निरंजन माधव - श्रीअद्वैतभावनापंचदशी

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


श्रीमच्छंकरभारती गुरुवरीं सच्छिष्य तारावया ।
केली ज्ञानसुधामयी सुघुटिका मीं ब्रह्म भावावया ॥
ते तद्वंदनपूर्वकें अनुभवें आणोनि चित्तांतरीं ॥
टीका प्राकृत वर्णिली सुचतुरीं सेवावया माधुरी ॥
मू. - क्षणं ब्रह्माहस्मात य: कुर्यादात्मचिंतनम्‍ ।
तन्महापातकं हंति तम: सूर्योदयो यथा ॥१॥
टी० - क्षणेक ब्रह्म मी ऐसें आत्मचिंतन जो करी ॥
तमा सूर्योदयो जैसा ते महापातकें हरी ॥२॥
मू.- अज्ञानाब्दुब्दुदो जातो ह्याकाशं बुब्दुदोद्भवं ॥
आकाशाद्वायुरुत्पन्नो वायोस्तेजस्तत: पय: ॥
पयस: पृथिवी जाता ततो व्रीहियवादिकं ॥२॥
टी० - अज्ञानें भासलें मूळीं महत्तत्वाख्य बुद्बुद ॥
बुद्बुदीं जन्मलें व्योम व्योमापासोनि मारुत ॥३॥
तेज आप तसी पृथ्वी एकमेकाहुनी क्रमें ॥
उत्पन्न झालीं धान्यें हीं पृथ्वीपासोनि संक्रमें ॥४॥
मू.- पृथिव्यप्सु पयो वन्हौ वन्हिर्वायौ नभस्यसौ ॥
नभोप्यव्याकृते तच्च शुद्धे शुद्धोस्म्यहं हरि: ॥३॥
टी० -पुन्हा पृथ्वी विरे आपीं आप अग्नीमधें जिरे ॥
तेज ग्रास करी वायू स्वयें व्योमांतरीं शिरे ॥५॥
नभ तेंही महतत्त्वीं तेंही अज्ञानजाठरीं ।
शुद्ध स्वरुपीं अज्ञान नुरे मायाविवर्त्त हा ॥६॥
तेव्हां उरेल जें शुद्ध परमात्मस्वरुप जें ॥
तेचि स्वात्मानंदरुप आत्मा तो मींच श्रीहरी ॥७॥
मू. - अहंविष्णुरहंविष्णुरहंविष्णुरहंहरि: ॥
कर्तृभोक्त्रादिकं सर्वं तदविद्योत्थमेव च ॥४॥
टी० - मीं विष्णु मीं विष्णु मीच साक्षाद्धरीच मीं ॥
कर्तृत्व भोक्तृत्व मातें अज्ञानास्तव मानिजे ॥८॥
मू. अच्युतोहमनंतोहं गोविंदोहमहं हरि: ॥
आनंदोहमशेषोहमजोहममृतोस्म्यहं ॥५॥
टी० -मद्रूपी च्युति ते नाहीं, अंत वेदासी नाकळे ॥
इंद्रियें वळितों मी तो गोविंद, हरितां हरी ॥९॥
दु:खादि द्वंद्व मद्रूपीं नाहीं आनंद मी तदा ॥
व्यापलों निश्चयें मींच अशेषीं एक सर्वदां ॥१०॥
नव्हे कदां देहसंगें म्हणोनी अज मी असें ॥
मरे देह मरेना मी आहे अमृत सर्वसें ॥११॥
मू.- नित्योहं निर्विकारोहं निर्विकल्पोहमव्यय: ॥
सच्चिदानंदरुपोहं पंचकोशातिगोस्म्यहम्‍ ॥६॥
टी० -दृश्यभास लया जातां नित्य मीं सर्वदा असे ॥
दृश्य तें षडविकारांहीं व्यापिलें भिन्न मीं दिसे ॥१२॥
मायादि कल्पना जे ते मद्रूपीं रज्जु सर्पिणी ॥
प्रपंच विलया जातां उरे अव्यय मी झणीं ॥१३॥
अनाद्यास्तित्वसत्ता मी सत्तेनें सर्व वर्तवीं ॥
चैतन्यें चेष्टवीं सर्व आनंदें विश्व भासवीं ॥१४॥
अन्नप्राणमनोविज्ञानानंदमय पांचही ॥
कोश प्रकाशवीं मी ते वसे त्यांहुनि भिन्नहीं ॥१५॥
मू.- अकर्ताहमभोक्ताहमसंग: परमेश्वर: ॥
अहमेव परंब्रह्म वासुदेवाख्यमव्ययं ॥७॥
टी० - घडे प्रपंचघटणा मद्रूपीं मीं करीचिना ॥
विषयां भोगिजे चित्तें मत्सत्ते मीं न भोगिता ॥१६॥
मायादिसंग तो नाही मज नि:संग मीं वसें ॥
सर्वाध्यक्ष स्वसंवेद्य परमेश्वर मीं असें ॥१७॥
मींच होय परब्रह्म प्रपंचातीत थोर मीं ॥
सर्वभूतांतरावास वासुदेवाऽविनाश मी ॥१८॥
मू.- इति ध्यानाश्रितो मुक्तो बद्धएवान्यथा भवेत्‍ ॥
अन्योसावहमन्योस्मीत्युपास्ते योन्यदेवतां ॥
न स वेद नरो ब्रह्म नच देवोन्यथा पशु: ॥८॥
टी० - एवं ध्यान करी चित्तीं मुक्त तो जाणिजे जनीं ॥
अन्यथा बद्धता पावे मिथ्या संसारवासनी ॥१९॥
देव तो अन्य मीं दास भिन्नभावें उपासितो ॥
आत्मान्य देव हे ध्यातो प्रतिमादिक पूजितो ॥२०॥
तो ब्रह्म तत्वता नेणे देव नेणिचि तो कदां ।
आत्मभाव मुळीं नेणें तो द्विपाद पशू सदां ॥२१॥
मू.- आत्मानं सततं ब्रह्म संभाव्य विचरंति ये ।
न तेषां दुष्कृतं किंचित्‍ दुष्कृतोत्था न चापद: ॥१०॥
टी० -आपणा ब्रह्म भावोनी सर्वदां फिरती जर्‍हीं ।
वर्ततां व्यवहारींहीं प्राकृतासारिखे तर्‍हीं ॥२२॥
विधिकिंकरतां त्याला न बाधी पाप ना घडे ।
कर्मोत्थ सुखदु:खाचें भोगणें न तयां पडे ॥२३॥
मू. - ब्रह्मैवाहं न संसारी मुक्तोऽहमिति भावयेत्‍ ।
अशक्रुवन्‍ वा भावयितुं वाक्यमेतत्सदा भजेत्‍ ॥११॥
टी० - मींच ब्रह्म न संसारी मुक्त मी भाविजे असें ।
अशक्तीं भावनायोगीं पढावें वाक्य सौरसें ॥२४॥
मू.- एकमासध्यानयोगाद्‍ ब्रह्महत्यां व्यपोहति ।
संवत्सरकृताभ्यासात्‍ सिद्ध्यष्टकमवाप्नुयात्‍ ॥१२॥
टी० - मासैकध्यानयोगें या ब्रह्महत्या निवारते ।
संवत्सरकृताभ्यासे सिध्यष्टकपतीच ते ॥२५॥
मू. - यावज्जीवसदाभ्यासाज्जीवन्मुक्तो न संशय: ।
मय्येव सकलं जातं मयि सर्वं प्रतिष्ठितम्‍ ॥
मयि सर्वं लयं याति तब्दह्माद्वयमस्म्यहं ॥१३॥
टी० - यावज्जीवसदाभ्यासें जीवन्मुक्त सुखें घडे ।
न मानिजे संशयातें निश्चयें जाणिजे दृढें ॥२६॥
मद्रूपीं जाहलें सर्व मद्रूपींच अधिष्ठिलें ।
मद्रूपीं तें लया जातां उरे मीं ब्रह्म एकलें ॥२७॥
मू. - नाहं देही न मे देहो केवलोहं सनातन: ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥१४॥
टी० -नोहे माझे देह कदां देही मीं हें घडेचिना ।
केवळात्मा स्वयंज्योति दृश्यातीत सनातना ॥२८॥
एक मी अद्वयानंद परब्रह्माख्य निर्गुण ।
अनिर्देश्य स्वरुपीं या नेहनानास्ति किंचन ॥२९॥
मू.- अयं प्रपंचो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमव्ययं ।
अत्र प्रमाणं वेदानुभवो गुरुवचस्तथा ॥१५॥
टी० -हा प्रपंच दिसे मिथ्या सत्य मी ब्रह्म अव्यय ।
येथें प्रमाण वेदानुभव सद्‍गुरु वाक्य हें ॥३०॥
भावनापंचदशिका पराकाष्ठा स्वरुपिणी ।
कथिली शंकराचार्यी जगद्‍गुरु शिरोमणी ॥३१॥
सदाभ्यासवशें जोडे सहजा उन्मनी शिवा ।
जीवब्रह्मैक्यता पावे या उपायें जिणें भवा ॥३२॥
सद्‍गुरु बापदेवाचा अमृतोदारहस्त कीं ।
कृपेनें ठेविला दीन माधवात्मजमस्तकीं ॥३३॥
म्हणोनि कथिली टीका यथाज्ञानें यथामती ।
जोडेल निश्चयें मातें धन्यता साधुसंमती ॥३४॥
इतिश्रीमन्निरंजनमाधवविरचिता भावनापंचदशीटीकासमाप्ता ॥


References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP