मालिका २ द्वितिया

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)
अभंग -१
श्री नामदेव महाराज वाक्य--

धन्य नरदेही संतसंग करी । त्रैलोक्य उध्दरी हेळामात्रे ॥१॥
नेणे सुख दु:ख शरीराचे भान । अखंड भजन केशवाचे ॥२॥
कर्म करुनिया होय शुचिमत । नामामृती पीत सर्वकाळ ॥३॥
नामा ह्मणे ऐसे व्रतें देहे भावी । मूढजना दावी भक्तिमार्ग ॥४॥॥धृ०॥
जै माझें भक्त येती घरा, तै सर्व पर्वकाळ आले द्वारा । वैष्णवां तो दिवाळी द्सरा, तीर्थ घरां पै येती ॥१२६६॥ ए०भा०अ०११

अभंग -२
श्री एकनाथ महाराज वाक्य--
संतसंगतीने झाले माझे काज । अंतरी जे निज प्रगटले ॥१॥
बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रम ॥२॥
दैन्य दरिद्र दुर गेलें । संत पाऊलें देखतां ॥३॥
एका जनार्दनी सेवा करीन मी अपुल्या भावा ॥४॥
आत्मज्ञानें चोखडी संत जे माझी रुपडी । तेथ दृष्टि पडे आवडी । कामिनी जैसी ॥१३५६॥ ज्ञा०अ०१८

अभंग --३
श्रीतुकाराममहाराज वाक्य--

सुख वाटे हेंचि ठायी । बहु पायीं संताचें ॥१॥
म्हणऊनि केला वास । नाही नाश ये ठायी ॥२॥
न करवे हलचाली । निवारली चिंता हे ॥३॥
तुका म्हणे निवे तनु । रजकणु लागतां ॥४॥॥धृ०॥
ते पहांटवीण पाहावित । अमृतेविण जीववीत । योगेविण दावित । कैवल्य डोळा ॥२०१॥ ज्ञा०अ०९

अभंग--४
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
तुम्ही संत मायबाय कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणुं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारण । उध्दारावें जन जडजीवा ॥२॥
वाढविले सुख भक्ती भाव धर्म । कुळाचारी नाय विठोबाचें ॥३॥
तुका ह्मणी गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुह्मी जगीं संतजन ॥४॥॥धृ०॥
तरी कीर्तनाचे नि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे । जे नापचि नाही पापांचें । ऐसे केले ॥९७॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थे ठाया वरुनि उठविली । यमलोकीची खुंटिली । राहटी आघवी ॥९८॥ ज्ञा०अ०९

अभंग--५
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
धन्य आज दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मांचा शिण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी अलिंगन द्यावें । कदा न सोडावें चरण त्याचे ॥२॥
त्रिविध तापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवाचे ॥३॥
एका जनार्दनी घडो त्याचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥॥धृ०॥
कहीं एखाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केले आघवें । ऐसे नामघोषगौरवें ॥ धवळलें विश्व ॥२०३॥ ज्ञा०अ०९

अभंग--६
श्रीतुकाराममहाराज वाक्य--
संताचिया गांवी प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दु:ख लेश ॥१॥
तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥२॥
संताचिये गांवी भरो भांडवल । अवघा विठठल धन वित्त ॥३॥
संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥४॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेम सुखसाठीं घेती देती ॥५॥
तुका ह्मणे तेथे आणिक नाही परी । म्हणोनि भीकारी झालो त्यांचा ॥६॥॥धृ०॥
प्रभु तुम्ही सुखामृताचे डोहो । ह्मणोनि आह्मी आपुलिया स्वेच्छे बोलावो लाहो । येथहि जरी सलगी करुं भीयो । तरी निवो के पहा ॥५॥
प्रतिमा निजकल्पना उत्तम । संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम ल। चालते बोलते परब्रह्म । अती उत्तम साधु सेवा ॥११९९॥
माझ्या प्रतिमा आणि साधु नर । तेथें या रिती भजती तत्पर । हा तव सांगितला निर्धार । भजन प्रकार तो एक ॥१२००॥
प्रतीमा आणि साधु सोज्वळे । आवडी न पाहाती ज्या डोळे । दृष्टि असोनी ते आंधळे । जाण केवळ मोर पुच्छे ॥१२०१॥ ए०भा०अ०११

अभंग--७
श्रीनामदेव वाक्य --
संताचा महिमा कोण जाणे सीमा । शिणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥
संताची हे कळा पाहतां न कळे । खळोनिया खेळवेगळे ॥२॥
संताचिया पारा नेणें अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणें ॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य भेटी झाली । कल्पना निमाली संतापायी ॥४॥॥धृ०॥
तेजे सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा आपुरते ॥४॥ ज्ञा०अ०९

अभंग --८
श्रीज्ञानदेव वाक्य--
पूर्व जन्मी सुकृते थोर केली । ते मज आजि फळासि आली ॥१॥
परमानंद आजि मानसी । भेटी झालिइया संतासी ॥धृ०॥
मायबाप बंधु सखेसोयरे ॥ याते भेटावया मन न थरे ॥२॥
एक एका तीर्थाहुनि आगळे । तयामाजि परब्रह्मा सांवळे ॥३॥
निर्धनासि धनलाभ झाला । जैसा अचेतनी प्राण प्रगट्ला ॥४॥
वत्से बिघडली धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥५॥
पियूषापुरतें गोड वाटत । पंढरिरायाचें भक्त भेटत ॥६॥
बाप रखुमादेवी वर विठठल । संत भेटतां भवदु:ख फिटलें ॥७॥॥धृ०॥
ज्याचिया अवडीच्या लोभा । भगवंत पालटे आला गर्भा । दशा अवताराची शोभा । जहाली पद्मासना ज्याचेनी ॥धृ०॥ ए०भा०अ०२

अभंग-९
श्रीतुकाराममहाराज वाक्य--
पुण्य्य फळले बहुतां दिवसां । भाग्य उदयाचा ठसा । झालो संन्मुख तो कैसा । संतचरण पावलो ॥१॥
आजि फिटले माझें कोडं ॥ बहुता जन्मांचे सांकडे । कोंदाटलें पुढे परब्रह्म सांवळे ॥२॥
अलिंगने संताचिया । दिव्य झाला माझी काया मस्तक हां पायां । वरी त्यांच्या ठेवितों ॥३॥
तुका ह्मणे धन्य झालों । सुख संताचिया धालो । लोटांगणीं आलों वैष्णवभार देखोनी ॥४॥॥धृ०॥
लोह उभे खाय माती । तें परिसाचिये संगती । सोनें जालया पुढती न शिविजे मळे ॥१४०८॥ ज्ञा०अ०१८

अभंग --१०
श्रीतुकाराम महाराज वाक्य --
पुनीत केले विष्णुदासी । संगे आपुलिया दोषी ॥१॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें । शुभ होऊनियां ठाके ॥२॥
प्रेमसुखांचिया राशी । पाप नाहीं ओखदासी ॥३॥
तुमा ह्मणे त्यांनी । केली वैकुंठ मेदिनी ॥४॥॥धृ०॥
चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं । त्यासि मातेच्या आगमनी । संतोषमनीं निर्भर ॥४॥
त्याहुनि श्रेष्ठ तुपची यात्रा । नित्य सुखदात्री भूतमात्रां । स्वलीले तुह्मी मही विचारा । दीनोध्दारा लागुनी ॥४४॥ ए०भा०अ०२

अभंग--११
श्रीतुकाराममहाराज वाक्य--
पाप ताप दैन्ये जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥
ऐसें बळ नाहीं माणिकांचे अंगी । तपें तीर्थे जगी दानें व्रते ॥२॥
चरणीचें रजवदी थूलपाणी । नाचती कीर्तनी त्याचे माथां ॥३॥
भव तर वया उत्तम ही नाव । भिजो नेदी पावहात कांहीं ॥४॥
तुका म्हणे मन झाले समाधान । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥५॥
ह्यणोनि गा नमस्कारुं । तयातें आम्ही माथां मुकुट करुं । तयाची टांच धरूं । ह्र्दयी आम्हीं ॥२२१॥ ज्ञा०अ०१२

अभंग --१२
श्रीतुकाराममहाराज वाक्य --
उजळले भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥२॥
संपुष्ट हे ह्र्दयपेटी । करुनि पोटीं साठवूं । तुका ह्मणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४॥॥धृ०॥
आपली जे निजपदप्राप्ती । ते सत्संगेविण निश्चिती । दुर्लभ हे उध्दवाप्रती स्वयें श्रीपरि सांगतु ॥११८॥ ए०भा०अ०१२

अभंग --१३
श्रीतुकाराममहाराज वाक्य--
करीतां या सुखा । अंतपार नाहीं लेखां ॥१॥
माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥२॥
ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारतां कांही ॥३॥
तुका ह्मने गोड । तेथे पुरे माझे कोड ॥४॥॥धृ०॥
केवळ जे स्वरुप संत । त्यां माझी संगती झाली प्राप्त । काय करीशी तपव्रत । भावार्थे प्राप्त मन झालिया ॥१०६॥
व्हावया माझीं पद प्राप्त । त्यासि भांडवल गा भावार्थ । भवबळी गा समस्त ॥ पद निश्चित पावल्या ॥१०७॥
तो मी वैकुंठी नसें । वेळ एक भानुबिंबीही न दिसे । वरी योगियाचीही मानसे । उमरडोनि जाय ॥७॥
परी तयांपाशी पांडवा । मी हारपला गिवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥८॥ ज्ञा०अ०९

अभंग --१४
श्रीतुकाराममहाराज वाक्य--
हे तो एक संताठायी । लाभ पायीम उत्तम ॥१॥
म्हणविती त्याचे दास । पुढें आस उरेना ॥२॥
कृपादान केलें संती । कल्पांतीही सरेना ॥३॥
तुका म्हणे संतसेवा हाचि ठेवा उत्तम ॥४॥॥धृ०॥

अभंग --१४
तुकाराममहाराज वाक्य--
शरण शरण वाणी शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥
स्तुति न पुरे हे वाचा । सत्यदास मी दासांचा ॥२॥
देहे सांभाळून । पायांवरि लोटांगण ॥३॥
विनवी तुका संतांदीन ॥ नव्हे गौरवे उत्तीर्ण ॥४॥॥धृ०॥
सांडुनि माझी पूजाध्यान, जो संतासी घाली लोटांगण, कोटी यज्ञांचे फळ जाण मदर्पण तेणे केले ॥९६॥ ए०भा०अ०१२

भजन
श्रीज्ञानदेव तुकाराम । श्रीज्ञानदेव तुकाराम ॥धृ०॥
आरत्या--१ झाले समाधान । तुमचे देखि  २  करुन आरती । चक्र पाणी ओवाळी -३
प्रेम सप्रेम आरती । गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन--
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥॥धृ०॥
अभंग नाटाचे-- मागणें ते एक तुजप्रती ॥
भजन-- ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम० ॥
प्रसाद-- पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि०॥
शेजआरती--१  शब्दांचिया रत्नें करुन अलंकार०
२ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥० मागील मालिकेप्रमाणें ह्मणावे
॥ पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP