अतिशयोक्ती अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
विषयीच्या वाचकपदावर लक्षणा केली जाते. ह्या लक्षणेंचें खास कार्य हें कीं, तिनें विशेष्यरूप असलेल्या लक्ष्यार्थाचा (म्ह० विषयाचा) बोध करुन द्यावा; या लक्ष्यार्थ म्हणून आलेल्या विषयरूप विशेष्याचें विशेषण, (प्रकार) विषयीचा खास धर्म जो विषयित्व, तेंच केवळ असतें. आणि म्हणूनच अतिशयोक्तींत, विषयिवाचक पदावर केलेल्या लक्षणेनें मिळणार्या लक्ष्यार्थांत, वाच्याच्या (म्ह० विषयीच्या) असाधारण धर्माचें (उदा० :--- तमालद्रुमत्वाचें) भान होतें. पण जरी येथें लक्ष्यार्थाच्या (उदा० :--- श्रीकृष्णाच्या) असाधारण धर्माचें (उदा० श्रीकृष्णत्वाचें) भान होत नाहीं, तरी तें न होण्यांत, विरुद्ध असें कांहींच नाहीं.
पण (या बाबतींत) दुसर्या कांहींचें म्हणनें असें कीं - ‘(वरील अतिशयोक्तीच्या लक्षणांत) मात्र हा मूळांतील शब्द घालूच नये; म्हणजे लक्ष्यार्थाच्या लक्षणांत) मात्र हा मूळांतील शब्द घालूच नये; म्हणजे लक्ष्यार्थाच्या आसाधारण धर्माचें (उदा० :--- श्रीकृष्णत्वाचें) सुद्धां (तमालद्रमत्व या धर्माबरोबर) भान होऊं लागेल., दुसर्या कित्येकांच्या मतें, “लक्षणेणें मिळणार्या लक्ष्यार्थाचें (विषयरूप विशेष्याचें) प्रथम स्वत:च्या असाधारण धर्मानें विशिष्ट (उदा० :--- श्रीकृष्णत्वविशिष्ट) असेंच भान होतें, आणि मग वाच्यार्थाच्या असाधारण धर्मानें (उदा० :--- तमालद्रुमत्व - ) विशिष्ट असें जें लक्ष्यार्थाचें भान व्हायचें, तें लक्षणेहून दुसर्या म्ह० व्यञ्जनाव्यापारानें होतें.”
(लक्ष्यार्थाचें, प्रयोजनकक्षेंत, मुख्यार्थाच्या विशिष्ट धर्मानें युक्त असें भान होणें, ही गोष्ट वस्तुत: बाधित आहे) पण हें बाधज्ञान (आहार्यज्ञानाला) प्रतिबंधक कसें होत नाहीं, हें आम्ही पूर्वींच सांगितलें आहे. येथें (म्ह० अतिशयोक्ति - वाक्यांत,) विषय व विषयी एकाच शब्दानें (म्ह० विषयिपदानें) सांगितले असल्यानें, त्या दोहोंत उद्देश्यविधेयभाव (मानतां येत) नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP