आरती विश्वव्रह्माची
आरती विश्वब्रह्मासी ॥ ज्ञान वैराग्ये शीलासी ॥ मुर्ती सात संवत्सराची ॥ बुध्दी विदेह स्थितीची ॥१॥ ॥आ०॥
भक्तीचे प्रेम असे भारी ॥ सांगु तरी काय वर्णू थोरी ॥ निशिदीनी निष्ठा भजनासी ॥ चातका मेघ बिंदु जैसी ॥२॥ ॥आ०॥
पांचवें संवत्सरी मुहुर्त ॥ केली विद्या सुरवात ॥ एक पक्षाचे आतंत ॥ ॐ स्वर व्यंजनें सहीत ॥३॥
दुसरे पक्षी शिक्षण ॥ बाराखडी अंक पाढे हे पूर्ण ॥ सहा मासापर्यंत ॥ ज्ञानेश्वरी भागवत वाचवी ग्रंथ ॥४॥॥आ०॥
दो मासी शिक्षण ज्योतिषपंचांग अर्थ ज्ञन ॥ सातवे संवत्सरे भरती ॥ सांगे भूतभविष्य गणती ॥५॥ ॥आ०॥
जनका आत्मजे बोले बोली ॥ पिताजी तुमची सेवा सरली ॥ मृत्यु समयाची वेळ ॥ सांगे स्वमुखें प्रांजळ ॥६॥ ॥आ०॥
आषाढ वद्य नवमीचे दिवशी ॥ तिसरे प्रहर समयासी ॥ आले ह्मणे देवदूत ॥ पुष्पवटीके सहीत ॥७॥ ॥आ०॥
चला ह्मणती प्रेमयुक्त ॥ मजला जाने निश्चित ॥ स्वामीसी कष्ट वणे नोव्हो ॥ माते अंती आली गांवे ॥८॥ ॥आ०॥
मातेनें ह्रदयीं अलिंगीली ॥ मांडीवरी शयनिली ॥ आईजी ह्मणी सरली सेवा ॥ मजला महीवरी निजवा ॥९॥ ॥आ०॥
धरणीवरी नीजविता क्षणी मातेसी ह्मणी स्मरा चक्रपाणी ॥ आप्तजना पांचारी जनक जननीस नमस्कारी ॥१०॥ ॥आ०॥
आणा ह्मणे तुळसी दळ ॥ स्वमुखें घाला मोक्ष वेळ ॥ स्वमुखें बोले रामध्वनी ॥ गेला मोक्षाचे सदनी ॥११॥ ॥आ०॥
नाही मोहामध्यें फसला ॥ धन्य तो वज्ररुप झाला ॥ महिमा वर्णु तरी काय ॥ लक्षुमण पदी ठेवी डोई ॥१२॥
आरती विश्वब्रह्मासी ॥धृ०॥
==
॥ विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक ॥
जगीं ब्रह्म तो विश्वी विश्वास मनिली ॥ तयाची दुर्मती विश्वी ज्ञान बहुति आटली ॥१॥
तया नराचा धन्य नरदेह फळला ॥ तया फळे पीयुष परी रस गोड आला ॥२॥
तया रसे पुनर्जन्म निमाला ॥ सागरी लाट सागरात जिरला ॥३॥
तया नराची भेटी व्हावें त्वरेनी ॥ मागणें हेची असे चक्रपाणी ॥४॥
तयाचे दर्शनें धन्य लाभ झाला ॥ ज्ञान गभस्ती उगवता तिमीरी शत्रुचा नाशांत झाला ॥ शून्यांत आकार ऊकार मिळवीता ॥
तो आकारासी आला तत्वता ॥६॥
जयाचे दर्शनें पूर्ण विचार करित ॥ तो पूर्णची उरे पूर्णता ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : December 06, 2019
TOP