मध्यखंड - वरदमूर्ति श्री भवानी
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
ऊँ तत्सत्परमात्मने श्रीमद्रोपीजनवल्लभाय ब्रह्मानंदाय गुरुमूर्तये नम: । श्रीसिध्देशाय नम: । श्री चामुंडायै नम: ॥
चित्सदानंदरुपाय सर्वधीवृत्तिसाक्षिणे । नमो वेदांतवेद्याय ब्रह्मणेऽनंत रुपिणे ॥१॥
निष्कळं निक्रियं शांतं निरवद्यं निरंजनं । अनादिमत्परं ब्रह्म न सत्तं ना सदुच्यते ॥२॥
अनाद्यंतो निरुल्लेख: सोय मेको घनस्थित: । तत्रेदं महद ख्यानं श्रुणु श्रवणभूषणं ॥३॥
नमो देवी जागत् हृश्ये । इहपर उभय शेषे । सहजाकुर विशेषे । सकळाकृते ॥१॥
जय सर्वगुणभांडारे । भूतग्राम ईश्वरें । ब्रह्मकुमोद भ्रमरे । पद माळिके ॥२॥
हे तव्दिदे त्वं मूळिके । सुविद्या अविद्या चाळके । तथापि सर्वत्र व्यापके । सर्वास्तपूर्णे ॥३॥
ब्रह्मादि तत्व उदर्य । सृष्टीकारण ब्रह्मकार्ये । श्रृतीगुह्यधैर्ये । धृवांबिके ॥४॥
जय प्रकृतिगुणधात्रे । अभावशून्यविधात्रे । परापरवस्तुपवित्रे । जात जनिते ॥५॥
भूतभूतानि हे माते । सर्वस्थ सर्वगते । जगव्दात्रे जगज्जनिते ।जगद्रूपे ॥६॥
क्षराक्षर मूर्तामूर्त ।परापर वोतप्रोत । इत्यादिशृंगार सुशोभित । तत्वस्थाने ॥७॥
गुणकर्मभव भुतिक । नामरुपादि अनेक । अयं ब्रह्माहमस्मि सम्यक । सर्वातरे ॥८॥
प्रमाणु महद्भूत जात । अनादि ब्रह्म पर्यंत । अंतर्बाह्य साक्षांत ।युष्मद्रपें ॥९॥
स्वयंवेद्य ब्रह्मभूतां । अवछिन्न वेष्टीता । ब्रह्मादि मुनय पूर्णतां । न विदु र्न वदत ॥१०॥
तवाश्चर्य असंभाव्य । पूर्णात्पूर्ण अव्दय । एवं श्रेष्ठ कृतगृह्य । विश्वदृश ॥११॥
कारणकृतछिन्नभिन्न । अन्योअन्य रुपवर्ण । अनंत अनादि उत्पन्न । यथाकृत ॥१२॥
जिघ्रन् पश्यन् श्रृणोति । स्वादन् स्पर्शन् जल्पयंति ।गृण्हन् गछन् जानति । एतत्सर्व ॥१३॥
एवं ज्ञान कर्म इंद्रियें । अंत:करणादि पंच पंचविषय । एतत्सर्व कृत कार्य । चालकांबिके ॥१४॥
त्रिमात्रा अर्ध मात्रे । नित्यात्मके पवित्रे । सर्वकाष्ठा सर्वत्रे । अरुपारुपे ॥१५॥
हे सतासतें रमणें । शबळ ब्रह्म बृबाणें । न पुमान् बळसपन्न । संतान वृध्दे ॥१६॥
‘ऊँ तत्स’ त्ब्रह्माकृति । महन् माया सर्व वेति । कृतहॄत बिभ्रति । कारण सर्वा ॥१७॥
महत्द्रूप रेणुपर्यंत । गुणात्मक भूतजात । एवं संतति युष्मत । जगन्मात ॥१८॥
सहस्रव्दय रसन । अप्राप्त वत्कृत्व दर्शन ।वेदां न विदु चतुरानन । अंगरुप ॥१९॥
त्वया स्तुति जल्पनी । वाणी प्रवर्ते मौन्य साधनी । गणकाक्षर प्रमाणी । प्रवृत्ति र्नास्ति ॥२०॥
तव मयूष महतां । मध्यें खद्योतप्रकाश सविता । वक्तृत्व येतावता । न शक्य ऋषि ॥२१॥
हे अंबे अंबुजाक्षे । भूतानू गोचर प्रत्यक्षे । सर्वातर सर्वसाक्षे । महानिधे ॥२२॥
तुझी कीर्ति-गुण -चरित्रं । येणें भरलें सर्वत्र । परी हें बोलावया पात्र । नेदखों सृष्टी ॥२३॥
वेद शास्त्र पुराणें । हावां भरलीं जल्पनें । तुझ्या सामर्थ्याचा कोणें । निर्धारु केला ॥२४॥
देव ॠषि महोरग । इत्यादि समर्थ अनेग । ते हीं तुझें स्वरुप चांग । नेमु पाहति ॥२५॥
परी तुझ्या कर्तव्याचा सेवटु । त्याचें मनें ही नव्हे घटु । मा स्वरुप विषई चावटु । ऐसा कैचा ॥२६॥
या कर्मत्रयाची पेटी । लाउनि ब्रह्मादिकांच्या कोंटी । या भवोदधीचां पोटी । घालिसी काढिसी ॥२७॥
तेथ बापुडी जीवसृष्टी । कायें निर्धारैल गा दृष्टी । तुझ्या सामर्थ्याचि गोष्टी । अनुपम्य मातें ॥२८॥
यास्तव तुझ्या दास्याची गोडी । विबुधामनीं ही आवडी । आह्मां आशक्या परवडी । तेथें चि देसी ॥२९॥
या ही वरी वो आमतें ।ह्मण आपुलें विश्वमातें । ते परा दृष्टी कविते । फांपावुं सुखें ॥३०॥
तरि हें चि कां मिं बोलों आतां । ठाइं चि तुझी प्रसन्नता । तर्हि मंगळाचरणें जगन्माता । नमनें घडे ॥३१॥
आतां हे चि माझें नमन । जैसी आहासी प्रसन्न । तैसें चि विशेषें ज्ञान । मतिसी ॥३२॥
ऐसी स्तुति करुनि देवाधिदेवतेचां ध्यांनी । मन ठेविलें तों भवानी । प्रगट जाली ॥३३॥
ते बोले ब्रह्मलहरी ।पुरे स्तुति कथन करी । परी तुं आधीं नमस्कारीं । शंकरातें ॥३४॥
त्या श्रीहराच्या आचोळां । म्या तुज घातलें रे बाळा । तेणें सांगीतलें सकळां । प्राप्तकरी ॥३५॥
तो देव सर्वा श्रेष्ठा । कृत कर्म आधिष्ठा । विशेषें ब्रह्मदृष्टा । नैसर्गिकु ॥३६॥
तो कोण्ही उपदेशीला । कोण्हे प्रवृत्ति लाविला । ए ऐसा नाहि अवतरला । उमाईशु ॥३७॥
तो ब्रह्म रसाचा मद्रळा । वोंतिव पंच मुखाचा पूतळा । तन्मात्राचा जिवाळा । कारणभूतु ॥३८॥
तो ब्रह्मज्ञ देव । याचा नाही नवलाव । आपलें मूळस्थिति ठाव । कोण नेणें ॥३९॥
यास्तव देव ही ब्रह्मीष्ठ । ऋषी ते ही आत्मनिष्ठ । येथ जन होय ब्रह्मभ्रष्ठ । हा उपावो आईक ॥४०॥
ईह लोकीं उपतिष्ठं कर्म । तेणें चालती देवाचें देह धर्म । यास्तव ते हीं हे वर्म । गुह्य केले ॥४१॥
ते दाविति ब्रह्मंततु । परी चळों नेदीत कर्माचा हातु । आरे हे कर्ममातु । मध्यें चि उठिलि ॥४२॥
अकर्मीं वर्णसंकार । रचिती बोलाचे वोटंगर । तेथ लटिके चि हरिहर । साक्षि आणिती ॥४३॥
अकर्म बोलतां हि पाहिं । ब्रह्मनिर्धार समूळ नाहिं । तें कां बाड पां नरटें कहि । उलथों नळ येति ॥४४॥
यास्तव पंचाननें । जें बोलिलें स्व वदनें । तेणें सबीजे गहनें । पदें वदैं ॥४५॥
अनेक वर्षे उपाय । चालैल हा संप्रदाय । आहांचा मतां देईल घाय । हा तुझा ग्रंथु ॥४६॥
उत्तमा मध्यमा सेल । सर्वत्रीं घ्यावे हे बोल । भवपंचकाची शोखील वोल । तो ग्रंथादित्य हा ॥४७॥
कृष्णोत्तर रेवादक्षिण । मध्यदेशाचें प्रमाण । या मध्यें वाढैल महिमान । या बालावबोधाचे ॥४८॥
ऐसे वर देउनि । पाठीं समावली गगनी । ते चि भरली लोचनी । सर्वत्र देखे ॥४९॥
॥ इति वरदमूर्ति श्री भवानी ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP