मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| आरंभ अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः ॥ श्रीपाण्डुरंगसहाय । जयजय जनका जगन्मया । जगदुत्पत्तिस्थितिलयनिलया । जगत्कल्यणकीर्तिनिचया । श्रीगुरुवर्या गोविन्दा ॥१॥तव पदस्मृतीचा सोज्ज्वळ तरणी । प्रकट होतां हृदयगगनीं । हरिगुणपरागें मतिकमलिनी । विद्वद्भृंगा निमंत्री ॥२॥त्रिसप्ततितमाध्याया अंतीं । ऐकोनि जरासंधशान्ति । अष्टभावांची सुखोत्पत्ति । धर्माप्रति उपलब्ध ॥३॥तेणें ताटस्थ्य तनूच्या ठायीं । वाचेशीं मौनमुद्रा पाहीं । ते विमुक्त ये अध्यायीं । करूनि बोले युधिष्ठिर ॥४॥तो हा चौतःसप्ततितम । अध्याय परिसा उत्तमोत्तम । ज्यामाजी राजसूयसंभ्रम । चैद्य अधम निवटेल ॥५॥यज्ञसंकल्पार्थ मागध । भीमहस्तें पावला वध । येथ मखान्तीं द्वेष्टा चैद्य । वधील आद्य जगदात्मा ॥६॥हें सविस्तर निरूपण । ये अध्यायीं कीजे श्रवण । वक्ता व्यासाचा नंदन । सावधान म्हणे नृपा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP