आषाढ वद्य ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
प्रा. विजापूरकर यांचें निधन !
शके १८४८ च्या आषाढ व. ८ रोजीं मराठी वाड्गमय, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व सदाचार यांचे नि:सीम पुरस्कर्ते व समर्थ विद्यालयाचे संस्थापक प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांचें निधन झालें.
विजापूरकरांच्यावर उपनिषदें व समर्थ सांप्रदाय यांची छाप विशेष होती. कोल्हापूर व पुणें या ठिकाणीं शिक्षण घेऊन एम्. ए. झाल्यावर अहमदाबाद काँलेजमध्यें फेलो व राजाराम काँलेजमध्यें इंग्रजी व संस्कृत या विषयांचे प्रोफेसर काँलेजमध्यें फेलो व राजाराम काँलेजमध्यें इंग्रजी व संस्कृत या विषयांचे प्रोफेसर म्हणून यांनीं कामें केली. सन १८९६ मध्यें विजापूरकर यांनीं ‘ग्रंथमाला’ नांवाचें मासिक सुरु केलें. त्यानंतर दोन वर्षांनीं समर्थ नांवाचें साप्ताहिक सुरु करुन मासिक सुरु केले. त्यानंतर दोन वर्षांनीं समर्थ नांवाचें साप्ताहिक सुरु करुन ‘विश्ववृत्त’ मासिकांतून स्थानिक, प्रांतिक हालचालींचा ते परामर्श घेऊं लागले. अर्थात् राजकीय बाब आड येऊन त्यांना प्राध्यापकाच्या जागेवरुन कमी व्हावें लागलें. सन १९०९ च्या जून महिन्यांत प्रा. विजापूरकरांनीं समर्थ विद्यालय सुरु केलें. प्लेगमुळें चार महिने हें विद्यालय मिरजेस असलें तरी त्यानंतर तळेगांव येथें ते स्थिर झालें. त्यांच्या ‘विश्ववृत्त’ मासिकांत ‘वैदिक धर्माची तेजस्विता’ या नांवाखालीं पं. श्री. दा. सातवळेकर यांचा लेख प्रसिध्द झाला. त्यांतील ‘राज्यद्रोहा’ वरुन प्रा. विजापूरकर यांना तीन वर्षाची साधी कैद झाली. त्या वेळीं सरकारी कायद्यास अनुसरुन समर्थ विद्यालय बंद पडलें. त्यांच्या सुटकेनंतर सर महादेव चौबळ यांना अध्यक्ष करुन या विद्यालयाचें रुपांतर ‘नवीन समर्थ विद्यालय’ असें करण्यांत आलें. त्याच्या सुरवातीचे वेळीं सर चौबळ म्हणालें, “प्रो. विजापूरकरांची धर्मनिष्ठा व सात्त्विक्तेची प्रत्यक्ष मूर्ति डोळयांपुढें असतां मी तरी जास्त काय सांगणार ? साधी राहणी व उच्च विचारसरणी यांचा नमुना इतरत्र कचितच पाहावयास मिळेल.” यांच्या अनेक ग्रंथांपैकीं न्या. रानडे यांच्या पुस्तकाचें ‘मराठयांच्या सत्तेचा उत्कर्ष’ हे भाषान्तर फार महत्त्वाचें आहे. राष्ट्रीय शिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून प्रा. अण्णासाहेब विजापूरकर यांचें नांव कायम आहे. त्यांचा स्वदेशी बाणा, स्वदेशी राहणी व स्वदेशी विचार सर्वाना मोहून टाकीत.
- १ आँगस्ट १९२६
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP