निरंजन माधव - प्राकृत गद्याचा नमुना
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.
[श्रीशंकराचार्यांच्या ’वाक्यसुधा’ नामक ग्रंथावर निरंजनमाधवांनीं ’बोधप्रदीपिका’ नामक एक गद्य टीका लिहिली आहे. दीडशे वर्षापूर्वीच्या मोरोपंती काळांतला गद्याचा नमुना म्हणून त्या प्रदीपिकेंतले एक दोन उतारे पुढे देत आहें.]
" आतां वाक्यसुधानाम ग्रंथ श्रीशंकर भगवत्पूज्यपादकृत त्याची टीका प्राकृतभाषेकरुन कविं निरंजन करिताहे । त्यास प्राकृत म्हणिजे अपशब्द होय असें असतां करावयासी प्रयोजन काय म्हणाल तरि प्राकृत अर्थानृत असिले तरि दोषावह आहे । शब्दानृत दोषावह नव्हे । म्हणवून बालबोधार्थ रुचिजेत आहेत । ‘काव्यलापांश्च वर्जयेत्’ असा संस्कृत अर्थानृत शब्दाचाही निषेध केला आहे.
श्रीभागवते श्लोक: -
स वाग्विसर्गो जनताघविप्लवो
यस्मिन्प्रतिश्लोकमबद्धवत्यपि ।
नामान्यतंतस्य यशोंकितानि यत् ।
शृण्वति गायन्ति गृणन्ति साधव: ॥
म्हणून शब्दानृत अंगिकारलें आहे आणखी प्रमाण: -
संस्कृतै: प्राकृतैर्वापि गद्यपद्याक्षरैस्तथा ।
देशभाषादिभिश्चैनं बोधयेत्सद्गुरु: स्मृत: ॥
ऐसीं वाक्ये आहेत पुरातन शिष्टही प्रवर्तले आहेत । हें पाहुन मीही प्रवर्तलों आहें । गुरुशिष्यसंवादरुपेंकरुन तत्वमसि वाक्य प्रवृत्त झालें. त्यामध्यें त्वं पदार्थ जीव त्याचा विवेक श्लोकेंकरुन प्रथ करिजेतो ।
रुपं दृश्यं’ ह्या पहिल्या श्लोकावरीत टीका पहा: -
" रुप म्हणिजे रंजन ते सातां प्रकारचे ते प्रकार सांगतो । शुक्ल १ रक्त २ पीत ३ नीळ ४ हरित ५ कपिल ६ चित्र ७ हे सप्त प्रकार । आणखी रुप म्हणेजे आकार स्थूळ १ सूक्ष्म २ र्हस्व ३ दीर्घ इत्यादि नाना प्रकार । ऐसें दों प्रकारांची रुपें त्यांचे ग्राहक चक्षुर्द्वारां निर्गत जे अंत:करणवृत्ति तिचा ज्या विषयासी संबंध होईल त्या विषयास दृश्य म्हणावें । आतां मन म्हणिजे काय ।
अंत:करण । अंत:करण म्हणीजे काय । पद्माच्या कलिकेसारिखें नाभीपासून वीतभर ग्रीवास्थिखालें मांसगोलक आहे त्यास भाषेंकरुन काळिज म्हणताहेत । त्यास अंत:छिद्र आहे त्यांत अग्नि आहे. त्यांत अग्नीकरुन आपादमस्तक उष्ण राहतें । त्या अग्नीची शिखा सूक्ष्म कुशाग्राप्रमाणें आणि नीवार शुकाप्रमाणें सूक्ष्म अत्यंत अहे त्या शिखेचें नाम अंत:करण । तेणेकरुन अव्यवहार्य जो परमात्मा व निर्गुण चिद्रूप तो शिखावाच्छिन्न झाला असतां शिवविष्णुब्रह्मेंद्रादिक व्यवहारी पुरुषनामधारी होतो ।
केवळ चिद्रूप अक्षर परमस्वप्रकाश असें जें ब्रह्म त्या ब्रह्मासी उपाधिभूत जें तैज अंत:कर्णवृत्ति त्या वृत्तिकरुन व्यापिला जो विषय तो दृश्य म्हणवितो । हा अर्थ कोठील म्हणाल तर नारायणोनिषत् प्रमाण आहे तें हें । चतुर्वृत्त्यात्मक मन अंतर्वृत्यात्मक होत्सातें आत्म्यास दृश्य होतें । कैसें म्हणाल तर अन्यत्र अभुवन्नादर्शमिति । श्रुतीनें सांगितलें कीं माझें बोलतें यावरुन हें मन आत्म्यास दृश्य झाले. आत्मा द्रष्टा साक्षी तो दृश्य होत नाहीं ---------
N/A
References : N/A
Last Updated : February 28, 2018
TOP