मध्यखंड - विशुध्दचक्र
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
पुढें षोडशदळा पोटीं । पत्रीं जपु साढे बाविस । सहस्रा येकाची आटि । अवघी चक्रीं ॥८१॥
ते चक्रीं अक्षरें । अं अं मध्ये सोळा स्वरें । सेवटिलें अकारें । उठे जपु ॥८२॥
दाहा पळें वीस अक्षरें । पत्रीं हे प्रमाण विचरे । सर्व या चक्राचें पुरे । गणित असें ॥८३॥
तेथ दीवस घटिका तीन । यांतु वीस अक्षरें चौदा पळे न्यून । असें बोलिले विव्दिज्जन । पूर्वाचार्य ॥८४॥
या पाचां चक्राचें प्रमाण । तेविस पळें चाळीस अक्षरें पूर्ण । घटिका त्रिपन । निर्धारे होती ॥८५॥
ते अति निर्मळ चंद्रमये । अथर्वण उचारु होये । न मे ऐक्यं ज्ञानाय । महावाक्य हे ॥८६॥
तेथ सदाशिव ऋषि साचा । तुरीया अवस्था परावाचा । अगोचरी मुद्रा महाकारणाचा । अधीकारु येथ ॥८७॥
ज्वाळा कळा उर्ध्दपीठ । स्वर्गभुवन दूसरें कूट । तालमूळ बरवंट । वस्ति याची ॥८८॥
जन लोकु निर्मळ तेज । जंगमलिंग ऊ बीज । जीव देवता भाज । अविद्याशक्ति ॥८९॥
तेथ तत्व गगन । वसे श्रेष्ठ अंत:करण । व्यान वातु शब्द गुण । येथून उठे ॥९०॥
॥इति विशुध्दचक्र ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP