प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
बरें पण, ह्या प्रतिवस्तूपमेचें लक्षण तरी काय ? ‘वाक्यार्थगता उपमा म्हणजेच प्रतिवस्तूपमा’ असें लक्षण केलें तर वर सांगितलेल्या (दिवि भाति या) वाक्यार्थोपमेंत हें लक्षण अतिव्याप्त होईल, म्हणजे (वाक्यार्थोपमेला प्रतिवस्तूपमा म्हणण्याची वेळ येईल). ‘वाक्यार्थगता आर्थी उपमा’ असें एक ‘आर्थी’ हें विशेषण वरील लक्षणांत घाला, असेंही म्हणतां येत नाहीं, करण तें विशेषण (प्रतिवस्तूपमेच्या लक्षणांत) घातलें तरी सुद्धां, द्दष्टांत अलंकारांत हें लक्षण अतिव्याप्त होऊ लागेल, (द्दष्टांताला प्रतिवास्तूपमा म्हणावे लागेल). ‘आतां द्दष्टांताची व्यावृत्ति करण्याकरितां प्रतिवस्तूपेमच्या लक्षणांत, ‘वस्तुप्रतिवस्तुभावापन्न साधारण धर्म असणारी (ती प्रतिवस्तूप पमा) असें पुन्हां एक विशेषण लावावें,’ असें म्हटलें, तरी सुद्धां :---
“हे कोकिळा ! जोंपर्यंत (झेंपावणार्या) भुंग्यांच्या झुंडी ज्याच्यावर लटकल्या आहेत, असा कुणी अपूर्व आंब्याचा वृक्ष मोहोरणार नाहीं तोंपर्यंत, तूं हे रूक्ष दिवस (कुठें तरी) रानांत राहून काढ.”
या अप्रस्तुतप्रशंसा अलंकारांत या प्रतिवस्तूपमेच्या लक्षणाची अतिव्याप्ति होणारच. या शंकेवर उत्तर :--- हें म्हणणे बरोबरा नाहीं; (करण अप्रस्तुत प्रशंसेंत अप्रकृत अर्थ, शब्दानें सांगितलेला असतो खरा, पण प्रकृत (प्रस्तुत) अर्थ तो व्यंग्य असल्यानें, शब्दानें सांगितला जाणें शक्यच नाहीं. अशा रीतीने, (वरील सर्व चर्चेचा निष्कर्ष हा कीं, प्रतिवस्तूपमेचें लक्षण खालीलप्रमाणें करायला हरकत नाहीं.) :---
“वस्तुप्रतिवस्तुभावापन्न असा साधारण धर्म ज्या दोन वाक्यार्थांत असतो व दोन वाक्यार्थांतील (सुटया पदांच्या अर्थांत नव्हे पण सबंध दोन वाक्यांत) साद्दश्य आर्थ असतें, त्या साद्दश्याला प्रतिवस्तूपमा (अलंकार) म्हणावें.”
“या मृगनयनेच्या (हरिणबालकाच्या डोळ्यासारखे डोळे असणार्या) भुरभुरणार्या केसांनीं झांकलेल्या तोंडाकडे पाहून, ज्याच्या भोंवतीं भुंग्यांच्या झुंडी पिंगा घालीत आहेत (घिरटया घालीत आहेत) अशा कमळाची मला आठवण होते.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP