मध्यखंड - अग्रि चक्र

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आतां भ्रूमध्यें आटोपु । पत्रीं पांचशतें जपु । तेथ होय निक्षेपु । सहस्र येकु ॥९१॥
त्या अग्रीचक्रामाझारी । हिं क्षीं मात्रका जपु करी । तिर्‍हासी पळें विसां अक्षरी ।पुरवी पत्रें ॥९२॥
तेथ दोनि घटिका प्राणु थारे । वरी सेंताळीस पळें चाळीस अक्षरे । आतां सांहिं चक्राचे पुरे । प्रमाण असें ॥९३॥
तेथ घटिका साते अधिक पन्नास । पळें तेरा अक्षरें विस । अरुणोदय प्रकाश । व्दिदळी होय ॥९४॥
तेथ सुसंवेद उत्तमु । महावाक्य सोहं ब्रह्म । तेथ जाणिजे परम । आत्म ऋषि ॥९५॥
ज्ञान वाणी चैतन्य कळा । हा तपोल्कु आगळा । आनंद देह सकळा । वंद्य ते हे ॥९६॥
हे उर्ध्द पीठ स्वर्ग भुवन । तीजे कूट त्रुतीय स्थान । ती ही खंडांची येथुन । संख्या जाली ॥९७॥
उन्मनी अवस्था सोहं बीज । प्रसाद लिंग माणिक्य तेज । गुरु देवत भाज । क्रीया शक्ति ॥९८॥
येथ तत्व गगन । मिं ब्रह्म इतुकें ज्ञान । येथूनि पुढां अखंड मन । अनुहात शब्द ॥९९॥
॥ इति अग्रि चक्र ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP