मालिका १२ द्वादशी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग - १
श्रीज्ञानदेव वाक्य--
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहीला ॥ नाम आठवितां रुपी प्रगट पै जाला ॥१॥
गोपाळा रे तुझे ध्यान लगो मना ॥ आनु न विसंबे हरि जगत्‍ जीवना ॥धृ०॥
तनु मनु शरण शरण विनटलो तुझ्या पाई ॥ रखुमादेवीवारा वांचूनि आनु नेणे कांही ॥२॥
ए०भा०अ०२ - हरि चरित्रे अगाध ॥ ज्ञानमुद्राप्रबधे ॥ कीर्तनी गातां विशद ॥ परमानंद वोसंडे ॥५२८॥
यापरी हरिकीर्तन ॥ देत परम समाधान ॥ हा भक्ती राजमार्ग पूर्ण ॥ ये मार्गी स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥५३८॥

अभंग - २
श्रीज्ञानदेव वाक्य--
त्रिभंगी देहुडा ठाण मांडूनिया माये ॥ कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥
गोविंद वो माये गोपाळू वो ॥ सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानदू वो ॥धृ०॥
सांवळे सगुण सकळा जिवाचे जीवन ॥ घनानंद मूर्ति पाहतां हारपले मन ॥२॥
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ ॥ बाप रखुमादेवीवरु विठठल सकळ ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१९ - अमृत रुप ज्या माझ्या कथा ॥ श्रध्दा युक्त श्रवण करिता ॥ फिके करुनिया आमृता ॥ गोडीभक्तिपंता तत्काळ
लागे ॥२१७॥

अभंग - ३
श्रीज्ञानदेव वाक्य--
बरवा वो हरि बरवा वो ॥ गोविंद गोपाळ गण्दगरुवा वो ॥१॥
सांवळा वो हरि सांवळा वो ॥ मदन मोहन कान्हो गोवळा वो ॥धृ०॥
पाहतां वो हरि पाहतां वो ॥ ध्यान लागले या चित्ता वो ॥२॥
पढिये वो हरि पढिय वो ॥ बाप रखमादेवीवरु धाडिये वो ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१९ - सविता कथामृतसार ॥ मभ्दावी रंगले अंतर ॥ ते माझे गुण माझे चरित्र ॥ गाती सादर उल्लासे ॥२२०॥

अभंग - ४
श्रीज्ञानदेव वाक्य--
काळा पैं गोवळू काळासि आलोट ॥ नाममृतें पाठ भक्ता देहीं ॥ नित्य सखा आह्मां तपांचिया कोडी ॥ नलगती परवडी
व्रतें तीर्थे ॥१॥
सुलभ सोपारे सर्वाघटी अससी ॥ साधुसंगे दिससी आह्मा रया ॥धृ०॥
चैतन्या शेजारी मन पैं मुरालें ॥ सांवळे सानुले ह्र्दय घटी ॥ बाप रखमादेविसरू विठठलराज ॥ निवृत्तीनें बीज
सांगितले ॥२॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१९ - माझे नाम माझी पदे ॥ नाना छंदे अद्वैत बोधे ॥ कीर्तनी गाती स्वानंद्दे ॥ परमानंद डुलत ॥२२१॥

अभंग - ५
श्रीनामदेव वाक्य--
हरि आला रे हरि आला रे ॥ संतसंगे ब्रह्मानंदु जाला रे ॥१॥
हरि येथे रे हरि तेथें रे ॥ हरिवांचूनि न दिसे रितें रे ॥धृ०॥
हरि पाही रे हरि ध्यांई रे ॥ हरि वांचूनि दुजें नाही रे ॥२॥
हरि वाचे रे हरि नाचे रे ॥ हरि पाहतां आनंदु सांचे रे ॥३॥
हरि आदि रे हरि अंति रे ॥ हरि व्यापुक सर्वाभूंती रे ॥४॥
हरि जाणा रे हरि बाना रे ॥ बाप रखमादेवीवरू राणा रे ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - तीही धरुनि संतसंगती ॥ आले माझीया मदाप्रती ॥ देव द्विज त्यांते वंदिती ॥ अभिनव कीर्ती संताची ॥६८॥

अभंग - ६
श्रीनामदेव वाक्य--
सांवळा सुकुमार लावण्य त्रिभुवनी ॥ अवचितां आंगणी देखिला रया ॥१॥
आळवितां नयेचि सचेतनी अचेत ॥ भावेचि तृप्त माझा हरि ॥धृ०॥
अज्ञानी न दिसे ज्ञानी येऊन उभा ॥ विज्ञानेसी शोभा दावी रया ॥२॥
ज्ञानदेवा सार सांवळी ये मुर्ति ॥ निवृत्तीनें गुंती उगविली ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - माझी संगतीची अनन्य प्रीती ॥ तेचि त्यांस शुध्द भक्ती ॥ तेणें कृत कृत्य होऊनि निश्चिती ॥ माझी निजपद प्राप्ती
पावले ॥११७॥

अभंग - ७
श्रीनामदेव वाक्य--
झणे दृष्टी लागे तुझ्या सगुणपणा ॥ जेणें माझ्या मना बोध केला ॥१॥
अनंता जन्मीचें विसरलों दु:ख ॥ पाहातां तुझें मुख पांडुरंगा ॥२॥
योगियांच्या ध्यानीं ध्याता नातुडसी ॥ तो तूं आह्मांपाशी मागे पुढे ॥३॥
नामा ह्मणे जीवीं करीन निंबलोण ॥ वीटीसहित चरण वोवाळीन ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ - परि माते परम करुनि ॥ इये आर्थी प्रेम धरुनि ॥ हेचि सर्वस्व मानुनि ॥ घेती जे पै ॥१३३॥

अभंग - ८
श्रीनामदेव वाक्य--
विश्वभर नाम तुझे कमळापती ॥ जगी श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥
गौळयांचे घरीचे दही लोणी चोरुनी ॥ खातां चक्रपाणी लाजसीना ॥२॥
आतां दीनानाथा तुझे ब्रीद साचे ॥ तरी भुषण आमुचे जतन करी ॥३॥
ठेवा ठेवी कायसी आतां आह्मा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ - तो ह्मणे व्यासाचा जो निजगुरु ॥ आणि माझाही परमगुरु ॥ श्रीनारंद महामुनिश्वरु ॥ त्यासी अत्यादरु श्रीकृष्ण भजनी ॥२३॥

अभंग - ९
श्री तुकाराम महाराज वाक्य--
गोड लागे परी सांगताचि नये ॥ बैसे मिठी सये आवडीची ॥१॥
वेधलें वो येणें श्रीरंगरंग ॥ मी हे माझी अंगे हारपली ॥२॥
परतेचि ना दृष्टी बैसली ते ठायी ॥ विसावोनि पायीं ठेलें मन ॥३॥
तुकयाच्या स्वामी सवें झाली भेटी ॥ तेव्हां झाली तुटी मागिलाची ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०६ - तया एकवटलीया प्रेमा । जरी पाडे पाहिजे उपमा ॥ तरी मी देहे तो आत्मा ॥ हेचि होय ॥४८५॥

अभंग - १०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आमुचे जीवन हें कथाअमृत ॥ आणिकही संतसमागम ॥१॥
सारुं एके ठायी भोजन परवडी ॥ स्वादरसें गोडी पदोपदी ॥२॥
धालिया ढेकर येती आनंदाचे ॥ वोसंडले वाचे प्रेमसुख ॥३॥
पिकलें स्वरुप आलिया घुमरी ॥ राती ते अंबरी न समाय ॥४॥
मोजितां तयाचा अंत नाही पार ॥ खुंटला व्यापार तुका ह्मणे ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - जळी प्रतिबिंब अदोलाय मान ॥ तेवी जीवासी जन्ममरण ॥ श्रील्लरी चेद्र आडकला पूर्ण ॥ तेवी कर्म बंधन जीवासी ॥२९९॥
थिल्लर जळ आटले ॥ तेथे चंद्रबिंब निमाले ॥ नाते चंद्रबिंब बिंबोनि ठेले ॥ जाहले निमाले दोनी मिथ्यां ॥३००॥

अभंग - ११
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
बरी ओळखी झालि आतां ॥ चित्त जडले अच्युता ॥१॥
आह्मां डंखू आला काळ ॥ काळ झालासे कृपाळू ॥२॥
नियमा नियम सांडोनि दोन्ही ॥ आह्मी रत हरिकीर्तनी ॥३॥
सर्वाभूती भगवद्भाव ॥ भूतमात्री असे देव ॥४॥
एकां जनार्दनाचे पायीं ॥ द्वैत भावाचि उरला नाहीं ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ - तया सगाचेनि सुरवाडे ॥ मज विदेहादेह धरणे घडे ॥ किंबहुना आवडे ॥ निरुपमू ॥२२५॥
तेणेंसी आह्मां मैत्र ॥ एथ कायसे विचित्र परि तयाचे चरित्र ॥ ऐकतीजे ॥२२६॥
जो हा अर्जुना साद्यांत ॥ सांगितला प्रस्तुत ॥ भक्तियोगु समस्त योगरुप ॥२२८॥

अभंग - १२
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
काया ही पंढरी आत्मा हा विठठल ॥ नांदतो केवळ पांडुरंगा ॥१॥
भाव भक्ति भीमा उदक ते वाहे ॥ बरवा शोभता हे पांडुरंगा ॥२॥
दया शांति क्षमा हेचि वाळुवंट ॥ मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ॥ हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियाचा एक मेळा केला ॥ ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देही देखिली पंढरी जनी वनी ॥ एकाजनार्दनी वारी करी ॥६॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ - काढूनि आपुला डोळा ॥ दूरी ठेविला वेगळा । तो ह्र्दयस्थेवीण आंधळा देखणी कळा देवाची ॥११४१॥

अभंग - १३
श्रीज्ञानदेव वाक्य--
आजि देखिले रे आजि देखिले रे ॥धृ०॥
सबाह्य अभ्यंतरी ॥ अवघा ब्यापकु मुरारी ॥१॥
दृढ विटे मन मुळी ॥ विराजित वनमाळी ॥२॥
आजि सोनियाचा दिनु ॥ वरी अमृताते वरुषे धनु ॥३॥
बरवा संतसमागमु ॥ प्रगटाला आत्मारामु ॥४॥
बाप रखुमा देवीवरू ॥ कृपा सिंधु करुणाकरु ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ - सगुण निर्गुण नेणें कांही ॥ परी देवो आहे ह्मणे ह्र्दयी ॥ जडत्व असे देहाच्या ठायी ॥ तें देवो पही वावीत ॥११३५॥
यालागी देहाचे जें चळण ॥ ते ह्र्दय्स्थ करवी नारायण दृष्टाचे जें देखणेपण ॥ त्याचेनि होतसे ॥११४०॥

अभंग - १४
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
क्षीरा सागरी नवडे सुख ॥ क्षीरापती देख देव आला ॥१॥
कवळ कवळ पहा हो । सुख पसरुनि धावतो देवो ॥२॥
एकादशी देव आला क्षीरापती लागी टोकात ठेला ॥३॥
द्वादशी क्षीरापती ऐकोनि गोष्टी ॥ आवडी देव देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती बालिता वैष्णंवो मुखी ॥ तेणे मुखे देह होतसे सुखी ॥५॥
क्षीरापती सेविता आनंदू ॥ स्वानंद्दे भुलला नाचे गोविंनु ॥६॥
क्षीरापती सेविता वैष्णवा लाहो ॥ मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दन मुखी एका एकी तेणें होतसे सुखी ॥८॥
ए०भा०अ०१२ - योग योग व्रतदान ॥ वेदाध्यायन व्याख्यान ॥ तप तीर्थ ज्ञान ध्यान ॥ संन्यासग्रहण सादरे ॥११९॥
इत्यादि नाना साधनेसी ॥ निष्ठ्हा करितानि वर्धनें ॥ माझी प्राप्ती दुरास तेणें ॥ जीवे प्राणे न पावीजे ॥१२०॥
यापरी शीणता साधनेसी ॥ माझी प्राप्ती नव्हे आती प्रियासी ते गोपी पावल्या अप्रियासी संत्संगासि लाहोनी ॥१२१॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३मप्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४नआरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP