मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग|
आमुचा नामा तुज गोला निरवु...

विठाचे अभंग - आमुचा नामा तुज गोला निरवु...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


आमुचा नामा तुज गोला निरवुसी । मी तुजवांचोनी नेणें कवणा ॥१॥
कायाबाचामनें जोडिलें जें बापें । तें दिधलें तुज पैंठवावया ॥२॥
तें देगा आमुचें नको करूं विचारू । नामा तुझा डिंगरू त्याचे आम्ही ॥३॥
जुनें नाणें आमुच्या वडिलाचें ठेवणें । बहुता कष्टीं तेणें जोडियेलें ॥४॥
तें आम्हांलागोनी ठेविलें तुझ्या पायीं । आमुचें आम्हां देईं केशीराजा ॥५॥
तूं अनाथा कोंवसा दीनाचा कृपाळू । तरी आमुचा सांभाळू करीं कां वेगें ॥६॥
आमुचे संचितार्भ आम्हासी देउनी । यश घे त्रिभुवनीं म्हणे विठा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP