करुणा - अभंग १९ ते २१

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१९.
अविद्येच्या वो रात्रीं । आडकलों अंधारीं ॥१॥
तेथुनी काढावें गोविंदा । यशोदेच्या परमानंदा ॥२॥
तुझें सन्निधेचे पाशीं । ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥
तुझे संगती पावन । उद्धरिले ब्रम्हों पूर्ण ॥४॥
अजामेळ शुद्ध केला । म्हणे दासी जनी भला ॥५॥
२०.
धन्य कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय ॥१॥
सखा तुज वीण पाहीं । दुजा कोणी मज नाहीं ॥२॥
माझी न करावी सांडणी । म्हणे तुझी दासी जनी ॥३॥
२१.
रुक्मिणीच्या कुंका । सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥
तूं धांव माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥
शिवाचिया जपा । मदनताता या निष्पापा ॥३॥
दयेच्या सागरा । म्हणे जनी अमरेश्वरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP