योगसंग्राम - प्रास्ताविक ३
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
छपाई व प्रसिद्धी हीं आधुनिक साधनें उपलब्ध होण्यापूर्वी म्हणजे एकोणिसावें शतकाचेपूर्वी ज्ञानसंपादनाचीं व प्रसाराची साधनें अगदींच मर्यादित होती. त्यामुळें पंथ, परंपरा व सद्गुरु यांचे साहजिकच विशेष महत्त्व बाळगणें क्रमप्राप्त होते. त्यांवरील विश्र्वास व श्रद्धा निरंकुश मानणें भाग होते. ज्ञान देणारा किंवा सांगणारा गुरु भेटलाच तर ती अपूर्व पर्वणी म्हणून ती साधणें व गुरूवर सर्वस्वी अवलंबून राहाणें या व्यतिरिक्त इतर उपाय नव्हता. गुरूबरोबर त्याची परंपराहि स्वीकारावी लागे व परंपरेबरोबर पंथाची निष्ठा आलीच. त्या कालांतील अशा असहाय परिस्थितीत ज्ञान संपादन करतांना चिकित्सेशीं फारकत करावी लागे; अधिक शोधना म्हणजे बंड मानलें जाई; हंसक्षीर न्यायानें तरतम तत्त्वांचा स्वीकार करण्यास पारतंत्र्य आडवें येई. ज्ञान संपादनाचीं साधनें अत्यंत मर्यादित राहिल्यानें ज्ञानाचें क्षेत्रहि आकुंचित होत होते. त्यांतच आचाधर्माची किंवा वर्णाश्रमधर्माची श्रृंखला हीहि दिवसेंदिवस अधिकाधिक कष्टद होऊं लागली होती. याच परिस्थितीचे चित्र शेख महंमदांनीं ‘योगसंग्रामां’त विषयानुसंधानानें रंगविलेलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP