मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ५२ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ५२ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५२ Translation - भाषांतर अणिमाद्यैर्महिमभिरजाद्याभिर्विभूतिथिः । चतुर्विशतिभिस्तत्त्वैः परीता महदादिभिः ॥५२॥तेजःपुंज आदिमाया । जिणें ईश्वर आला आया । त्याही अनंत होऊनियां । करिती सपर्या पृथक्त्वें ॥७॥केवळ तमाच्या आकृति । जिहीं जीवित्व आणिलें व्यक्ती । त्या अविद्या अनेक मूर्ति । धरूनि अर्चिती अनंता ॥८॥माया ज्ञानें अभेदें भजती । अविद्या ममत्वें प्रेमा धरिती । ऐशा भजनाच्या उभय रीति । रायाप्रति शुक सांगे ॥९॥अणिमा गरिमा लघिमा महिमा । ईशत्व वशित्व प्राप्ति नामा । आठवी बोलिजे प्राकाम्या । या सिद्धि परमा अष्टमा ॥५१०॥अणिमा म्हणिजे अणूहूनि सान । होऊनि टाकिजे अभीष्टस्थान । अव्याहत त्रिजगीं गमन । हें सामर्थ्य गहन अणिमेचें ॥११॥सर्षप मात्र असतां स्पष्ट । होइजे मेरूहुनि गरिष्ठ । इच्छामात्रें किजे प्रकट । हें सामर्थ्य उत्कट गरिमेचें ॥१२॥मनीं उठतां संकल्पमात्र । महा थोर किजे गात्र । मेरूहूनि विशाळतर । हें चरित्र महिमेचें ॥१३॥थोर असोनि सान होणें । वायूहूनि चपळपणें । चमत्कारें सर्व करणें । हीं विंदाणें लघिमेचीं ॥१४॥इच्छामात्रें सकळ सृष्टि । करूनि प्रकट दाविजे दृष्टी । ईशत्वसिद्धीची हे रहाटी । दावूनि पोटीं सांठवणें ॥५१५॥वशित्व म्हणिजे ब्रह्मादिक । संकल्पमात्रें वहाती अंक । सेवा करिती होऊनि रंक । हा विवेक तयेचा ॥१६॥ब्रह्मांडगर्भीं जे जे वस्त । संकल्पमात्रें होय प्राप्त । कलाकौशल्यें विद्या समस्त । हा वृत्तांत प्राप्तीचा ॥१७॥मशकापासूनि ब्रह्मावरी । स्वेच्छानुसार सर्वांतरीं । संकल्प मात्र बुद्धि प्रेरी । हे थोरी प्राकाम्यासिद्धीची ॥१८॥ज्या ज्या दैवताच्या ज्या सिद्धि । तेथवरीच त्यांची प्राप्ति । इया महाप्रभूच्या विभूति । म्हणोनि व्यापिती आब्रह्म ॥१९॥या प्रभूच्या परिचारिकीं । यासि भुलतां शुद्ध साधकीं । भवप्राप्तीसी पडे चुकी । हे गोष्टि ठाउकी असूंद्या ॥५२०॥ज्या ज्या दासी या समस्तां । त्यांची वरितां सायुज्यता । अभेदें तत्पद चढे हाता । तेथ कायशी कथा सिद्धीची ॥२१॥असो या प्रभूच्या विभूति । एक एके मूर्तीप्रति । अनेक अष्टकें पृथक् भजती । हें आश्चर्य चित्तीं विधि मानी ॥२२॥अव्यक्त महदहंकार । तामस सात्त्विक राजसतर । मूर्तिमंत पृथक् प्रभूतें अर्चिती ॥२३॥अंतःकरणादि सात्त्विक सर्ग । तीं कर्तृकरणें होऊनि सांग । सगुण मूर्ति पृथक्पृथग् । करिती अनेक सपर्या ॥२४॥प्राणादि पांच चेष्टाकरणें । श्रोत्रादि पांच ज्ञानकरणें । वागादिकें कर्मकरणें । ये पृथक्सगुणें प्रभु भजती ॥५२५॥महादिक अष्टमूर्ति । तत्त्वाचिया चोवीस व्यक्ति । भंवत्या वेष्टूनि आराधिती । पृथक्मूर्ति प्रभूच्या ॥२६॥एवं अंतःकरण चतुष्टय । प्राण ज्ञान कर्म विषय । पृथक्पृथग् हे समुदाय । भजती सदेह प्रभूतें ॥२७॥महदादि अष्टधा प्रकृति । सूत्रात्मका षोडश विकृति । या पृथग् विवक्षें करूनि होती । चोवीस व्यक्ति तत्त्वांच्या ॥२८॥इये जगाचीं कारणें । महदादि सूत्रात्मकें भिन्नें । प्रकृति विकृति या अभिधानें । अष्टधा आणी जीवरूपा ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP