या शेवटल्या लेखात प्रारंभी ‘ असंस्कृताया: ’ या पदाचा अनुवाद केला आहे. हे पद ‘ असंस्कृताया: कन्याया: कुतो लोकास्तवानघे ’ या श्लोकार्धापैकी आहे; व महाभारतान्तर्गत शल्यपर्वात नारदमुनी आणि एक वृद्ध पण अविवाहित स्त्री यांचा संवाद झाला आहे, त्या प्रसंगी व्यासांनी हा श्लोक नारदाच्या तोंडी घातला आहे. पुरुष काय किंवा स्त्रिया काय, त्यांना पुत्र झाला नाही तर लोकप्राप्ती नाही, म्हणजे त्यांना मोक्षादिकांची प्राप्ती व्हावयाची नाही, अशी सामान्यत: लोकांची समजूत असते, त्या समजुतीचा या ठिकाणी नारदांनी अनुवाद केला आहे.
वास्तविक विचार करिता ज्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला, अशा स्त्रीपुरुषांपुरतीच ही समजूत असणे योग्य आहे. गृहस्थाश्रमात प्रवेश केला, अशा स्त्रीपुरुषांपुरतीच ही समजूत असणे योग्य आहे. गृहस्थाश्रमात मनुष्य शिरलाच पाहिजे असा शास्त्रकर्त्यांचा मुळीच आग्रह नाही, व गृहस्थाश्रमात मनुष्य मुळीच शिरला नाही, तरीही शास्त्राची काही आडकाठी नाही. ब्रह्मचर्यस्थितीत असतानाच जर मनुष्याच्या मनास ज्ञानाच्या संस्काराने विरक्तता उत्पन्न झाली, तर त्याला गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम हे दोन्ही आश्रम अजीबात टाकून देऊन संन्यासाश्रम घेता येतो.
“ यदहरेव विरजेत्तदहरेव प्रव्रजेत् । तेन ब्रह्मचर्यादपि प्रवजेत् ॥ ”
असे कौस्तुभकाराने एके ठिकाणी म्हटले आहे. त्याचा अर्थ ‘ विरक्तता उत्पन्न असे कौस्तुभकाराने एके ठिकाणी म्हटले आहे. त्याचा अर्थ आहे. अर्थात गृहस्थाश्रमात शिरलेच पाहिजे असा मुळीच शास्त्रकर्त्याचा उद्देश नाही. शिरणे न शिरणे ज्याच्या त्याच्या इच्छेवर किंवा मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. या बाबतींत तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. हा नियम जसा पुरुषांना तसा स्त्रियांनाही लागू आहे.
मारुती, शुक्राचार्य कार्तिकस्वामी, भीष्म इत्यादिकांची चरित्रे सर्वत्र प्रसिद्ध आहेतच. त्यांनी विवाहाची कल्पना मुळीच पत्करली नाही. अलीकडच्या काळात देखील शंकराचार्य, रामदास वगैरे सत्पुरुषांनी आजन्म अविवाहित स्थितीचाच अंगीकार केला हे प्रसिद्धच आहे. शंकराचार्यांनी ब्रह्मचर्यस्थितीत असताच संन्यासाश्रम प्रत्करला, गृहस्थास्त्रम पत्करलाच पाहिजे, पत्करला नाही तर नरकात पडण्याची पाळी, असा जर शास्त्रकर्त्यांचा आशय असता, तर आता सांगितलेली एकूणएक मंडळी नरकात गटांगळ्या खात पडली असेच मानण्याची पाळी येते. परंतु ही कल्पना करण्याचेच कारण नाही. कारण गृहस्थाश्रमस्वीकार केवळ ऐच्छिक असून तो पुरुष व स्त्रिया या दोघांनाही सारखाच लागू आहे. शल्यपर्वातला संवाद ज्या स्त्रीशी झाला, ती स्त्री वृद्ध, अविवाहित व ब्रह्मवादिनी होती. अशीच एक उत्तरा नावाची स्त्री महाभारतात अनुशासनपर्वात व्यासांनी वर्णिली आहे. ही स्त्री वृद्ध होईतोपर्यंत अविवाहितच होती. तिची गाठ अष्टावक्र ऋषीशी पडली, व ती त्याला आपणाशी विवाह कर म्हणून म्हणू लागली. ही स्त्री इतकी वृद्ध झाली आहे, त्या अर्थी तिचा पूर्वी विवाह झाला असलाच पाहिजे असे ऋषीला वाटून, तो तिचा अंगीकार करीना. मन्वादिकांनी स्त्रीस्वातंत्र्याचा निषेध केलेला त्याला आश्चर्य वाटले. शेवटी ब्रह्मवादिनी स्त्रियांचा स्वातंत्र्यनाश होत नाही, ब्रह्मवादिनी न होणार्या स्त्रियांचे मात्र स्वातंत्र्य नष्ट होते, इत्यादी प्रकारे तिने त्या ऋषीचे समाधान केले. तात्पर्य सांगावयाचे काय, की ह्या विवाहाचे जोखड मानेवर घेण्याची आवश्यकता शास्त्राने मुळीच सांगितली नाही. ती ज्याने त्याने खुषीने आपल्या अंगावर वाटेल तर ओढून घावी.