मध्यखंड - मंगला चरण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


धरुनि श्रोतयांचा आधारु । बोले ग्रंथ मनोहरु । कां जे स्वामीविण शुरु । कार्याशक्तु ॥५७॥
घे घे स्वामी विण वीरा । तैं रणी सुवे जैसा शूरा । तैसें श्रोतयांचे आदरा । मुख माझें ॥५८॥
यास्तव सावधान । आईका कार्य कारण । तुह्मा योग्य म्हणौन । विज्ञप्ति करु ॥५९॥
जै हंसु आणिजे पाहुणा । तैं मोतिये वोगरावि भोजनां । कां जे अशनविषई पाषाणा । नातळे चि तो ॥६०॥
तुमचें कृपेचेंनि बळें । माझी वैखरी पाघळे । जैसें चंद्रें चंद्रशीळे । पाझरु फुटे ॥६१॥
वास्तव कृपा करुन । गोसावीं व्हावें सावधान । यव्दिषई तुमचें विज्ञापन । पूर्वीं च केले ॥६२॥
हे चि कथा सहसा । न संगावी बहिर्मुखा पुरुषा । नाकहीना आरीसा । जया परी ॥६३॥
आहाचें ज्ञानें जडें । आत्मसुखा नातुडे । जैसें टाकीयं ना सीतां रत्न खडे । वोप नेघति ॥६४॥
ताउनि आणिजे पाणि । तो मोतियां होय ह्मणि । फुलें घेतां पीळोनि । गंधु जाय ॥६५॥
लावितां वावधाणी दिवा । उजेडु कोठें पाहावा । पावकीं पोतासाचा ठेवा ।पुसीजे कोणा ॥६६॥
तेवी पाखांडीया उपदेशु । होय व्रह्मरसु विरसु । जेवी दीर्घरोगीया ग्रासु । मिष्टांनाचा ॥६७॥
जर्‍हिं अनुसरती शीष्यपणे । तर्‍हिं अप्रेम ब्रह्मज्ञाने । असो हें आतां कोण कोणें । वर्जावे ते ॥६८॥
जे गुरुद्रोही भवरोगी । आचारहीन बहुरागी । सप्तव्यसनें ज्यांचां आंगी । जो शिष्यु नको ॥६९॥
वृथा कथा गतगोष्टी । जो अखंड उपदेशें आटी । आत्मपदवी ते दीठी । दिठावे चि तो ॥७०॥
द्रव्यासक्तु असल्यवादी । पांती हरु पंक्तिभेदी । उअहापुही आत्मपदीं ।बैसउं नये ॥७१॥
जो प्रतिअमा रुपा नांवा । वेधे वेधला घे धावां । तो ही उपदेशीता हावा । न भरे गुरु ॥७२॥
तालराग स्वर तंतु । नवरसीं प्रेम भरीतु । तो ही बोधा आणितां बहुतु । प्रयासु असे ॥७३॥
नादि वादि नींदीं । तो ना बैसे ब्रह्मपदीं । सप्तकरणी ब्रह्मबुध्दीं । थारु नेणें ॥७४॥
जो सर्वज्ञु सुरसु । तो लाहे गुरुचा उपदेशु । तैं शिष्यु चि ब्रह्मप्रकाशु । घरीचा त्याचें ॥७५॥
आतां गुरु करावा कैसा । जेथ पवित्रपणाचा ठसा । येरु दुर्बुधु सहसा । पाहो नये ॥७६॥
जो चावटु वाचे आगळा । वर्णसंकराचा मद्रळा । मतिभ्रंशु देखी डोळां । पाहु नये ॥७७॥
रागीट कपटी कुचेष्टी । हिंसा घाती महाकुष्ठी । अंत्यजु अंगभग्र सृष्टी । तो न कीजे गुरु ॥७८॥
ज्याचें उपदेशें विचारें । पूर्णता सर्व ही विवरे । चाड न पडे अन्य गुरें । तो चि गुरु ॥७९॥
तो वसे जे देशीं । तो चि ग्रामु पंचक्रोशी । ऐसें देखे तो मोक्षासी । पात्र होये ॥८०॥
तेथदेह पातें मोक्षु । येथ देहस्त प्रत्यक्षु ।या वचनासी साक्षु । यजु आमचा ॥८१॥
॥ इति संतासंत लक्षण ॥
ऐसा तो भैरवाचा आत्मजु । बोले त्रिंबकु व्दिजु । ग्रंथदारु सबीजु । विस्तारुं आतां ॥८२॥
इति श्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंद मध्यखंडे विवरणे मंगला चरण नाम प्रथम कथन मिति ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP