असंगृहीत कविता - कां कुणी एकाचा अभिमान् ?

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


कां कुणी एकाचा अभिमान् ?      धृ.

गुलाब चम्पक कमळ मोगरा
महनीय न अभिधान
पूज्य वन्द्य हे भिन्न भिन्न गुण
त्यांतिल सौख्यनिधान्.    १

गन्ध कुणाला, वर्ण कुणाला,
कुणास आकृति छान्
हृदीं कुणाच्या मरन्द पाहुन
रसिकांना नहि भान्.    २

एकही न गुण तरी विरोधें
दुज्यास खुलवि निदान्
विविधतेंत या रमत पहावें
सृष्टीचें विन्दान्.    ३

अरुण, मार्च १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP