मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अकरावा| निष्कलंक प्रबोध प्रसंग अकरावा नमन अद्वैत परब्रह्म जाणतेनेणतेपणा-भेदाभेद पिंगळेची कथा-दृष्टांत वासना तसे भोग यमयातना निष्कलंक प्रबोध हरि व अल्ला एकच विटंबनेचें शरीर प्रसंग समाप्ति प्रसंग अकरावा - निष्कलंक प्रबोध श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत निष्कलंक प्रबोध Translation - भाषांतर ऐसें सांगतो हे सकळ उघडुनी । कोणी ऐकेत ना ग्रंथालागुनी । यालागीं थोडा दृष्टांत दाउनी । उन्मत्त सावध केले ॥८४॥बहुत कुसरें भरलें हें जन । विरक्त थोडा कोणी साधु सज्जन । अमान्य करितील या ग्रंथालागुन ।ज्यांस गुरुकृपा नाहं ते ॥८५॥ज्यांस असेल सद्गुरूचा विश्र्वास । तेचि आनंदतील या ग्रंथास । अति नष्ट हीन दोषी मूर्खास । द्वैत चढेल अज्ञानें ॥८६॥देखोनि व्युप्तन्न कुशळ ज्ञानी । भ्रष्ट पाखांडी खांचती मनीं । परी भावें न लगती सद्गुरुभजनीं । सगुण गुण धरूनियां ॥८७॥आतां असो हे ज्ञानाची निगुती । श्रोत्यांस सांगेन भेदाची प्रवृत्ति । ज्यांनी हें जन गोंविलें अधोगती । तें सांगों आरंभिलें ॥८८॥पांच पंचवीसांची छत्तीस जालीं । छत्तिसांची सव्वाशे विस्तारिली । तें पुढें सांगेन वेगळाली । श्रोत्यांस बयाजवारें ॥८९॥शेख महंमद म्हणे सद्गुरुराजा । मजला आज्ञा द्यावी संग्रामकाजा । हीं दैवतें भूतें मारीन वोजा । देहसंगें लागलीं जीं ॥९०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP