प्रसंग अकरावा - नमन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ॐ नमोजी तेजाळ नेत्र श्रवणा । तुमच्यानें देखोनि आहिक्‍यिलें आपणा । मग रवि शशि तारांगणा । ध्रुव नमस्‍कारियेला ॥१॥
आतां नमस्‍कारियेले ते कर चरण। त्‍यांच्यानें लिहिलें केलें तीर्थभ्रमण । आणिक वाचेचेंहि पवित्रपण । नमस्‍कारियेलें असे ॥२॥
नमस्‍कार केला हृदय-कमळा । जेथें सांठविला श्रीहरि सोंवळा । आणिक ब्रह्मानंदाचा उबाळा । उतउतों आलासे ॥३॥
पुन्हां नमस्‍कारियेली ते मेदिनी । जीवरी उत्‍पत्ति प्रळय जीवा जनी । असंख्य अवतारांच्या खाणी । साकारलिया असती ॥४॥
आहिक्‍य निरालंब निजमंदिर । जें ईश्र्वराचें अधिष्‍ठान थोर । तें नमस्‍कारिलें ऊर्ध्वं साचार । विहंगमाच्या उड्डाणें ॥५॥
नमस्‍कारिलें तें पवन पाणी । उत्‍पत्ति आणि प्रळय हे दोन्ही । चौदा भुवनांची दीर्घ मांडणी । तीस नमस्‍कार केला ॥६॥
हरिहर ब्रझ इंद्रादिक । नमस्‍कारिले ते तिन्ही लोक । यांहि वेगळे सम विषम देख । त्‍यांस साष्‍टांग नमस्‍कार ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP