प्राणवहस्त्रोतस् - हिक्का

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या
मुहुर्मुहुर्वायुरुदेति सस्वनो
यकृत्प्लिहान्त्राणि मुखादिवाक्षिपन् ।
स घोषवानाशु हिनस्त्यसून् यत -
-स्ततस्तु हिक्केति भिषग्भिरुच्यते ॥
सु.उ.१७-१४९,५०; पान १२४८

प्राणाचे हिंसन होते, (जीवाचा उपघात होतो.) म्हणून हिक्का म्हणतात. किंवा हिक् हिक् असा ध्वनि उमटतो म्हणूनहि हिक्का म्हणतात.

शारीर
श्वासामध्यें नाभिस्थली वाताची प्रेरणा उत्पन्न होते असें शार्ड्गधराने सांगितले आहे. ही प्रेरणा आंत घेणें आणि बाहेर टाकणें अशी लयबद्ध असते. वाताच्या विकृतीमुळें नाभीच्या आसमंतातील श्वसन सहाय्यक अवयव विकृत होतात. (नाभिपटल) व श्वासाचा लय बिघडतो व हिक्का उत्पन्न होते.

स्वरुप
या व्याधीमध्यें शब्द करीत मुखावाटे वायू बाहेर पडतो. त्यावेळीं उदरभागीं आक्षेप उत्पन्न होऊन धक्का बसल्यासारखे होते. ही क्रिया वरचेवर होते. व्याधीचे स्वरुप गंभीर असेल त्याप्रमाणें उदरभागी बसणार्‍या हिसक्यामुळें प्रत्येक उचकी गणीक उदरांतील आतडी, यकृत, प्लीहा हे अवयव जणु बाहेर फेकले जात आहेत असें वाटते. श्वासाप्रमाणेंच हा व्याधि दारुण व प्राणघातक आहे. अनेक व्याधीमध्यें हा व्याधी रिष्ट लक्षण म्हणून उत्पन्न होतो.

प्रकार
अन्नजां यमलां क्षुद्रां गम्भीरां महतीं तथा ।
वायु: कफेनानुगत: पंच हिक्का: करोति हि ॥
तासां भेदं संप्राप्तिं चाह-अन्नजामित्यादि ।
वायु:कफेनानुगत: सन् अन्नजादिभेदन पञ्च हिक्का: करोति ।
यमलैव चरके व्यपेतेति नाम्ना पठयते,
अन्नपाने व्यपेते परिणते जायत इत्यतो हेतो: ।
`कफेनानुगत: प्राण:' इति वा पाठ: ।
प्राणोऽत्र वायुरिति ।
सु.उ.५०-७ सटीक पान

क्षुद्रा, अन्नजा, यमला, गंभीरा आणि महति असें हिक्केचे पांच प्रकार सुश्रुतानें सांगितले आहेत. चरकानें यमले ऐवजी व्यपेता हिक्का सांगितली आहे.

हेतू
श्वास, कास या रोगामध्यें सांगितलेली कारणे याहि व्याधीचे निदान म्हणून असतात. विशेषत: धूम, शीताम्बुसेवन, आमदोष, विषमाशन, दौर्बल्य, शोधनातियोग, दचकणे, सौहित्य, ज्वर, यासारखे वातप्रकोपक व वाताची गति विषम करण्यास कारणीभूत होणारे हेतु हिका रोग उत्पन्न करतात.

संप्राप्ति
प्राणोदकान्नवाहीनि स्त्रोतांसि सकफोऽनिल: ।
हिक्का: करोति संरुध्य ।
च.चि.१७-२१ पान १२३४

हिक्केच्या संप्राप्तीमध्यें अन्नवह व प्राणवहस्त्रोतस हे अधिष्ठानभूत असते. अन्नवहस्त्रोतसातील प्रधान अवयव आमाशय व प्राणवह स्त्रोतसातील अवयव उर यांचा संबंध रचनादृष्टया जेथे येतो त्याचठिकाणी हिक्केची व्यक्तता होते प्राण आणि उदान यांची विकृति या विकारांत असते. प्राण अधोगामी आहे असें मानले जाते. उदान ऊर्ध्वगामी आहे असें म्हणतात. हे ज्यावेळीं विकृत होतात त्यावेळीं त्यांच्या गमनागमन क्रियेमध्यें प्रकृत स्थितीत असलेले सांमजस्य उरत नाहीं. लय नष्ट होते आणि या संघर्षातून हिका उत्पन्न होते. संप्राप्तीच्या वचनातील चरकांचा पाठ जरी सकफोऽनिल: असा असला तरी सुश्रुताचा टीकाकाअर डल्हण (सु.उ.५०-६ टीका.) व माधवाचा आतड्कदर्पणकार वाचस्पति हे दोघेहि चरकापेक्षां निराळा असा विकृताऽनिल: असा पाठ घेतात. हिक्केच्या निर्मितीतील श्वासाच्या अपेक्षेनें अगदी नगण्य असलेले कफाचे स्वरुप विचारात घेतले म्हणजे डल्हण वाचस्पतींचा पाठच अधिक योग्य आहे असें वाटते, हिक्केच्या प्रकारामध्येंहि वेगवेगळ्या घडामोडींचे वर्णन करीत असतांना केवळ वाताच्याच विमार्गगतेचा उल्लेख चरक, वाग्भटानेहि केला आहे. हिक्काश्वासाचे एकत्र वर्णन करीत असतांना जरी कफवातात्मकावेतौ असा कफाचा उल्लेख वाताच्या जोडीने केला असला तरी श्वासाच्या अपेक्षेनें हिक्केच्या संप्राप्तीतील कफाचे महत्व अल्प व निमित्तपात्र स्वरुपाचे आहे असें म्हटले पाहिजे. आमाशय हे हिक्केचे उद्भवस्थान असून अन्न व प्राणवह स्त्रोतसांच्या संगमस्थली ती व्यक्त होते. जत्रुमूल, कण्ठ, आंत्र, यकृत, प्लीहा या अवयवापर्यन्त हिक्केच्या आक्षेपाचा संचार कमी अधिक प्रमाणात जाणवतो.

पित्तस्थानसमुभ्दवाविति विशेषणं सुश्रुतमते क्षुद्रां न
प्राप्नोति, सा हि जत्रुमूलात्प्रधावितेति पठयते; चरकमते तु
व्यपेतां न प्राप्नोति, साऽपि जत्रुमूलादसन्ततेति पठयते ।
तस्मात् पित्तस्थानसमुभ्दवाविति विशेषणं छत्रिणो गच्छन्तीति न्यायेन बोध्यम् ।
मा.नि.हिक्का २, म. टीका, पान १३९

हिक्का आमाशयोद्भव आहे, या नियमास माधवाच्या टिकेत क्षुद्रा व व्यपेता यांचा अपवाद सांगितला आहे. त्यासाठी चरक-सुश्रुत मतांचा आधार दिला आहे. तो योग्य नाहीं असें आम्हास वाटते. हिक्का आमाशयोद्भवच आहे. प्रकारभेदानें लक्षणांची व्यक्तता होत असताना स्थान भेद जाणवतो इतकेच.

पूर्वरुपें :
मुखं कषायमरतिगौरवं कण्ठवक्षसो: ।
पूर्वरुपाणि हिक्कानामाटोपो जठरस्य च ॥
हिक्कानां पूर्वरुपमाह - मुखमित्यादि ।
मुखं कषायं वातात्, नतु कफान्माधुर्य, व्याधिप्रभावात् ।
अरति: न कुत्रचिदवस्थितिश्चेतस: ।
केचित् पूर्वरुपं न पठन्ति, कफवातोद्‍भवस्य गौरवादेरनुमानग्राह्यत्वात् ।
सु.उ.५०-८, सटीक, पान ७५८

कण्ठ आणि उर या स्थानी जडपणा वाटतो तोंडाला तुरट चव येते. पोट व कुशी यामध्यें फुगल्यासारखे वाटते. किंवा त्याठिकाणी गुर गुर असा आवाज येतो. चरकाने कुक्षेराटोप: असा पाठ घेतला आहे. त्यामुळें आमाशयापासून कुक्षीपर्यन्तची हिक्केच्या उद्भवस्थानाची व्याप्ति स्पष्ट होण्यास सहाय्य होते.

रुपें
हिक्केची सामान्य लक्षणें पुढील प्रमाणें असतात. उर आणि उदर यांच्या संधिस्थानी आक्षेप उत्पन्न होऊन हिक असा ध्वनि उमटतो. जत्रुमूल कण्ठ याठिकाणी उचकी येताना ओढल्यासारखी वेदना उत्पन्न होते. हिक्का हे लक्षण अधिक काल पर्यंत राहिल्यास गिळताना त्रास होणे, बोलताना कष्ट होणे, कासावीस वाटणे, उर, पृष्ठ, पार्श्व, उदर, मन्या याठिकाणी अवघडल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसतात.

क्षुद्रा -
क्षुद्रवातो यदा कोष्ठाद्‍व्यायामपरिघट्टित: ।
कण्ठे प्रपद्यते हिक्कां तदा क्षुद्रां करोति स: ॥
अतिदु:खा न सा चोर: शिरोमर्मप्रबाधिनी ।
न चोच्छ्वासान्नपानानां मार्गमावृत्य तिष्ठति ॥
वृद्धिमायास्यतो याति भुक्तपात्रे च मार्दवम् ।
यत: प्रवर्तते पूर्व तत एव निवर्तते ॥
हृदयं क्लोम कण्ठं च तालुकं च समाश्रिता ।
मृद्वी सा क्षुद्रहिक्केति नृणां साध्या प्रकीर्तिता ॥

(च.पा.) क्षुद्रेत्यादिना क्षुद्रहिक्कामाह ।
क्षुद्रवातोऽल्ववात:; केचित् क्षुद्रवातमुदानमाहु: ।
आयस्यत इति आयासं कुर्वत: मार्दवं यातीति संबन्ध: ।
यत: प्रवर्तते पूर्व तत एव निवर्तते इति उत्पद्यमानैव
निवर्तमान्रोगा भवति; महाहिक्कादिवदनबुद्धा न भवति;
उत्पादकहेतोर्व्यायामादेरेव निवर्तते; व्यायामादिना
हिक्काजनकवातस्य क्षुद्रस्य विक्षेपात् संप्राप्तिभड्गेनेति भाव: ।
क्षुद्रवातजनितत्वात् क्षुद्राहिक्का ।
च.चि. १७-३४, सटीक, पान १२३६

विकृष्टकालैर्या वेगैर्मन्दै: समाभिवर्तते ।
क्षुद्रिका नाम सा हिका जत्रुमूलात् प्रधाविता ॥
क्षुद्रालक्षणमाह - विकृष्टकालैरित्यादि ।
विकृष्टकालैरिति चिरेण वेगैर्जायते ।
किंभूता ? जत्रुमूलात् प्रधाविता आगता,
सा क्षुद्रिकाख्या । जत्रु: कण्ठोरसो: सन्धिरिति जेज्जट:;
जत्रु ग्रीवामूलं, तद्‍ग्रहणेन हृदयक्लोमकण्ठानामपि ग्रहणमिति गयदास: ।
सु.उ. ५०-११, सटीक, पान ७५९

एकदम केलेल्या हालचालीमुळें उदान वायू अल्प प्रमाणांत प्रकुपित होऊन स्त्रोतसांना आलेल्या अल्पशा वैगुण्यानें जत्रुमूल व कष्ठ याठिकाणी व्यक्त होणारी क्षुद्रा हिक्का उत्पन्न करतो. या हिक्केमध्यें वातप्रकोप अल्प प्रमाणांत असला तरी विकृतीची व्याप्ति कण्ठ, तालु, हृदय आणि क्लोम यांच्यामध्यें असते. मात्र तिचेहि प्रमाण अल्प असते. विकृतीच्या अल्पतेमुळें या हिक्केमध्यें पीडाकर लक्षणे विशेषशी नसतात. उर, शिर, मर्म येथे वेदना जाणवत नाहींत. श्वासोच्छवास व अन्नपान यांना विशेष असा अडथळा होत नाहीं. ही हिक्का श्रमानें वाढते कांहीं खाल्ले असतां उणावते. हिक्केचे लक्षण दिसूं लागल्यानंतर ते फारवेळ टिकत नाहीं. पहिला वेग आल्यानंतर पुन्हा येणारा वेग बर्‍याच कालानें येतो.

अन्नजा
सहसाऽत्यभ्यवहृतै: पानानै: पीडितोऽनिल: ।
ऊर्ध्व प्रपद्यते कोष्ठान्मद्यैर्वाऽतिमदप्रदै: ॥
तथाऽतिरोषभाष्याध्वहास्यभारातिवर्तनै: ।
वायु: कोष्ठगतो धावन् पानभोज्यप्रपीडित: ॥
उर; स्त्रोत: समाविश्य कुर्याद्धिकां ततोऽन्नजाम् ।
तथाऽशनैरसंबन्धं क्षुवंश्चापि स हिक्कते ॥
न मर्मबाधाजननी नेन्द्रियाणां प्रबोधिनी ।
हिक्का पीते तथा भुक्ते शमं याति च साऽन्नजा ॥
च.चि. १७-३८ ते ४१, पान १२३६

त्वरमाणस्य चाहारं भुञ्जानस्याथवा घनम् ।
वायुरन्नैरवस्तीर्ण कटुकैरर्दितो भृशम् ॥
हिक्कयत्यूर्ध्वगो भूत्वा तां विद्यादन्नजां भिषक् ।

अन्नजालक्षणमाह -
त्वरमाणस्येत्यादि । अन्नजादीनां साध्यत्वेन प्राशस्त्यात‍ पूर्वमभिधानम् ।
आहारं त्वरमाणस्य अथवा घनं गुरुमन्नं भुञ्जानस्य अन्नैरवस्तीर्ण
आच्छादितो वायु: तथा कटुकैर्भृशमर्दितो वायुरुर्ध्वगो भूत्वा हिक्कयति
हिक्कां करोति, भिषक् ताम् अन्नजां विद्यात् जानीयात् यद्य-
प्यन्नजायां वायु: कारणं, तथाऽप्यन्नेन तत्पीडनात्तद्‍व्यपेदश: ।
सटीक, सु.उ. ५०-९ पान ७५८-५९

क्रोध, फार बोलणे, फार चालणे, फार हसणे, ओझी वहाणे, इत्यादि कारणांनीं व कटु-रसयुक्त द्रव्यांनीं विशेषत: मद्याचे सेवनानें वात प्रकुपित होतो. प्रकुपित वायूचे अन्नपानानें पीडन होऊन कोष्ठगत वात विमार्गग होऊन प्राणवहस्त्रोतसास विकृत करतो. त्यामुळें हिक्का उत्पन्न होते. अन्नाच्या पीडनानें उत्पन्न होत असल्यामुळें या व्याधीस अन्नजा हिक्का असें म्हणतात. हिक्केचे वेग एकदां येऊं लागल्यानंतर पुन्हां वेग येण्यास प्रत्येक वेळीं अन्नसेवनाचेच निमित्त व्हावें लागते असें नाहीं. शिंकेसारख्या कारणानेहि हिक्केच्या वेगाचे पुनरावर्तन होऊं शकते. या हिक्केमुळें मर्मस्थानीं विशेषशी पीडा होत नसली तरी इंद्रिये तितकीशी कार्यक्षम रहात नाहींत. बोलणें, श्वास घेणे, गिळणें या क्रियांना थोडी फार अडचण होते. उर आणि शिर यामध्यें थोडयाशा वेदना जाणवतात. कांहीं खाल्ले प्याले असतां हिक्केच्या वेगाचे वेळ उपशमन होते.

यमजाव्यपेता
चिरेण यमलैर्वेगैर्या हिक्का संप्रवर्तते ॥
कम्पयन्ती शिरोग्रीवें यमलां तां विनिर्दिशेत्:

यमलालक्षणमाह -
चिरेणेत्यादि । या हिक्का चिरेण यमलैर्वेगैर्युगपद्वारद्वयं हिक्कते इत्यर्थ: ।
कम्पयन्ती शिरोग्रीवमित्युपलक्षणं; तेन चरकोक्ता: प्रलापवमितृष्णावैचित्त्यजृम्भाविप्लु-
ताक्षत्वमुखशोषाश्च बोद्धव्या इति गयदास: । इयमसाध्यऽपि
बलवत: स्थिरधात्विन्द्रियस्य सत्त्ववतश्च सिध्यति ।
सटीक सु.उ. ५०-१०, पान ७५९

व्यपेता जायते हिक्का याऽन्नपाने चतुर्विधे ।
आहारपरिणामान्ते भूयश्च लभते बलम् ॥
प्रलापवस्यतीसारतृष्णार्तस्य विचेतस: ।
जृम्भिणो विप्लुताक्षस्य शुष्कास्यस्य विनामिन: ॥
प्रर्याध्मातस्य हिक्का या जत्रुमूलादसन्तता ।
सा व्यपेतेति विज्ञेया हिक्का प्राणोपरोधिनी ॥
(च.पा.) व्यपेता परिणतेत्यर्थ: । आहारपरिणामान्ते इति
आहारपरिणामे वृत्ते; एतेनाहारेऽपि उत्पद्यते, अन्ते बल-
वती भवति, तां `व्यपेता' इति संज्ञया दर्शयति ।
विनामिन इति शरीरविनामकस्य । असंततेति अनतिदीर्घा ।
सटीक, च.चि. १७-३१ ते ३३, पान १२३५-३६

यमिका चेत्यनेन क्षुद्रा अन्नजा च या साध्यत्वेनोक्ता सा
यमलवेगेन जायमाना यमिका ज्ञेया ।
च.चि. १७-४४ टीका, पान १२३७

सुश्रुत हिक्केच्या प्रकारामध्यें यमला हिक्का समाविष्ट करतो. चरकानें यमला हिक्के ऐवजीं व्यपेता हिक्का सांगितली आहे. या यमला हिक्केमध्यें एकामागोमाग एक असें उचकीचे दोन आक्षेप लागोपाठ जोडीनें येतात म्हणून या हिक्केस यमला अशी संज्ञा आहे. आहाराच्या परिणामकालीं उत्पन्न होऊन पुढें वाढत जाते असा व्यपेता शब्दाचा अर्थ टीकाकारानें सांगितला आहे. तसेंच यमला, हा क्षुद्रा व अन्नजा हिक्केचाच अवस्था विशेषानें उत्पन्न होणारा एक प्रकार आहे असें म्हटलें आहे. सुश्रुतोक्त यमलाहिक्केच्या श्लोकावरील टीकेमध्यें लक्षणें सांगत असतांना ती पुरेशी नसून उपलक्षणात्मक असल्यानें चरकाच्या व्यपेता हिक्केच्या लक्षणांचाहि समावेश यमला हिक्केच्या लक्षणांत केला आहे. या सर्व प्रकरणावरुन यमला व व्यपेता एकरुप मानण्याकडे प्राचीन टीकाकारांचा कल असावा असें वाटते परन्तु मूल ग्रंथांतील वचनें दोन्ही एकरुप मानण्यास अनुकूल नाहींत असें आमचें मत आहे. माधवाच्या साध्यासाध्य प्रकारावरील टीकेंत मधुकोशकारानें यमला आणि व्यपेता भिन्न आहेत असें स्पष्ट म्हटलें आहे. यामुळें दोन्हीचा विचार वेगवेगळा करुन हिक्केचे सहा प्रकार मानावेत हेंच चांगले होईल.

यमला -
एकाच वेळीं एकापाठोपाठ एक अशा दोन उचक्या येतात, मध्ये कांहीं काल जातो व पुन्हां दोन उचक्या पाठोपाठ येतात. उचकीच्या वेळीं कंप उत्पन्न होतो.

व्यपेता -
अन्न पचत असतांना ही हिक्का उत्पन्न होऊन पुढें अधिकाधिक वाढत जाते. प्रलाप, छर्दि, अतिसार, तृष्णा, जृंभा, मुखशोष, डोळे पाणावणें वा विकृत होणें, शरीर वाकणें, आध्मान अशीं लक्षणें या हिक्केमध्यें असतात. ही हिक्का जत्रुमूलाशीं व्यक्त होते व हिचा वेग फारवेळ न टिकणारा असतो. श्वासोच्छ्‍वाला वा गिळण्याच्या क्रियेला या हिक्केमध्यें चांगलाच अडथळा उत्पन्न होतो.

गंभीरा हिक्का
हिक्कते य: प्रवृद्धस्तु कृशो दीनमना नर: ।
जर्जरेणोरसा कृच्छ्रं गम्भीरमनुनादयन् ॥
संजृम्भन् संक्षिपंचैव तथाऽड्गानि प्रसारयन् ।
पार्श्वे चोभे समायस्य कूजन्त्स्तम्भरुगर्दित: ॥
नाभे: पक्वाशयाद्वाऽपि हिक्का चास्योपजायते ।
क्षोभयन्ती भृशं देहं नामयन्तीव ताम्यत: ॥
रुणद्‍ध्युच्छ्वासमार्ग तु प्रनष्टबलचेतस: ।
गम्भीरा नाम सा तस्य हिक्का प्राणान्तिकी मता ॥
(च.पा.) तत्र हिगिति कायति शब्दं करोतीति हिक्का ।
गम्भीरमनुनादयन्निति हिक्काया अनु गम्भीरं शब्दं कुर्वन् ।
संक्षिपन्नड्गानीति योज्यम् । गम्भीरदेशभवत्वाद्‍ गम्भीरेति ।
संज्ञा ।
सटीक च.चि. १७-२७ ते ३०, पान १२३५.

नाभिप्रवृत्ता या हिक्का घोरा गम्भीरनादिनीए ।
शुष्कौष्ठकण्ठजिह्वास्यश्वासपार्श्वरुजाकरी ।
अनेकोपद्रवयुता गम्भीरा नाम सा स्मृता ।

गम्भीरालक्षणमाह - नाभिप्रवृत्तेत्यादि ।
या हिक्का नाभिप्रवृत्ता नाभित: प्रवृतिर्यस्या: सा, अत एव
अस्या गम्भीरात्वं; घोरा कष्टसाध्या ।
शुष्केत्यादि शुष्कशब्द ओष्ठादिभिश्चतुर्भि: संबन्धनीय: ।
तथा अनेकोपद्रववती अनेकोपद्रवैर्ज्वरश्वासतृष्णादिभिर्युक्ता,
सा गम्भीरा ना स्मृता; इयमसाध्या ।
सु.उ.५०-१२, १३ सटीक, पान ७५९

ही हिक्का उत्पन्न होताना नाभी वा त्याहीपेक्षां खालीं असलेल्या पक्वाशयासारख्या अवयवांतून उत्पन्न होत आहे असें वाटतें. हिक्केचा ध्वनि घुमत असल्यासारखा वाटतो. रोगी कृश, दीन झालेला असतो. छाती जर्जर होते. उचकी मोठया कष्टानें येते. श्वासोच्छ्वासास अडथळा येतो. अंग ताणणें, अवयवांना झटक येणें, जांभया येणें, पार्श्वभाग ताणला जाणें, अंधारी येणें, शरीर वांकडें होणें, विविध वेदना होणें अशीं लक्षणें होतात. ओठ, जीभ, घसा, तोंड कोरडे पडतें. पार्श्वशूल विशेषेंकरुन असतो.

महाहिक्का
क्षीणमांसबलप्राणतेजस: सकफोऽनिल: ।
गृहीत्वा सहसा कण्ठमुच्चैर्घोषवतीं भृशम् ॥
करोति सततं हिक्कामेकद्वित्रिगुणां तथा ।
प्राण: स्त्रोतांसि मर्माणि संरुध्योष्माणमेव च ॥
संज्ञां मुष्णाति गात्राणां स्तम्भं संजनयत्यपि ।
मार्ग चैवान्नपानानां रुणद्‍ध्युपहतस्मृते: ॥
साश्रुविप्लुतनेत्रस्य स्तब्धशंखच्युतभ्रुव: ।
सक्तजल्पप्रलापस्य निवृतिं नाधिगच्छत: ॥
महामूला महावेगा महाशब्दा महाबला ।
महाहिक्केति सा नृणां सद्य: प्राणहरा मता ॥
(च.पा.) प्राणोदकेत्यादिना विशिष्टहिक्कासंप्राप्तिमाह ।
क्षीणमांसबलप्राणतेजस इति । अत्र प्राणो वायु: उत्साहो
वा, तेजोऽग्नि: । उच्चैर्गृहीत्वा घोषवतीमिति योज्यम‍ ।
द्विसंततां त्रिसंततामनेकगुणां वा करोति; तत्र द्विसंततां
एकोपक्रमे वारद्वयं भवति । संरुध्योष्माणमिति देहोष्माणम्
संसक्तवचनतया प्रलाप यस्य स सक्तजल्पप्रलाप: ।
महामूलेति गम्भीराश्रयदोषमूला । महाशब्दत्वं च उच्चैर्घोषवती-
मित्यनेनैवोक्तमपि महाहिक्कासंज्ञोपादानार्थमिह पुनरुक्तं,
तेन महाहिक्केति संज्ञा ।
च.चि. १७-२२ ते २६ सटीक, पान १२३४-३५

स्तब्धभ्रूशंखयुग्मस्य सास्त्रविप्लुतचक्षुष: ॥
स्तम्भयन्ती तनुं वाचं स्मृतिं संज्ञां च मुष्णती ।
रुन्धती मार्गमन्नस्य कुर्वती मर्मघट्टनम् ॥
पृष्ठतो नमनं शोषं महाहिध्मा प्रवर्तते ।
महामूला महाशब्दा महावेगा महाबला ॥
वा.नि. ४.२५ ते २७ पान ४७५

मर्माण्यापीडयन्तीव सततं या प्रवर्तते ।
देहमायम्य बेगेन घोषयत्यतितृष्यत: ।
महाहिक्केति सा ज्ञेया सर्वगात्रप्रकम्पिनी ॥
सु.उ. ५०-१४, पान ७५९.

ध्वस्तभ्रूशंखयुग्मत्वादियुक्तस्य पुरुषस्य वाक्तनुस्तम्भादिकं
कुर्वती महाहिध्मा प्रवर्तते । सा च महामूलत्वादिरुपा ।
विप्लुते अनिबद्धे इव चक्षुषी । मर्मघट्टनं हृदयादिरुक् ।
पृष्ठतोनमनं वक्षसो बहिर्निस्सरणम् ।
महामूला आमाशये प्रथमोत्पत्तिर्यस्या: ।
तत्र बहुव्यापारवती दृश्यत इत्यर्थ: ।
इति महती ।
अ.स.नि.टीका, पान ३१

वात प्रकुपित होऊन तो कफानें आवृत होतो. रोगी कृश असतो. त्याचें बल, उत्साह आणि अग्नि हे भाव क्षीण झालेले असतात. रुग्णाच्या अशा स्थितींत प्रकुपित झालेला वायु नाभी, आमाशय, हृदय, क्लोम अशा गंभीर अवयवांपासून उत्पन्न होऊन कंठापर्यंत शरीर व्यापून मोठयानें शब्द करणारी हिक्का उत्पन्न करतो. या हिक्केचा वेग, ध्वनि व सामर्थ्य मोठे असल्यामुळें हिला महाहिक्का अशी संज्ञा आहे. या हिक्का एकावेळीं एक, दोन, तीन अशा समुदायानें येतात. त्यांचा वेग उग्र असतो. प्राणवहस्त्रोतस् संरुद्ध होऊन श्वासोच्छ्‍वास कष्टानें व अडखळत होतो मर्मामध्यें वेदना होतात. शंखभागी जखडल्यासारखें होते. दृष्टि फिरते, डोळे पाणावतात, भिवया ओघळतात. शब्द उमटत नाहीं. रोगी कांहीतरी बडबडत असतो पण शब्द स्पष्ट नसतात. अवयव ताणल्यांसारखे होतात. शरीर जखडतें. स्मृति नष्ट होते. संज्ञा लोपते. गिळतां येत नाहीं. तहान फार लागते. देहोष्माहि अवरुद्ध झाल्यामुळें अंग गार पडतें. शरीर पाठीकडे वाकून छाती पुढें उचलल्यासारखी वाटते. इतरहि अनेक पीडाकर लक्षणें उत्पन्न होतात.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें
स्वरभेद, हृद्रोग, श्वास, कास, पार्श्वशूल (च.चि. १७-१०३)

