता नाना परी ॥४॥
नाना परी स्वाद वल्लीचा कळेना । येक चि जीवना भेद तैसा ॥५॥
भेद तैसा देही विचारूनि पाही । इंद्रियांच्या ठाईं भिन्न कार्यें ॥६॥
कार्याकारण हें कर्तृत्व पाहातां । त्रिपुटी तत्त्वता वीवरावी ॥७॥
विवरावे३ पिंड ब्रह्मांड अष्टधा । साक्षी हा तत्त्वता तयामध्यें ॥८॥
तयामध्यें देव तयामध्यें भक्त । तयामध्यें संत पाहों जातां ॥९॥
पहातां पहातां सकळ हि वाव । पहाणारासी ठाव भिन्न कैंचा ॥१०॥
कैंचा हा विवेक परब्रह्म येक । तेथें येकानेक आडळेना ॥११॥
आडळेना तुर्या आडळेना ज्ञान । पुढें हें विज्ञान ब्रह्मरूप ॥१२॥
ब्रह्मीं ब्रह्म पूर्ण कल्याण संपूर्ण । गुरुकृपे खूण प्राप्त जाली ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP