मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८१ वा| आरंभ अध्याय ८१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४१ अध्याय ८१ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । अपार अनंत अक्षय्य सुख । सन्मात्र स्वप्रकाश सम्यक । तो तूं पूर्णत्वें देशिक । भवाब्धितारक गोविंदा ॥१॥तवपदप्रणतिप्रसादप्रज्ञा । लाहोनि शिरसा वंदिली आज्ञा । भागवतदशमस्कंधव्याख्याना । अशीतिपर्यंत उपलविलें ॥२॥तेथ अशीतितमाध्यायान्तीं । ब्राह्मणें संवादी श्रीपती । मायानाट्यलाघव व्यक्ती । आणूनि मधुरोक्ति तोषविला ॥३॥एकाशीतितमाध्यायीं । द्विजोपायन शेषशायी । पृथुक भक्षूनि लोकत्रयीं । दुर्लभ श्री दे निर्मूनी ॥४॥तेचि आतां नृपाप्रति । निरूपील जे शुकभारती । सावध सप्रेमळीं श्रोतीं । एकाग्रवृत्ती परिसावी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP