मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|चौचरणी वोव्या| माझ्या स्वामींचे वचन चौचरणी वोव्या रामनामकथा पांगुळ मी देवा रामपाईं दास कल्याण जहाले माझ्या स्वामींचे वचन गुरुकृपा चौचरणी वोव्या - माझ्या स्वामींचे वचन ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगओवीकल्याण बाडांक ५२ वरून Translation - भाषांतर पतित मी होतों पावन चि केलें । लागतां पाउलें सामियाचीं ॥१॥स्वामियाचे पाय देखतां नयनीं । जालें जनीं वनीं समाधान ॥२॥समा़धान घडे बहुता सुकृती । सज्जनाचे चित्तीं मिळों जातां ॥३॥मिळतां मिळणी ऐक्यरूप होता । वेगळें पडतां पतन ची ॥४॥पतनीं पडिले शब्दज्ञानी जाले । साउलीच बोले वाउगीची ॥५॥वाउगे बोलिले वेष पालटिले । हिंडो चि लागले दारोदारीं ॥६॥दारोदारीं जैसे श्वान हिंडतसे । कामक्रोध वसे हदयामाजीं ॥७॥हदयामाजीं काळकूट हे कल्पना । दिसे वृंदावना बाह्याकार ॥८॥बाह्याकारें स्नान बाह्याकारें संध्या । बाह्याकारें विद्या दावीतसे ॥९॥दावीतसे जना नानापरी भाव । बुडतयाचा पाव खोलाकडे ॥१०॥खोल हा संसार तयांत बुडाला । धोका हा लागला रात्रंदीस ॥११॥रात्रंदिवस धोका वाहात चि गेला । काष्टवत जाला वाळोनिया ॥१२॥वाळला आपण बोलतसे पण । पोरें वणवण करीताती ॥१३॥करिताती चिंता लग्राची सर्वदा । मागुती वेवादा उठताती ॥१४॥उठतां बैसतां करी नाना चिंता । सज्जनाच्या चित्ता कानकोडें ॥१५॥कानकोंडे जालें तया मुक्ति कैंची । जितां चि पावती नर्कपात ॥१६॥नर्कपात चुके सज्जन सेवितां । सर्व शास्त्र गीता बोलतसे ॥१७॥बोलतसे माझ्या स्वामीचें वचन । सर्व हि सज्जन समाधान ॥१८॥समाधान जालें सज्जना सेवितां । मुक्ति सायोज्यता घर रीघे ॥१९॥घर रीघे ऋद्धिसिद्धि हे पहातां । मनांत तत्त्वता रामरूप ॥२०॥रामरूप सर्व कल्याण अंतरीं । कीर्ति निरंतरीं जगामाजीं ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP