करुणा - अभंग २५ ते २७

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२५.
शिणल्या बाह्या आतां । येऊनियां लावीं हाता ॥१॥
तूं माझें वो माहेर । काय पहातोसी अंतर ॥२॥
वोंवाळुनी पायां । जिवेंभावें पंढरिराया ॥३॥
धर्म ताता धर्म लेंकी । म्हणे जनी हें विलोकीं ॥४॥
२६.
योग न्यावा सिद्धी । सकळ गुणाचिया निधी ॥१॥
अरूपाच्या रूपा । साब राजाचिया जपा ॥२॥
ब्रम्हीयाचा ताता । म्हणे जनी पंढरिनाथा ॥३॥
२७.
माय मेली बाप मेला । आतां सांभाळीं विष्ठला ॥१॥
मी तुझें गा लेकरूं । नको मजशीं अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे कोण । माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा । थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकळ जिवाच्या जीवना । म्हणे जनी नारायणा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP