मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता| अर्वाचीन फ़ारशी प्रकाशित असंग्रहीत कविता अप्रकाशित कविता पहिला पाऊस प्रेम आणि आशा आई, हें पहिलेंच चुंबन तुझें राष्ट्रीय गीत अर्वाचीन फ़ारशी चंबळच्या तीरावर केवळ मायभूमीसाठी कुणी श्रमती, कुणी रमती मागे अस्तन्या सारूं ऐका निमिषाचें स्मारक स्फ़ुट श्लोक कां कुणी एकाचा अभिमान् ? अर्पण श्लोक असंगृहीत कविता - अर्वाचीन फ़ारशी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन अर्वाचीन फ़ारशी Translation - भाषांतर अय वाय् वतन् वाय्आपत्तिशोकसिन्धूमधे बुडाली स्वभूमि ही काय ? !ताबूत आणि कफ़नामागे चाला, उठा; म्हणा ‘ हाय ! ’ १रक्ताने तरुणांच्या जे गेले मारले इथे, झालेरंगित् बिम्ब शशीचें, रुधिरीं गिरिवर वनांसहित न्हाले. २आकांक्षा थोर कुठे ? चैतन्य, स्वाभिमान, औदार्य ?हा ! हा ! आला लोंढा द्रोहाचा चहुंकडून अनिवार्य ३परदेशीय पदतलीं तुडवूं झटतात धर्म इस्लामअमुच्या स्वातंत्र्याचें इतिहासीं फ़क्त राहिलें नाम ४देशाचीच न झाली अवनति, अपकीर्ति होय धर्माचीप्राण न उरला; कुसुमें, सरू, समन शुष्क जाहलीं साचीं ५नाव गुलाबाचें कधि बुल्बुल संदेहदग्ध नहि घेतलज्जरक्तचि नरगिस् धवल फ़ुलें सर्व तेवि बागेंत. ६चौर्य मार्ग वजिरांचा - झाला केव्हाच गोपनस्फ़ोटउलमा, भटभिक्षुक ते पडुनी चिखलांत जाळिती पोट. ७खल्खालाविषयीं हे शोकाने दग्ध होतसे हृदयरयतेच्या अंगावरतीं एकहि वस्त्र न, प्रलय-समय ८रत्नमया भूमीचे तुकडे केले कुणी--कशी छातीकस्तूरिहुनि खुतनच्या अधिक सुगंधी असे तिची माती ९प्रासादावर ज्यांचा ताजा अजुनी जुना मुलामा तोघुबडांची पंक्ति बसे, गिधाड टोळी, व कावळा गातो. १०राजकृपा लवभरही रयत बिचारी न पावली केव्हाकार्य तिचे ओरडणें ‘ हसन् ! हुसयन् ! हाय, हाय. ’ हा देवा ११शोकाच्या लालांविण अश्रफ़ पुष्पें न घेइ हुंगायाप्रतिक्षणीं तो बोले : " स्वभूमि हा ! हाय सर्व हो वाया १२सुमार १९१६ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP