अध्याय ७३ वा - श्लोक ५ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
पिबंत इव चक्षुर्भ्यां लिहंत इव जिह्वया ॥५॥ जिघ्रंत इव नासाभ्यां रंभंत इव बाहुभिः ।
प्रणेमुर्हतपाप्मानो मूर्धभिः पादयोर्हरेः ॥६॥
अनंतकोटि जन्मासाठीं । दुर्लभ ध्यान देखिलें दृष्टी । तेणें नृपांची प्रेमपुष्टी । वदतां गोष्टीमाजि न पवे ॥३९॥
नयनचकोरां चिरकाळ क्षुधा । तद्वत् प्राशिती लावण्यसुधा । रसना रसाळ हरिरसस्वादा । जेंवि कां समुदा चाटिती ॥४०॥
चरणपद्में करपंकजें । वदनारविन्द नयनाम्भोजें । हृदयजलजासह विराजे । वनजवनवत् वनमाळी ॥४१॥
तेथें नृपांचीं आसक्तपणें । भृंगन्यायें जिघ्रती घ्राणें । कीं हरिनभोगर्भा आलिङ्गनें । दिड्मय बाहु नृपांचे ॥४२॥
ऐसे सप्रेम सर्व नृपति । विह्वळ आनंदें संलग्नमूर्ति । कवळिते झाले भगवन्मूर्ति । तें वाग्वृत्ती वदवेना ॥४३॥
तथापि वदलों उद्देशमात्र । यानंतरें कमलामित्र । भूभुजीं वदला तो प्रकार । परिसा श्रोतृसाफल्यें ॥४४॥
ऐसें सप्रेम भगवद्ध्यान । कवळितां तया नृपांचें मन । आकल्पपातका क्षालन । झालें दर्शनप्रभावें ॥४५॥
यावरी मस्तकें चरणांवरी । ठेवूनि राजे नमिती हरि । कृष्णदर्शनाह्लाद शरीरीं । सप्रेमभरीं उथळला ॥४६॥
कृष्णसंदर्शनाह्लादध्वस्तसंरोधनक्लमाः । प्रशशंसुर्हृषीकेशं गीर्भिः प्रांजलयो नृपाः ॥७॥
त्यामाज मागधबंधींचे क्लेश । हारपोनि गेले निःशेष । बद्धांञ्जळि हृषीकेश । स्तवितो दासवत वदनें ॥४७॥
कृष्णप्रशंसा करिती मुखें । कृष्णप्रताप गाती सुखे । कृष्णदर्शनप्राप्तिहरिखें । नाचती तोखें निःशंक ॥४८॥
तया नृपांहीं केलें स्तवन । तें तूं ऐकें सावधान । परीक्षितीतें व्यासनंदन । कथी तें श्रवण कीजे श्रोतीं ॥४९॥
राजान ऊचुः - नमस्ते देवदेवेश प्रपन्नार्तिहराव्यय । प्रपन्नान्पाहि नः कृष्ण निर्विण्णान्घोरसंसृतेः ॥८॥
अशुभाधिक्यें तिर्यक्जीव । तुल्यशुभाशुभें मानव । शुभसुकृताधिक्यें देव । एवं सर्वत्र त्रिजग हें ॥५०॥
तिर्यड्मर्त्या देव वर । देवां देव पुरंदर । पुरंदरचा जो ईश्वर । तो तूं श्रीधर श्रीकृष्ण ॥५१॥
आणि तूं प्रपन्नार्तिहरण । शरणागतांसि शरण्य । ब्रह्मप्रतिपादक ब्रह्मण्य । अक्षर पूर्ण अव्यय तूं ॥५२॥
शरणागतां वज्रपंजर । ऐसा बिरुदाचा बडिवार । आम्हां प्रपन्नां नाभीकार । देऊनि दुस्तर भय निरसीं ॥५३॥
तूं जरी म्हणसी भो श्रीपति । दूतमुखें मी तुमची आर्ति । ऐकूनि वधिला मगधपति । भयाची खंती कां आतां ॥५४॥
तरी ऐके गा वृष्णिनाथा । मागधभयाची केंतुली कथा । जन्ममरणाची घोर व्यथा । ते संसृति सर्वथा छेदावी ॥५५॥
असतों राज्यभोगीं आसक्त । तरी नेच्छितों संसृतिघात । मागधें रोधितां क्लेश बहुत । भोगूनि विरक्त झालों पैं ॥५६॥
म्हणूनि संसृतिनिरसना । करूनि रक्षीं पदप्रपन्नां । इतुकी सेवेंसी प्रार्थना । करुणापूर्णा अवधारीं ॥५७॥
जरी तूं म्हणसी भो श्रीपति । निष्काम वर्णाश्रमवृत्ति । उभयभोगीं अनासक्ति । रागद्वेषान्ति अपवर्ग ॥५८॥
तुम्ही मागधा मानां दुष्ट । विपक्षें तदसूयाविष्ट । सकाम उभयभोगनिष्ठ । तरी संसृतिकष्ट केंवि चुकती ॥५९॥
ऐसें न म्हणें मधुसुदना । मागधप्रसादें तुझिया चरणां । अनुसरलों हा अनुग्रह जाणा । करूनि कल्याणा पावविलों ॥६०॥
आठां श्लोकीं हें निरूपण । विरागें वदला भूभुजगण । राया ऐकें तें व्याख्यान । सावधान क्षण एक ॥६१॥
नैनं नाथान्वसूयामो मागधं मधुसूदन । अनुग्रहो यभ्दवतो राज्ञां राज्यच्युतिर्विभो ॥९॥
भो भो अनाथनाथा हरि । आम्ही मागधा न मानूं वैरी । त्यातें न निन्दूं वैखरीं । अनुग्रहकारी तो आमुतें ॥६२॥
कैसें अनुग्रहिलें म्हणसी । ऐकें मधुसूदना हृषीकेशी । तुझा अनुग्रह हा आम्हांसी । मूळ व्हावयासी मागध पैं ॥६३॥
तूं अनुग्रहूं ज्या इछिसी । त्याचें सर्वस्व हरण का सी । अकिञ्चनत्व बाणे जयासी । तव कृपेसी तो अर्ह ॥६४॥
आम्हां राजयां राज्यच्युति । हा तवानुग्रह निश्चिती । यासि निमित्त मागधपति । केंवि त्याप्रति आम्ही निन्दूं ॥६५॥
मागधविषयीं अनसूय आम्ही । हें या श्लोकीं कथिलें स्वामी । यावरी विरक्त उभय धामीं । निर्वाणकामीं केंवि ऐक ॥६६॥
राज्मैश्वर्यमदोन्नद्धो न श्रेयो विंदते नृपः । त्वन्मायामोहितोऽनित्या मन्यते संपदोऽचलाः ॥१०॥
ऐश्वर्य म्हणिजे सर्व संपत्ति । राज्य म्हणिजे राष्ट्रपशक्ति । या दोहीं करूनि मदोन्मत्ति । अनर्गळवृत्ति उच्छृंखळ ॥६७॥
राज्यैश्वर्यमदेंकरून । अंध झाले विवेकनयन । कृत्याकृत्य नुमजे पूर्ण । विषयाचरण प्रिय वाटे ॥६८॥
अभीष्टविषयासाधक मित्र । विषयरोधक तो अमित्र । आत्मा भावूनि पुत्रकलत्र । स्वगात्र पात्र नृपभोगा ॥६९॥
स्वगात्र भोगाचें भाजन । मानूनि विचरे यथेष्टाचरण । चारी पुरुषार्थ पडिले शून्य । एवं कल्याण नृप न पवे ॥७०॥
इहलोकींची ऐशी रीति । यावरी आमुष्मिकाची स्थिति । तुझे मायेनें मोहितमति । ते वांच्छिती स्वर्गसुख ॥७१॥
म्हणती इहलोक अशाश्वत । स्वर्गसंपदा अचळ नित्य । यालागीं ऋतु शतानुशत । मायामोहित आचरती ॥७२॥
जंववरी होय पुण्यक्षय । तंववरी स्वर्गीं वसती होय । रागादिशत्रूंचा समुदाय । सेवितां विषय पुण्य हरी ॥७३॥
स्वर्गभोगें सुकृत वेंचे । मग ते पात्र अधोगतीचें । अनेक योनि भोगितां जाचे । गर्भी पचे नरकघटीं ॥७४॥
विद्युत्प्राय अनित्य तरळ । स्वर्गसंपदा चंचळ बहळ । मायामोहित जे केवळ । सुरश्री निश्चळ नित्य म्हणती ॥७५॥
यदर्थीं राया दृष्टान्त ऐक । परीक्षितीसि म्हणे शुक । भगवन्मायेचें कौतुक । नृप सम्यक निरूपिती ॥७६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP