शिष्याकरितां केलेला अभंग - अभंग १४५
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. अभंग
१४५.
गुरुराज बोले, अरे शिष्य़राया !। एकांतीं बैसाया उबगूं नये ॥१॥
उबगूं नये कधीं साधन करितां । क्षण एक रिता राहूं नको ॥२॥
राहुं नको दासबोध ग्रंथावीण । आत्मा हा आपण अनुभवावा ॥३॥
अनुभव साधीं आपण एकला । सकल द्दश्याला साक्षी तो मी ॥४॥
साक्षी तो मी जो हा वायु उठे त्याचा । उठल्या वृत्तीचा मीच साक्षी ॥५॥
मीच साक्षी एक वृत्ती या अनेक । पाहतों कौतुक एकला मी ॥६॥
एकला मी पाठीं, वृत्ती पुढें दिसे । संग मज नसे या वृत्तीचा ॥७॥
या वृत्ती उठती मजपुढें सार्या । देखणा मी बर्यावाईटाचा ॥८॥
बर्यावईटाचा संग नसे मज । साक्षी मी सहज दिसे त्याचा ॥९॥
दिसे त्याच्या पाठीं आहें मी एकला । पाहणार झाला मोकळा मीं ॥१०॥
मोकळा मीं देह इंद्रियांचा साक्षी । आपणांतें लक्षी आपणची ॥११॥
आपणासी लाभ आपणाचा परी । अभ्यास हा करीं गुरुबोधें ॥१२॥
करी गुरुबोध ऐसा सच्छिष्यास । म्हणे कृष्णदास वैष्णवांचा ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 08, 2014
TOP