अध्याय ४७ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अपि बत मधुपुर्यामार्यपुत्रोऽधुनाऽस्ते स्मरति स पितृगेहान्सौम्य बंधूंश्च गोपान् ।
क्कचिदपि स कथा नः किंकरीणां गृणीते भुजमगुरुसुगंधं मृर्ध्न्यधास्यत्कदा नु ॥२१॥
अरे सौम्या भ्रमरावर्या । सारूनि गुरुकुळींची परिचर्या । आतां वसति वृष्णिधुर्या । मधुरापुरीं असे कीं ॥६४॥
मथुरापुरीं वर्तमान । आर्युपुत्र वसुदेवनंदन । कांहीं तरी नंदसदन । व्रजजनभुवन स्मरतसे ॥२६५॥
नंदयशोदेचें स्मरण । कीं स्वबंधु गोपगण । यमुनापुलिनीं गोवर्धन । करी आठवण कधीं तर्ही ॥६६॥
कोण्हे एके तर्ही समयीं । आम्हां किंकरींची कांहीं । कथवार्ता आपुले ठायीं । वदतो कांहीं कोणापें ॥६७॥
कधीं तर्ही परावृत्ति । करूनि येईल व्रजाप्रति । पूर्वस्नेहाची अनुस्मृति । आम्हां विश्रांति करील ॥६८॥
अगुरुपरीस सुगंधतर । आपुला भुज सुमनोहर । आमुचे मूर्ध्नींवरी सादर । कधीं श्रीधर ठेवील कीं ॥६९॥
आपुले तांबूल आमुचे वदनीं । केव्हां तर्ही तो चक्रपाणि । घालील ऐसी अमृत वाणी । आमुचे कानीं घालीं कां ॥२७०॥
श्रीशुक उवाच - अथोद्धवो निशम्यैवं कृष्णदर्शनलालसाः । सांत्वयन्प्रियसंदेशैर्गोपीरिदमभाषत ॥२२॥
कायवाचामनोभवें । कृष्णदर्शन प्राप्त हुआवें । याहूनि अवघे संसारमावे । माजूनि मानिनी निर्मुक्ता ॥७१॥
ऐसा गोपींचा भ्रमरगीत । उद्धवें परिसोनि इत्थंभूत । त्यांचा सप्रेम वृत्तांत । कृष्णीं निरत जाणवला ॥७२॥
कृष्णवेधें वेधल्या वृत्ति । तेणें विसरल्या संसारभ्रांति । सबाह्य बानली कृष्णप्रतीति । उद्धवा चित्तीं दृढ कळलें ॥७३॥
मग तयांच्या सांत्वनासी । उद्धवें विवरूनि निजमानसीं । बोलिला तें नृपापासीं । आह्लादेसीं शुक सांगे ॥७४॥
कठोर व्रजमणीचें आंग । वेधक वज्रशलाकाचि चांग । तैसा कृष्णवेधें प्रसंग । सांत्वना योग्य कृष्णोक्ति ॥२७५॥
कृष्ण गोपींचा प्रियतम प्राण । त्याचे संदेश परम प्रमाण । ऐसें उद्धवें विवरूनि पूर्ण । हें भाषण आदरिलें ॥७६॥
सहा श्लोकीं तें निरूपण । शुकें नृपासि कथिलें पूर्ण । तेंचि हरिवरदभाषाकथन । कीजे श्रवण सज्जनीं ॥७७॥
उद्धव उवाच - अहो यूयं स्म पूर्णार्था भवत्यो लोकपूजिताः ।
वासुदेवे भगवति यासामित्यर्पितं मनः ॥२३॥
अहो ऐसें आश्चर्य परम । तुमचें मानस मेघश्याम । होऊनि विसरलें संसारश्रम । प्रेमसंभ्रम सौभाग्यें ॥७८॥
तुमच्या वृत्ति कृष्णाकारा । यास्तव कृतार्था प्रेमनिर्भरा । लोकपूज्या सनकादिवरां । तुम्ही विधिहरां पूज्यतमा ॥७९॥
विश्वनिवास वासुदेव । तोचि लीलावसुउदेवप्रभव । षड्गुणैश्वर्य अच्युतविभव । तुमचा सद्भाव तच्चरणीं ॥२८०॥
यालागीं तुम्ही परम पूता । ब्रह्मादि षड्गुणैश्वर्य अच्युतविभव । पूज्या पूज्यतमा पूर्णार्था । सत्संगता हरिप्रेमें ॥८१॥
ते हे आत्यंतिकी भक्ति । परम दुर्लभ जिची प्राप्ति । आकल्प साधनाची संपत्ति । तैं लाहती तुम्हां ऐसे ॥८२॥
म्हणाल कैसीं तियें साधनें । ऐका तयांचीं स्वरूपज्ञानें । भाग्यें फळतीं अविघ्न पुण्यें । निर्वाणभजनें ऐसीं तैं ॥८३॥
दानव्रततपोहोमजपस्वाध्ह्यायसंयमैः । श्रेयोभिर्विविधैश्चान्यैः कृष्णे भक्तिहिं साध्यते ॥२४॥
दानें व्रतें तपें तीव्र । नित्य नैमित्त होमाध्वर । स्वाधायजपादि संयमपर । शौचाचारपूर्वक ॥८४॥
नवविधभजन निष्ठा नेम । तीर्थयात्रा अनुक्रम । माता पिता द्विजसत्तम । गुरुपदप्रेम उपासना ॥२८५॥
इत्यादिसाधनें श्रेयस्करें । निश्काम भगवत्प्राप्तिकरें । भूतदयादि विविधें अपरें । पुण्यप्रचुरें बहु जन्मीं ॥८६॥
इहामुत्रप्रदें साधनें । तें फळ साक्षेपें काम्यें गौणें । निषिद्धें आसुरें अशौचाचरणें । नरकयातनें भोगविती ॥८७॥
भगवत्प्राप्तिकरें पुण्यें । फळतीं निष्कामें साधनें । ऐका तयांचीं लक्षणें । पदव्याख्यानें कथिजत्ती ॥८८॥
जें जें दातव्य त्या नांव दान । तेथील शुद्ध विधि विधान । निगमपरायण तपस्वी पूर्ण । दानभाजन शुद्धात्मा ॥८९॥
प्रत्युपकरणाचिया शब्दा । न करी प्रस्ताव अनुमोदा । कायावाचामानसें कदा । खेदानंदा स्पर्शेना ॥२९०॥
दानपात्र लाहोनि ऐसे । चित्तशुद्धि देशविशेषें । पुण्यकाळीं ईश्वरोद्देशें । दानें अशेषें निष्कामें ॥९१॥
संपत्तिसंपन्न असतां पूर्ण । यथोक्तपात्रीं नित्यदान । नैमित्तिकीं विशेषें करून । कीं याच्यामान सत्पात्रें ॥९२॥
लाहूनि निर्दोष द्रव्यसंपत्ति । भगवद्भावें सप्रेम भक्ति । पात्रगौरव यथास्थिति । सत्कार उचितीं समर्पन ॥९३॥
दान शब्दाचा विवेक । दान म्हणिजे मदोदक । तें अष्टधा पृथक पृतक । संकल्पपूर्वक सोडणें ॥९४॥
स्वसत्तेतें निवर्तवणें । पात्रसत्ता उत्पादनें । इदं ते न मम इत्यादि वचनें । प्रतिगृह्यतां गृह्णामि ॥२९५॥
वेदवेत्ता तपोहीन । तये ठायीं पात्रता गौण । अनाध्यायी तपस्वी पूर्ण । तोही गौण पात्रात्वीं ॥९६॥
वेदाध्यायी आणि तपस्वी । वेदोक्तकर्माचरणपदवी । संतुष्टमानस सर्वभावीं । तैं त्या शोभवी पात्रता ॥९७॥
नामगोत्र शाखाध्ययन । परस्परें उच्चारून । प्रतिगृह्यतां प्रतिग्रहणं । त्यागादान उभयत्र ॥९८॥
ऐसिया रीती गोभूतिळ । कांचन वसनें धान्यें सकळ । अश्वगजरथफलदलजळ । सोक्ष्मस्थूळअन्नादि ॥९९॥
यथायोग्य पात्रानुरूप । संपन्न द्रव्य अल्पस्वल्प । यथाधिकारें कृतसंकल्प । निष्कामकल्प सर्वत्र ॥३००॥
अधीताहूनि तदनुष्ठाता । त्याहूनि श्रेष्ठ आत्मवेत्ता । वेदवेदान्तपारंगता । शांता विरक्ता पात्रत्व ॥१॥
कायावाचमनें करून । संकल्पिलें नेदी दान । त्याचें आकल्प नाशे पुण्य । पापसंपन्न तो होय ॥२॥
जेत्थ पात्र आशाबद्ध । दास्यासि बोधे परुषवाद । अथवा दाता द्रव्यलुब्ध । देऊनि खेद मग मानी ॥३॥
तयां उभयां नरकावाप्ति । ऐसी धर्मवादव्युत्पत्ति । एवं प्रतिश्रुत जे नेदिती । ते अधःपाती सर्वत्र ॥४॥
तैसिचि जाणा दत्तापहारी । नरकवासी आकल्पवरी । दानीं ऐसी दोषसामग्री । निरयाधिकारी करीतसे ॥३०५॥
ईश्वरकृपावरदबळें । देश काळ पात्र मिळे । द्रव्य शुद्ध चित्तें अमळें । विनियोग कळे यथोचित ॥६॥
येरवीं कोण्हीएक अंग । न्यून असतां होय व्यंग । तें तत्सदादिमंत्रें सांग । कीजे अव्यंग हरिस्मरणें ॥७॥
परंतु अवंचक सप्रेमळता । निष्कामप्रेमें श्रीभगवंता । भजतां कर्मासि साद्गुण्यता । येरां विगुणता ठेविली ॥८॥
भगवत्प्राप्तीचीं साधनें । ऐसीं सुसंपन्नें दानें । हरिहरव्रतें निष्कामपुण्यें । येरे गौणें सकामें ॥९॥
पतिव्रता वरिल्या पति । तन्निष्ठव्रताचरणीं मति । तैसी निष्ठा अंगीकृतीं । व्रतसंपत्तिपूर्वक ॥३१०॥
येर्हवीं व्रतें तीनसेंसाठी । कळिकाळाच्या सुभगांपाठीं । लागली तयांची राहटी । कोणे कोटी माजि गणिजे ॥११॥
एक्या घायें पाविजे मरण । तरी कां धुंडिजे अवघें रण । तारक एक व्रताचरण । वृथा विचरण सैराट ॥१२॥
रुक्मांगदें एकादशी । एकचि साधिली निश्चयेंसीं । कीं अंबरीषें द्वादशी । कृतनियमेंसीं वरियेली ॥१३॥
कीं कौंडिन्यें अनंतव्रत एकचि । करूनि जाला पूत्त । अनेकव्रताचर्रनपंथ । विषपोटार्थ कळिकाळीं ॥१४॥
दीक्षाग्रहण औपासन । गुर्वाराहन पितृभजन । अतिथिपूजन पतिसेवन । नियमें वरून व्रत कीजे ॥३१५॥
एवं जें जें अंगीकृत । कायवाचामनेंसहित । नियमपूर्वक दृढव्रत । हरिप्रीत्यर्थ निष्काम ॥१६॥
ऐसीं व्रतें जीवें साठी । करूनि आचरतां भगवत्तुष्टी । वांचोनि कामनेची गोष्टी । सहसा पोटीं न धरती ॥१७॥
तें इयें निष्कामव्रताचरणें । आतां तपाची लक्षणें । तेंही ऐका निरूपणें । यथाव्याख्यानें कथिजती ॥१८॥
दृढ नेमें जें वरिलें व्रत । तें आचरिजे अतंद्रित । हाचि तपशब्दाचा अर्थ । पृथक् किमर्थ वाकाणूं ॥१९॥
कायावाचामनें करून । त्रिविध तपाचें लक्षण । ईश्वरनिष्ठा तनुशोषण । निष्कामपुण्य लक्षूनी ॥३२०॥
तेचि तनुशोषणाची परी । कृच्छ्रचांद्रायणाची परी । निरूपिजेल ग्रंथाधारीं । चमत्कारीं अतिस्वल्प ॥२१॥
एके दिवशीं एकभुक्त । दुसरे दिवशीं कीजे नक्त । तृतीय दिवह्सीं अयाचित । केवळ चतुर्थ उपोषण ॥२२॥
या नाम बोलिजे पातकृच्छ्र । पर्णकृच्छ्राचा प्रकार । श्रोतीं होऊनि सादर । सविस्तर परिसावा ॥२३॥
वट उंबर राजीव बिल्व । क्रमेंकरूनि यांचे पल्लव । कुशोदकपानें पांचवा देव । कीजे निर्वाह पर्णकृच्छ्रीं ॥२४॥
पेंडीभक्षण एके दिवसीं । एकांतरें शुद्धोपवासीं । क्रमें उदकतक्रसवतूशीं । दिनाष्टकेंसीं सौम्यकृच्छ्र ॥३२५॥
प्रातस्त्रिदिन हविशान्न । त्रिदिन सायं हविर्भोजन । त्रिदिन अयाचित हविपान्न । त्रि उपोषण मध्यकृच्छ्र ॥२६॥
ग्रासमात्र प्रभाते प्रथम । द्वितीय सायाह्नीं तितुकाचि नेम । ग्रास एक अयाचित धर्म । तृतीय दिवशीं भक्शणें ॥२७॥
चतुर्थादिवशीं उपोष्बण । अतिकृच्छ्राचा एक चरण । अपर अतिकृच्छ्रलक्षण । श्रोते विचक्षण परिसतु ॥२८॥
एकैक ग्रास प्रातस्त्रिदिन । तैसेंचि एकैक सायं त्रिदिन । अयाचित एकैक ग्रास त्रिदिन । त्रि उपोशण अतिकृच्छ्र ॥२९॥
प्रातस्त्रिदिन हविर्भोजन । तैसेंचि सायाह्नीं त्रिदिन । त्रिदिन अयाचित हविपाशन । त्रि उपोषण प्राजापत्य ॥३३०॥
एक दिवशीं गोमूत्रपान । द्वितीय दिवशीं गोमयाशन । तृतीय दिवशीं गोक्षीरग्रहण । दधिसेवन चतुर्थीं ॥३१॥
गोघृताशन पंचमेहनि । षष्ठीं कुशोदक प्राशूनी । एक रात्र उपोषणीं । कृच्छ्रसांतपन या नांव ॥३२॥
शुक्लपक्शीं एकैक ग्रास । पूर्णिमेपर्यंत कीजे र्हास । तेथून वर्धविजे ग्रासांस । अमावास्येस परिपूर्ति ॥३३॥
हा एक चांद्रायणाचा पक्ष । अपर पूर्णिमेपासूनि लक्ष । ग्रासा र्हास करिती दक्ष । पुनः सपएक्ष पूर्णिमा ॥३४॥
असो कृच्छ्रीं चांद्रायणीं । पश्चात्तापें तनुशोषणीं । तपश्चर्या करिती मुनि । चित्तशोधन प्रवर्तती ॥३३५॥
ज्ञानें होय मलक्षालन । अन्न शुद्ध सत्यें करून । विद्या तपें तनुशोषण । चित्तशोधन सत्कर्में ॥३६॥
ज्ञानें होय बुद्धि शुद्ध । इत्यादि स्थूलतपोनुवाद । अधिकार उजळलिया दुःखद । सहसा विरुद्ध मग न रुचे ॥३७॥
एकनिष्ठ भगवद्रति । ते काळींची तपःसंपत्ति । कायिका वाचिक मानसगति । तपोभिव्यक्ति गुणभेदें ॥३८॥
शैवी वैष्णवी उपासना । तदर्थ करितां कर्माचरणा । नियमपूर्वक तनुशोषणा । कायिक संज्ञा त्या होय ॥३९॥
कीं गुरुगृहींचा परिचारक । होऊनि परिचर्या सम्यक । एकनिष्ठा निष्कामुक । हेंही कायिक बोलिजे ॥३४०॥
आणि गुरुसमान जे जे प्राज्ञ । त्यांचें कीजे दास्याचरण । सर्वभावें विप्रार्चन । परोपकरण सर्वत्र ॥४१॥
नित्य नैमित्त शौचाचारें । ब्रह्मचर्यादि व्रतनिर्धारें । भूतदया सरलांतरें । निर्विकारें तपोनिष्ठा ॥४२॥
ऐसें शुद्ध कायिक तप । ईश्वरप्राप्तीचा संकल्प । अन्य कामना नुपजे अल्प । वाद्मयजल्प तो ऐका ॥४३॥
प्राणिमात्रांचें ज्यामाजि हित । शंकाभयोद्वेगरहित । जगत्प्रियकर आणि सत्य । परमार्थ सुनिश्चित मितवाक्य ॥४४॥
द्विजालागीं श्रुतीचें पठन । सामान्यवर्णा स्तोत्रपुराण । कीं एकनिष्ठ नामस्मरण । कामनाशून्य अविकारे ॥३४५॥
या नांव बोलिजे वाड्मय तप । शरीरक्लेशीं न करितां अल्प । ईश्वरप्राप्तीचा उजळी दीप । जेंवि सुरपादप कृषिरहित ॥४६॥
मानसतपाचें लक्षण । निर्विकार सुप्रसन्न । आपणा लक्षूनि आपण । निश्चळ उन्मन पूर्णत्वें ॥४७॥
इक्षूपासूनि निवडला रस । खंडपर्यंत विकारविशेष । मग जे मिष्ठताचि निःशेष । तेंवि मानससौम्यता ॥४८॥
इंद्रियव्यापार मांदुळती । मुनिमर्यादामौनवृत्ति । सबाह्य प्रकटे आत्मस्थिति । बाह्यप्रकृति नुमसतां ॥४९॥
आत्माकारकरित मन । आत्मारामचि सुखसंपन्न । भावाभावसंकल्पशून्य । मानससाधनतप ऐसें ॥३५०॥
मखजपसंयमस्वाध्याय । अन्य विविध श्रेयोपाय । अनंत जन्में साधितां होय । साध्यभक्ति श्रीकृष्णीं ॥५१॥
उद्धव म्हणे गोपींप्रति । ऐसी आत्यंतिकी भक्ति । अनंतजन्मकृतसुकृतीं । तुम्ही श्रीपति अनुभविला ॥५२॥
श्रोते शंका करिती येथ । होमस्वाध्यायदनादि व्रत । वर्णविशेषें पुरुषांसि उक्त । स्त्रिया येथ अनर्हा ॥५३॥
तरी जायापरिग्रह असे ज्यांसी । तेचि अधिकारी ग्रुहमेधासी । तेथींच्या अच्छिद्र सुकृतासी । दंपतीसि अधिकार ॥५४॥
म्हणोनि गोपींचीं सुकृतें । उद्धवें अनुमानिलीं तियें सत्यें । निष्कामकर्में जन्में बहुतें । तैं सप्रेमभरितें हरिभक्ति ॥३५५॥
व्रजवनितांतें उद्धव म्हणे । ऐसी अगाध तुमचीं पुण्यें । भूतभविष्यवर्तमानें । कोण्ही तुलने न तुलती ॥५६॥
भगवत्युत्तमश्लोके भवतीभिरनुत्तमा । भक्तिः प्रवर्तिता दिष्ट्या मुनीनामपिप दुर्लभा ॥२५॥
उत्तमश्लोक श्रीभगवान । अतितर श्रेष्ठ तत्प्रेम गहन । तुमच्यय अदृष्टपुण्येंकरून । असाध्यसाधन हें घदलें ॥५७॥
येर्हवीं ऐसी दुर्लभ भक्ति । निसर्गजनित भगवद्रति । अनन्तजन्मार्जितसुक्रुतीं । त्या मुनींहीप्रति दुर्लभ पैं ॥५८॥
अदृष्टपुण्य म्हणाल कैसें । तें कथिजेल दैवविशेषें । जेणें तोडिले भवसुखफांसे । स्वस्थमानसें तें परिसा ॥५९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP