मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|रूपके| पिंगळा रूपके शेत कुळवाडी घोंगडें पिंगळा धेनु गोंधळ डांक वासुदेव पांगुळ स्वप्न हरिजागर कूट खेळिया बागुल हुंबरी. कुस्ती जातें रूपक - पिंगळा संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेवरूपक पिंगळा Translation - भाषांतर पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी । उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी ॥१॥देवा शकून ऐकावा ॥ध्रु०॥संत साधु आपरमीत । अवघा करियेला थाट । टाळवीणे वाद्य वाजत । आवडी मंजुळ स्वरें गात ॥२॥नादें अंबर दणाणलें । तेहतीस कोटी देव मिळाले । आवडी पहावया आले । स्वर्गसुखातें विसरले ॥३॥आई रखुमाई माते । उठवा उठवा श्रीरंगातें । नारद तुंबर गायनातें । कर जोडूनि हनुमंत ॥४॥उठिला सांव्ळा वनमाळी । आनंदली भक्तमंडळी । जयजयकारें पिटिली टाळी । विठ्ठल नामें दिधली आरोळीं ॥५॥पिंगळा आनंदला मनीं । तेज न माये गगनीं । हर्षें घातली लोळणी । शिंपी नामा तुझे चरणीं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP