करुणा - अभंग १ ते ४

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
पाय जोडूनि विटेवरी ।  कर ठेउनी कटावरी ॥१॥
रूप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥
गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥
गरुड सन्मुख उभा । म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥
२.
येगे माझे विठाबाई । कृपाद्दष्टीनें तूं पाहीं ॥१॥
तुजविण न सुचे कांहीं । आतां मी वो करूं कांहीं ॥२॥
माझा भाव तुजवरी । आतां रक्षीं नानापरी ॥३॥
येईं सखये धांउनी । म्हणे नाम याची जनी ॥४॥
३.
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥
धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
तुजबांचूनि दाही दिशा । वाट पाहातें जगदीशा ॥३॥
हांसें करूं नको जनासी । म्हणे नामयाची दासी ॥४॥
४.
सख्या घेतलें पदरीं । आतां न टाकावें दुरी ॥१॥
योरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥
ब्रम्हियाच्या ताता । सज्जना लक्षुमीच्या कांता ॥३॥
आपुली म्हणवूनि । आण गावी दासी जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP