मालिका ४ चतुर्थी
श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.
॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)
अभंग -१
श्री नामदेव महाराज वाक्य--
शब्दाचें सुख श्रवणाचे ने द्वारे । माझिया दातारे ऐसें केले ॥१॥
स्पर्शाच सुख त्वचेचेनि द्वारे । माझि ॥२३॥
रुपाच सुख नेत्राचेनि द्वारे । माझि० ॥३॥
रसाचे सुख रसनेचेनि द्वारे । माझि० ॥४॥
गंधाचे सुख नामाचेनि द्वारे । माझि० ॥५॥
नामा ह्मणे ऐसे जयाचे उपकार । तयासी गव्हार विसरले ॥६॥॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- निजागींचा नीजप्रभा । आगांसी आणिली शोभा । काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा ॥ शोभायमान ॥१९६॥
नीजहृदयीचे ब्रह्मज्ञान ॥ परीपाके प्रकाशले पूर्ण । तेची निजांग मंडन । इतर भूषण त्या नाही ॥१९७॥
मनुष्ये देहीचेनी आयुष्ये । विषयी सायास करी ती कैसी । अमृत देऊनी घे जैसे । तान्हे सावकाश मृगजळ ॥२२२॥
गंधर्व नगरीची ठाणी । घेतली देउनी चिंतामणी । तैसी लट्ली यालागी आठवणी । विषयसाधनी नरदेह ॥२२३॥
नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयाची खटपट । कदां आरोळ्या चोखट स्वच्छ सारी पाट खेळणे ॥२२६॥
नाना विनोद टवाळी नित्य विषयाची चाळी । त्यासी जपता रामनामावळी पडे दातकीळे आसंभव्ये ॥२२७॥
घरा आली कामधेनू । दवडीति न पोसवे ह्मणूनी तेवी श्रीरामनाम उच्चारुनी । नाडला जाण नरदेही ॥२२८॥
अकरा ही इंद्रिय वृत्ती । कैशा लावाव्य भगवद्भक्ती । ऐक राया तुज प्रती । साक्षेप स्थिती सांगेन ॥२९०॥
मने करावे हरीचे ध्यान । श्रवणे करावे किर्ती श्रवण । जिव्हेनें करावें नामस्मरण । हरि कीर्तन अहर्निशी ॥२९१॥
करी करावे हरि पूजन । चरणी देवालया गमण घ्राणीं तुलसी अमोदग्रहण । जिवी हरिचरण पूजिले ॥२९२॥
नित्य निमेत्य मिरवेशिरी चरण तिर्थे आम्हांवरी । हरि प्रसाद ज्याचे उदरी । त्या देखोनि दुरी भवभये पळे ॥२९३॥
निज ह्र्दयीचे ब्रह्मज्ञान । परिपाके प्रकाशले पूर्ण । तेचि निजांग मंडन इतर भूषण त्या नाही ॥१९७॥
अभंग - २
श्री नामदेव महाराज वाक्य--
पवित्र आणि परिकर । उभविलें मंदिर । दिपेविण मनोहर । शोभा न पावे श्यामांगी तरुणी सुंदर होय रमणी । पुरुषावीण कामिन शोभा न पवे ॥२॥
द्रव्यावीण नर जरी झाला सुंदर । तो त्यावीण चतूर ॥ शोभा न पवे ॥३॥
योगिया आणि कठीण । इंद्रिया नाही दमन । षटु कर्मेवीण ब्रह्मज्ञान ॥ शोभा न पावें ॥४॥
नामा म्हणे सुंदरा । रखुमादेवीवर तुजवीण दातांरा शोबा न पावे ॥५॥
ए०भा०अ०९--
जेणे उपजे विरक्ती । तो विवेक जाणावा निश्चिती । एवविवेके वैराग्यप्राप्ती । निजयुक्ती नरदेही ॥२५७॥
इतर देहांच्याठायी । हा विचारुचि नाही । केवळ शिश्नोदर पाही । व्यर्थ व्यवसायो देही करिताती ॥२५८॥
यालागी नरदेह, निधान । जेणें ब्रह्मसायु ज्यतां घडे गमन देव वांछती मनुष्यपणे देवाचे स्तवन नरदेहा ॥२५९॥
अभंग -- ३
श्रीनामदेव महाराज वाक्य--
दुर्लभ नरदेह झालां तुम्हां आह्मां । येणें सांधू प्रेमा राघोबाच्या ॥१॥
अवघे हातोहातीं तरों भवसिंधु । आवडी गोविंद्र जाऊं गीती ॥२॥
हिताचिया गोष्टी सांगू एकमेकां शोक मोह दु:खा निरसूं जेणे
एकमेका करुं सदा सावधान । नामीं अनुसंधान तुटो नेदू ॥४॥
घेऊं सर्वभावें रामनाम दीक्षा विश्वासें सकळिकां हेचि सांगो ॥५॥
नामा म्हणे शरण रिधी पंढरिनाथा ॥ न उपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥ ॥धृ०॥
ए० भा० अ० ९ --
साक्षेपें मनुष्यदेह जोडे । ऐसें करितां तव न घडे । अवचट हाता चढे । भाग्य चोखडे जयाचें ॥३७५॥
मोले आराध्य र्थ्यारत्नें येती । तैसा चिंतामणी नये हाती तेवी बहुत योनिये जन्म होती ॥
परी मनुष्यदेह प्राप्ती दुर्लभ ॥३७६॥
ऐसा नरदेह पावोनि देखा जो न सांधीती ब्रह्म सुख । तो जनामाजीं परम मूर्ख । विश्वा घातक देवाचा ॥३७७॥
अभंग --४
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
ऐका गा हे अवघे जन । शुध्द मन तें हित ॥१॥
अवघा काळ नये जरी । समयावरी जाणावा ॥२॥
नाहीं कोणी सवें येतां संचिता या वेगळा ॥३॥
बरवा आवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥४॥
कर्मभूमी ऐसा ठाव । व्यवसाव जाणावा ॥५॥
तुका ह्मणे उत्तम जोड । जातीं घडी नरदेह ॥६॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ० १२ -- किंबहुना इयापरी बाह्य चोख अवधारी । आणि ज्ञानदीप अंतरी म्हणोनि शुध्द ॥४६७॥
अभंग --५
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
बहुतां जन्माअंती । जोडी लागली हे हाती ॥१॥
मनुष्य देहा ऐसा ठाव । धरी पांडुरंगी भाव ॥२॥
बहु केला फेरा । येथें सांपडला थारा तुका ह्मणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शहाणे ॥४॥
ए० भा० अ० २ -- मने करावे हरिचे ध्यान । श्रवणे करावे कीर्ती श्रवण । जीव्हेने करावे नामस्मरण । हरि कीर्तन अहर्निशी ॥२९१॥
करिता रामकृष्ण स्मरण । उठोनी पळे जन्ममरण । तेथें भवभयाचे तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥२९६॥
अभंग --६
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
अरे गिळिलें हो संसारे । कांही तरि राखा खरें । दिला करुणा करें मनुष्यदेह सत्संग ॥१॥
येथें न घाली न घाली आड । संचितसा शुध्द नाड । उठाउठी गोड । बीजे बीज वाढवी ॥२॥
केले क्रियमाण । झालें ते संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरर्वरित उरलें ते ॥३॥
चित्त खोटे चालीवरी । रोग भोगाचे अंतरी । रसना अनावरी तुका ह्मणी ढुग वाहे ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ० ३ -- तेवी शुध्द ब्रह्मी संकल्पु नाहीं । शेखी न दिसे केवळ देहीं । माझारी वासनेच्या ठायी । देहाभिमानें पाही संसार भासे ॥६०॥
जागृती देहाचा विसर पडे । सवेची स्वप्नदेह दुजे जोडे । तेणें मिथ्ये प्रपंचु वाढे । स्वप्नी स्वप्नकुडें कदा न मनें ॥६१॥
जेवी मृगजळा मिथ्य भासे । तेवी ब्रह्मी प्रपंच नसे । तो निरसावया कैसे । साधनें पीसे पिशाचे ॥६४॥
माय म्हणावी येणें भावें । जे मी कदा विद्यावान नव्हे या लागी अविद्या येणें नांवे ॥ वेदानुभवे गर्जती शास्त्रे ॥४१॥
भ्रमू तो मायचे निज मूळ । भ्रंती हेचि फुल सोज्वळ । भुली ते इचे साजूक फळ । विषय रसाळ सदा फळित ॥४२॥
हे नसतेही निरुपे रुपा आली । सत्यासत्ये गरोदर जाहली । तेथें असयताची पिली स्वये ठयाली असंख्ये ॥४३॥
शशविषाण पादुका । लेऊनी ते चाले देखा । तिसी क्तो अहंकार सखा । आणि नेट्का जेष्टपुत्र ॥४७॥
कुळ विस्तारा लागी पाही । ममता व्याली ठायी ठायी । मोहे उपजवुनी देही । घरजावई त्या केला ॥४८॥
अह मोह ममता योगे । जग विस्तरले आंगे । स्थूळ सबळ प्रयोगे ॥ ममता निजांगे वाढवी ॥४९॥
आरसा काय प्रतिबिंब असे जो पाहे तोची आभासे । तेवीं आपुलेनि संकल्प वसे । माया उल्हासे नसतीची ॥५६॥
जेवी सूर्यासी संकल्प नसे । तरी नसता त्याच्या ठायी दिसे । जेव्हां का निजकारण वसे । अग्नि प्रकाशि सूर्यकांती ॥७०॥
अहंकार वाढता देहात्मता । विसरे आपुली चिद्रूपता । तो विसरू वाढवी विषय चिंता । तोचि तत्वता महामाया ॥१०९॥
समूळ मावळल्या अभिमान । कैची बुध्दी कैचे मन । बुडे चित्तांचे चित्तपण । ब्रह्मपरी पूर्ण कोंदाटे ॥११४॥
ज्ञा.अ.८ -- देहवैकल्याचा वारा । झण लागले या सकुमारा । म्हणोनि आत्म बोधाचा पिंजरा । सुर्ये तयातें ॥१३२॥
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हीव ऐसी करी साऊली । ऐसनि नित्य बुध्दी संचली । मी आणि तयाते ॥१३३॥
अभंग -- ७
श्रीज्ञानदेव महाराज वाक्य--
चोरासिया संगे क्रमितां पै पथ । ठकुनिया घात करितील ॥१॥
काम क्रोधे लोभ घेऊनिया संगे । परमार्थासि रिघे तोचि मूर्ख ॥धृ०॥
बांधोनिया शिळा पोहू जाता सिंधू । पावें मतिमदु मृत्यु शीघ्र ॥२॥
देह गेह भ्रांती सोडुनिया द्यावे ॥ साधन करावे शुध्द मार्गे ॥३॥
ज्ञान देव ह्मणे तरीच साधेल । नाही तरी चळेल मध्यभाग ॥४॥
ए०भा०अ० ३ -- तेवी विषयाहुनि सुखें सुख न पावतीच ब्रह्मादिक, विषयाचा जे मानिती हरिख ते परममूर्ख पशूदेही ॥२४४॥
अभंग --८
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
मोलाचे आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्ये होय लाभ याचा ॥१॥
अनंत जन्मांचा शेवट पाहतां ॥ नरदेह आला तुझ्या ॥२॥
कराल ते जोडी येईल कार्यासी । घ्यावे विठठलासी सुखालागी ॥३॥
सांचलिया धन होईल ठेवणें । तैसी नारायणा जोडी करा ॥४॥
करा हरिभक्ती परलोकी कामा । सोडविल यमापासोनिया ॥५॥
तुका ह्मणी करा आयुष्याच मोल नका वेंचू फोल नामेवीण ॥६॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०३ -- आगां कामधेनूचे दुभतें दैव जहाले आपैतें । तरी कामनेचि कां येथें वाणिकीजे ॥२३॥
देखा अमृत सिंधूतें टाकावें । मगव तहाना जरी फुटावें । तरी सायासु कां करावें ॥ मागील ते ॥२४॥
अभंग --९
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
काळें काळ वायां जातूं । तेणें होय आयुष्यअंतू ॥१॥
जाणोनिया रक्षी कोण सांडी देहाचा अभिमान ॥२॥
अभिमान सांडोनि झडकरी । एका जनार्दनी दास्य करी ॥३॥॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- जेथे चहुंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजें केविं पांडवा । तेविं लोकां येऊनि सोपद्रवा ॥ केवी न भाजिजे मातें ॥४९२॥
ज्ञा०अ०३ -- जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांच्छेचें कवण सांकडे आपुलेनि सुरवाडें । इच्छावेचि ना ? ॥२३॥
ए०भा०अ० २० -- काळे काळ वयस्य खातू । हा देखोनि आयुष्याचा वातु जाणोनि नरदेहाचा प्रांतू । होय आनस्कंतु देहगेहा ॥१६०॥
अभंग --१०
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
येऊनि नरदेहा झांकिलेती डोळे । बळेचि आंधळी होती लोक उजेडा सरसी न चालवी वाट । पुढिल बोभाटा जाणोनियां ॥२॥
बहु फेर आले सोसोनि वोळसा । पुढें नाही ऐसा लाभ मग । तुका ह्मणे जाऊ पादावी वाटे । भेटे तरी ॥४॥
भेटे कोणी तरी ॥४॥॥धृ०॥
ज्ञा.अ.६ -- कैसें प्राप्तीचिये वेळे ॥ निदैवा आंधळे पणाचे डोईळे । की असते आपुले डोळे ॥ आपण झांकी ॥७३॥
अभंग --११
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख शीण क्षणभंगुर ॥१॥
अविनासी जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही ॥२॥
क्षण भंगुर हा येथील पसारा ॥ आलिया आकारा अवघे नासे ॥३॥
तुका ह्मणे येथें सकळ विश्रांती ॥ आठवावा चित्ती नारायण ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा.अ.९ -- जें संसाराचें बैसणे जे विकारांचे उद्यानें ॥ जे सकळ रोगांचे भाणें ॥ वाढिले आहे ॥१४२॥
ज्ञा.अ.४ -- अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी बाहे तरी तेथें जिव्हाळा कांही आहे ॥ प्राप्तीचा पै ॥१९५॥
अभंग --१२
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
नेऊनि नरदेहा विचारावे सार ॥ धरावा पै धीर भजनमार्गी ॥१॥
चंचळ चित्तासी ठेवूनिया ठायी संताचिये पायी लीन व्हावें ॥२॥
भावाच्या पै हाते धरावा निश्चय । तेणे भवभय देशोधडी ॥३॥
नामा परते जगीं साधन सोपें नाहीं ॥ आवडीनें गाई सर्वकाळ ॥४॥
तुका ह्मणे वंश धन्य त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरु झाला ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ० ९ -- मनुष्यदेहीचेनि ज्ञाने । सच्चिदानंद पदवी घेणें । एवढा अधिकार नारायणें ॥ कृपा अवलोकनें दीधला ॥३३०॥
अभंग --१३
श्रीतुकाराम महाराज वाक्य--
घातले दुकान । देती अलियासी दान ॥१॥
संत उदार उदार भरलें अनंत भांडार ॥२॥
मागल्यासी पुरे ॥ धणी आणिकांसी उरे ॥३॥
तुका ह्मणे पोते । देवें भरिले नव्हतें रितें ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ० ११ -- असो मूर्खाची जे त्यागगती ॥ ते अत्यंत बाधें बाधक होती ॥ जव धरिली नाही सत्संगती तव त्याग स्थिती कळेना ॥१०॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या --
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन --
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ---मागणे हे एक तुजप्रती ।
भजन---ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ---पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि०
शेजआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
मागील मालिकेप्रमाणे म्हणावे
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम
N/A
References : N/A
Last Updated : December 05, 2019
TOP