अभंग १०१ ते ११०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

१०१.
आजि आनंद सुदीन । मज भेटला जानकि जीवन ॥१॥
वाटॆ आनंद आनंदा । सरला समुळ जो दु:खकंद ॥२॥
रामा सुख समुद्रा मज मीना । सुखी केलें अखंड करूनि मीना ॥३॥
चित्त वृत्ती झाल्यावर । येती आनंदाचे उद्नार ॥४॥
विष्णु जगन्नाथा । स्वस्वरुप विलोकि न तत्वता ॥५॥

१०२.
मज दिधली नर काया । इचें सार्थक तूं रामराया ॥१॥
तुज पहावा नयनीं । शामसुंदर चाप पाणी ॥२॥
दोनी जोडूनी हस्तक । चरणीं ठेवणें मस्तक ॥३॥
हेचि माझी सर्व जोडी । ध्वावी स्वस्वरुपाची जोडी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । शाश्चत आत्म लाभ हा तत्वता ॥५॥

१०३.
मज कांहिं सुचेना आतां । सत्य कथितों श्री रघुनाथा ॥१॥
तूं लाविशि कां बहु उशीर । मनि धरवेना मज धीर ॥२॥
देह नाशिवंत पाहीं । आत्म भेटीविण सुख नाहीं ॥३॥
आपण आनंदाचा कंद । कळला कीं जरि मी मतिमंद ॥४॥
तुज नमितों जोडुनि हाता । येरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

१०४.
भेटला तूं सिता कांता । आतां उणें काय मज भगवंता ॥१॥
कोण पांगे संसारासी । आपण अखंड सुखाची राशी ॥२॥
अनुलक्षुनि आत्म पदास । सन्मुख राहिन होउनि दास ॥३॥
हेंचि मागणें आपणासी । स्पर्शुं देउ नको मी पणासी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मज नुरवि देह अहंता ॥५॥

१०५.
धन्य संतांचा महिमा । आपण भेटला मज रामा ॥१॥
नसता संतांचा प्रसाद । तरि काय होति तुज माझी याद ॥२॥
मोठा संतांचा उपकार । आपण प्रगटविला साचार ॥३॥
संतकृपे आत्म प्राप्ती । एक आहे माझी विज्ञप्ती ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । घडविं आत्म भक्ति मज अनाथा ॥५॥

१०६.
संतीं कळविली निजखूणा । तूझी ओळख होती कोणा ॥१॥
संतीं तुज मज भेटवीला । दु:ख समुद्र आटविला ॥२॥
संत वचनीं धरिं विश्वास । आपण सांपडला मज स्वप्रकाश ॥३॥
दु:ख दरिद्र अज्ञान गेलें दूरी । सच्चित्सुख आत्म प्रचिति आलि पुरी ॥४॥
रामा विष्णु कृष्ण जगन्नाथा । प्रपंच परमार्थ अभेद आपण स्वता ॥५॥

१०७.
प्रेमा अंतरिं राघवा मज तूजा । नित्य सद्भावें करिन आत्म पूजा ॥१॥
अंतर द्दष्टिनें हे नयन तूज पाहूं । आत्म दर्शनें हें चित्त स्थीर राहुं ॥२॥
चरणीं आपुल्या हें नम्र होऊ शीर । वाचा वर्णुं आपुले गुण गंभीर ॥३॥
नित्य ह्रदयीं देउनि आत्म धीर । संभाळीं अभिमानी तूं आमुचा रघुवीर ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा आत्म सेवा । अखंड घडवीं आपण पूर्ण सुखाचा ठेवा ॥५॥

१०८.
रुपें कोटि मदनाहुनि तूं सुंदर । रमा प्रतापि तूं मोठा धुरंधर ॥१॥
कामादिक षट्‌ शत्रुंला उपजों नेदीं । चित्त पडूं नेदीं माझें प्रपंच खेदीं ॥२॥
आपण वसवीं माझें ह्रदय मंदीर । सदय ह्रदय रामा देउनि धीर ॥३॥
मज सोडुं नको हेचि विनंति । जाणसी तुं मज एक सीतापति ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा रामराया । न विसंबे कधिं आपुल्या या पाया ॥५॥

१०९.
प्रभु तूं अनाथांचा नाथ । समर्थाहुनी तूं समर्थ ॥१॥
ऐसें कळविसी निज भक्तांस । बाम्हाभ्यंतर्गत नुखुनि त्रास ॥२॥
आत्म कृपेच्या वडिवारा । काय वर्णिन मी ऊदारा ॥३॥
अभिमानी भक जनांचा । झाळा निश्चय हाचि मनाचा ॥४॥
रामा विष्णु कृष्ण जगन्नाथा । आत्मकृपा वृद्धींगत करीं आतां ॥५॥

११०.
पूर्ण करुनि मनोरथ माझा । केला आनंद राम राजा ॥१॥
ऐसा आनंद सदोदित । करीं जानकी सहित ॥२॥
ध्यान तुझें मज आवडे देवा । आमुच्या हातें करुनि घेइं सेवा ॥३॥
करुनी शत्रूंचा संहार । देइं भक्तां आत्मसुख फार ॥४॥
सर्व पीडा रोग शांति । करीं दे आरोग्य भजाया तुज एकांति ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथासी । तुजपासि मागणें मागितलें हें मज दे अनाथासी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP