काल्याचे अभंग

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


अभंग - १
श्री तुकाराम महाराज वाक्य--
याल तरी यारे लागें ॥ अवघे माझ्या मागें मागें ॥१॥
आजा देतों पोटभरी ॥ पुरे म्हणाल तोंवरी ॥२॥
हळू हळू चाला ॥ कोणी कोणाशी न बोला ॥३॥
तुका ह्मणे सोडा घाटे ॥ तेणें नका भरूं पोटे ॥४॥॥धृ०॥

अभंग - २
श्री तुकाराम महाराज वाक्य--
शिंके लावियेलें दुरी ॥ होतो तिघांचे मी वरि ॥ तुम्हा व्हारे दोन्हीकडे॥ सुख पासरुनि गाडे ॥२॥
वाहाती त्या धारा ॥ घ्यारे दोहींच्या कोपरा ॥ तुका ह्मणे हाती टोका ॥ अधिक उणे नेदा एका ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - ३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
उपजोनियां पुढती येऊं ॥ काला खाऊं दही भात ॥१॥
वैकुंठी तो ऐसें नाही ॥ कवळ कांही ॥ काल्याचें ॥२॥
एकमेकां देऊं मुखी सुखी घालू हुंबरी ॥३॥
तुका ह्मणे वाळवंट ॥ बरवे निट उत्त्म ॥४॥॥धृ०॥

अभंग - ४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
कंठी धरिला कृष्णमणी ॥ अवघा जनी प्रकाश ॥१॥
काला वाटू एकमेकां ॥ वैष्णवनिका संभ्रम ॥२॥
वाकुलिया ब्रह्मादिकां ॥ उत्तम लोकां दाखवूं ॥३॥
तुका ह्मणे भूमंडळी आह्मा वीर गाढे ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - ५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
चलाबाई पांडुरंगे पाहूं वाळवंटी ॥ मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदे कवळ देती एका मुखी एक ॥ न म्हणती सानथोर अवघी सकळिक ॥२॥
हमामा हुंबरी पोवा वाजविती मोहरी ॥ घेतलासें फेरा माजी घालुनिया हरि ॥३॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुजाती ॥ विसरल्या देहभाव शंका नाही चित्ती ॥४॥
पुष्पांचा वरुषाव झाला आरती यांची दाटी ॥ तुळसी गुंफोनियां  माळां घालितील कंठी ॥५॥
यादवांचा गोपी मनोहर कान्हा ॥ तुका ह्मणे सुख वाटे देखोनियां मना ॥६॥ ॥धृ०॥

अभंग - ६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आजी ओस आमरावती ॥ काला महावया येती ॥ देव विसरती देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी ॥ चारा विसरल्या पाणी ॥ तटस्थ त्या ध्यानी ॥ गाई जाल्या श्वापदें ॥२॥
जें देवाचें दैवत ॥ उभें आहे यां रंगात ॥ गोपाळासहित ॥ क्रीडा करी कान्होबा ॥३॥
जया सुखाची शिराणी ॥ तींच पाऊलें मेदिनी ॥ तुका ह्मणे मुनी ॥ धुंडितांहि न लाभती ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - ७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
हा रस आनंदाचा ॥ घोढ करा हरि नामाचा ॥ कोण हा दैवाचा ॥ भाग पावें येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत ॥ जन्मांतरीचें संचित ॥ होईल करीत ॥ आला अधिकारी तो ॥२॥
काय पाहातां हे भाई ॥ हरुषें नाचा धरा घाई ॥ पोटभरी कांही ॥ घेतां उरी न ठेवा ॥३॥
जें सुख दृष्टि आहे तेंच अंतरी जो लाहे ॥ तुका ह्मणे काया ॥ कळिकाळ ते बापुडें ॥४॥ ॥धृ०॥
==
आरती कृष्णाची
श्री नामदेव कृत आरती--
हरि नाम गोड जाहले काय सांगू गे माय ॥ गोपाळ बाहाताती वेणु आरती पाने ॥धृ०॥
गेलें होतें वृदावना तेथें भेटला कान्हा ॥ गोपाळासी वेध माझा छंद लागला मना ॥१॥
आणि एक नवल कैसे ब्रह्मादिकालागी पिसें ॥ उच्छिष्ठा लागोनिया देव जाहले जळी मासे ॥२॥
आणिक एक नवल चोज गोपाळांसी सांगे गुज ॥ आंजळ जळी चोज वेना पाहतां नेत्र ते अंबुज ॥३॥
आणि एक नवल परि करी धरिली सिदोरी ॥ गोपाळासी वाढीतसे नामयाचा स्वामी हरि ॥ हरिनाम गो जाहले काय
सांगु गे माय गोपाळ बाहताती वेणु आरती पाने ॥४॥ ॥धृ०॥
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP