मध्यखंड - सात्विक गुण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


शिवस्यानंतरुपस्य एकं चिन्मात्रमात्मन : ।
एषा हि शक्ती रित्युक्ता तस्माद्भित्रा मनागपि ॥१॥
आतां तं पद जीवलक्षण । हें ची करुं निरुपण । निर्धार विषईं हें ज्ञान । उत्तम असे ॥१॥
पूर्विं जीवबीजें सकळें । होति निजानंदे निर्मळें । ते माये अविद्ये मेळें । देहें घेती ॥२॥
माया रुपासी आली । अविद्या आंगीं उठली । ते वेगळें पणें आली । प्रवृत्ती जींवा ॥३॥
हे देह महाकारण । अहंतारुपें होय भिन्न । ते चि देह कारण । जीवु घे दुसरें ॥४॥
गुणत्रयांची समता । ते मूळ जीव भूतां । ये गुणाची भिन्नता । निवडती जीव ॥५॥
एणें मूळेंसी आन । देह होये महाकारण । दुजें देह कारण । विपरीत भावें बोलिजे तें ॥६॥
पाठिं हिरण्यगर्भाचें अंशे । होय लिंगदेह तैसें । ते तिजें देह भर्वसें । जीविचें होय ॥७॥
यावरी रेता रक्ता भेटी । यां उभयतां पडे गाठीं । ते मूळ मातु पोटी । वाढतें होय ॥८॥
तेथ जीव संचरती । पाठीं जन्मातें पावती । मनुष्य देहा पासाव भोगिती । येरें देहें ॥९॥
या थूळाचें सुरवाडें । आचरती कर्में कोडें । तेणें संसारु चि वाढे । भोगावया ॥१०॥
जैं श्रेष्ठ पुण्य घडे । तैं देवलोकु जोडे । अती पापें पडे । दुष्टदेहीं ॥११॥
पुण्य पाप समवेत । तैं मानवी देह पावत । यासी रुप साद्यंत । करुंनि देवों ॥१२॥
जो आपुलेया स्वधर्मावरी । उत्कृष्ट धर्म बोलिला तो करी । ज्यासी श्रृती स्मृति निर्धारी ।रुप करीति ॥१३॥
याग धर्म तीर्थ दान । ऐसें उच्च उच्च जें करणें । हे श्रेष्ठ पुण्य षडाननें । बोलिलें असे ॥१४॥
आतां जो आपुला स्वधर्मींची राहे । यासी सांडीनां उच न पाहे । ऐसा बोलितु आहे । मध्य धर्मु हा ॥१५॥
जो स्वधर्मु नेणें कोण्हे वेळां । तो पापाचा मद्रळा । त्या पतिता चांडाळा । अधोपतनें नेमली ॥१६॥
आतां असो हा येकीकडां प्रसंगु । गुण त्रयाचा भेदु सांगु । जेणें जन्ममरणाचा मार्गु । वस्तीसी चाले ॥१७॥
नेम धर्म तपें व्रतें । नित्यें नैमित्तें स्मार्त श्रौतें । चाले वेदशास्त्रपंथें । तें सात्विक कर्म ॥१८॥
सकोमल तें आचारण । पापव्देषी न घली मन । परहिंसा घातु बंधन । स्वयंमानी ॥१९॥
गोब्राह्मण अग्रीदेवते । यातें आराधी स्वचित्तें । शुभ करीतां हि कोण्हातें । कळों नेदी ॥२०॥
अभिमानें रहित ऐसा । तो शुध्दसत्वश्रीचा ठसा । हा उर्ध्दगतीच्या प्रकाशा । मधिल मणी ॥२१॥
तो देवामध्यें स्वर्गपुरी । आपुलीया इछ इछा राज्यकरी । पुनरपी जन्मे तरी । वेदश्रिया संपन्न ॥२२॥
हरीहरादिकांचें भजन । हें सात्विकाचे सहज गुण । ज्यासी सुरस मिष्टान्न । सद्यप्रिय ॥२३॥
॥ इति सात्विक गुण ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP