विठाचे अभंग - केशवाचे पाय जाणें मी आणि ...
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.
केशवाचे पाय जाणें मी आणि कांहीं नेणे । म्हणोनी जीवेप्राणें अनुसरलों ॥१॥
पाय ते अतू पाय ते अतू । पाय ते अतू खेचराचे ॥२॥
पायांपरतें सुख आणिक नाहीं । विटेवरी पाय ध्येई मज ॥३॥
म्हणोनी पुढतां पुढतीं विठा लागे पायीं । म्हणे खेचर आई विनंति ऐका ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 09, 2015
TOP