मध्यखंड - तामस गुण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आतां तमोगुणजनित । जें वेद शास्त्र मार्ग रहित । आधारें विण आचरत । पराचें हेवें ॥३०॥
कां उद्देश धरुनि शरीरी । आपले मनें मानिलें करी । सांडनें बळिसी खेचरी । भक्ति त्याची ॥३१॥
पिशाच यक्षिणीं भूतें प्रेतें । यासी चि आराधी आर्ते । चेटकें कुमंत्र सहिते । सप्त करणें मानी ॥३२॥
तो आतुटांया उगयां चि करीं । नेणें फळकर्मकुसरी । तें जाणावें चातुरीं । तामसकर्म ॥३३॥
तो भक्ति धर्मु ऐसा मानी । वधी पशुच्या दावणी । हिंसा घातांचा मनी । आनंदु तया ॥३४॥
उछिष्टें अपवित्रें रुक्षान्नें । मेद मांसादिक भक्षणें । ऐसी ज्याची भोजनें । ते तामस प्राणी ॥३५॥
लोकु नेमें दुल्लभु । नसे मानवी देहाचा लाभु । अवगतिचा सुलभु । भोग त्यासी ॥३६॥
व्याघ्र सर्प श्वान शूकर । ऐसे क्रूर जीव अपार । या अधोयोनि भोगिती नर । तामस जे ते ॥३७॥
कीति एकांच्या स्मृती । यमलोकु ते अधोगती । कीति येकाच्या युक्ति । ऐसें न मनें ॥३८॥
देहा वेगला जीव राहे । तैं तो यम लोकु साहे । तरि बृहदर्णिकी गीतेसी आहे । प्रमाण याचें ॥३९॥
“ तद्यथा तृणजळयुक्त ” । ऐसें बोले कांडिका । आणि “ वासांसी जीर्णानि ” या श्लोका । आदि कृष्णु ॥४०॥
निफजलें देह अंगीकारी । तेव्हा पुर्विल अव्हेरी । यास्तव देहेची भोग निर्धारीं । जीवांसी असें ॥४१॥
ह्मणौनि त्या क्रूर योनी । भोगीति तामस प्राणी । एवं गुण त्रयांचि मांडणी । ऐसी आहे ॥४२॥
॥ इति तामस गुण ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP