देवीअष्टक
विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.
( कुसुमशरवृत्त )
अमित शशिदिनरमणसम सुभगतेजा
कनकनिभतनु अरुणतर करसरोजा ।
अतिमधुर धनुकुसुमशरविधृतपाणी
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥१॥
नवतरुणमदभरित्गजगति सुवेषा
ललितमुख निबिडमुख परिमित सुहासा ।
चकितभृगशिशुनयन विजितपिकवाणी
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥२॥
असुरकुळदहनकर निशित करवाला
धरिसि अरितिमिरहर मिहिरसम शूला ।
अभयकर विपदगिरिभिदुर कर दोनी
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥३॥
तव भजनरत तरति भवजलधि आयी
पूजिति जरि सुमनफलजळसहतु कायी ।
पदकमळ अतिविमळ जपति मुनि मौनी
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥४॥
गुणचरित मुदभरित नियत पढती जे
विविध परिजनन रिपुहननमहिमा जे ।
श्रवणपर सुजनवर परिसति सुकानीं
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥५॥
श्रुतिवदन भणति असि पद भजनशेसेला
द्रुहिणमुखअमरपद बहु सुलभ त्याला ।
म्हणुनि घडि घडि घडति निरत शिवराणी
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥६॥
अतिकरुणदिठि करुन निरखि मज माये
लघुतनय गतविनय तरिहि शुभकाये ।
सदय करिं हृदय वरि पुरवुनि शिराणी
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥७॥
शरण त्व चरनयुगविण अणिक कांहीं
मज अखिल भुवनिं सति गति दुसरि नाहीं ।
अज अचल अमृतघृन वरससि कृपेनी
नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥८॥
जगजननि नुति अतुळ पदजलज भाळा
धरिल नर सतत तर परम पद त्याला ।
विमळ मति दृढ करुनि विहित समजा जी
विनवि निजगुज सुजनिं कविवर बनाजी ॥९॥
कुसुमशरसुवृत्तें निर्मिलें अष्टकातें
पढुनि नियतिपारा इष्ट उत्कृष्ट हातें ।
चहुंविध पुरुषार्थ पाववी भक्तिमंता
म्हणुनि अखिलवंद्या चिंतिजे आदिमाता ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 20, 2016
TOP