उपद्रव
स्वरक्षीणता, हृदशूल, शोथ, दौर्बल्य, श्वास, ज्वर, असें उपद्रव होतात.

उदर्क
प्राणोपरोध, अन्नमार्गावरोध.

साध्यासाध्य विवेक
आयम्यते हिक्कतो यस्य देहो दृष्टिश्चोर्ध्व नाम्यते यस्य नित्यम् ।
क्षीणोऽन्नद्विट्‍ क्षौति यश्चातिमात्रं तौ द्वौ चान्त्यौ वर्जयेद्धिक्कमानौ ॥
अतिसंचितदोषस्य भक्तच्छेदकृशस्य च । व्याधिभि: क्षीणदेहस्य वृद्धस्यातिव्यवायिन : ॥
आसां या सा समुत्पन्ना हिक्का हन्त्याशु जीवितम् ।
यमिका च प्रलापार्तिमोहतृष्णासमान्विता ॥
अक्षीणश्चाप्यदीनश्च स्थिरधात्विन्द्रियश्च य: ।
तस्य साधयितुं शक्या यमिका हन्त्यतोऽन्यथा ॥
म. अवस्थायामसाध्यत्वमाह - आयम्यत इत्यादि ।
आयम्यते विस्तार्यत इव । दृष्टिश्चोर्ध्य भवतीति पाठान्तरे मुह्यति हिक्की ।
क्षौति छिक्कति । तौ द्वाविति आयम्यत इत्यादिना नित्यमित्यन्तेनैकावस्थो
हिक्की, क्षीणेत्यादिनाऽतिमात्रान्तेनापर: साध्यानामपि मध्ये एवंविधौ वर्जयेदित्यर्थ: ।
गम्भीरामहत्यो: स्वभावादेवासाध्यत्वमिति तद्युक्तौ हिक्कमा-
नावन्त्यौ शेषपठितावसाध्यौ, पाठान्तराणि व्याख्याविशेषाश्च विस्तरभयान्न लिखिता: ।
आसां या सेति आसां साध्यहिक्कानां मध्ये या अतिसंचितदोषादिभवति सा हन्तीति योज्यं,
अथवा आसामिति पञ्चविधानामेव । तेन महतीप्रभृतीनां स्वरुपेण यदसाध्यत्वमुक्तं तत्प्रायिकम् ।
यदाह जतूकर्ण:, ``आद्या दु:साध्या: इति । यमिकेत्यादि । यमिका मोहतृष्णावत: सद्य: प्राणहृत्'' इति ।
यमिकेत्यादि । यमिका चेत्यनेन चकरात् क्षुद्रा अन्नजा वा या साध्यत्वेनोक्ता सा
यमलैर्वेगैर्जायमाना हन्तीति योज्यम् । सैवाक्षीणादे: साध्या भवतीत्याह -
अक्षीण इत्यादि । अक्षीणो बलवान् । अदीन: प्रसन्नमना: अन्ये तु अन्नजां यमलामित्यादिसुश्रुतग्रन्थपठितां
यमलां यमिकाशब्देन व्याचक्षते । तन्न, यमिका च प्रलापातींत्यादिश्लोकश्चरके पठित:, अत्र यमला यमिकानाम्ना
न पठितैव हिक्केति । यमिकाशब्देनैवार्थगत्या व्यपेतोच्येतति चेत्, न तर्हि व्यपेता च प्रलापार्तीत्येवमभिदध्यात् ।
मा.नि.हिक्का ११ ते १४ म. टीकेसह, पान १४१-४२

क्षुद्रा व अन्नजा या हिक्का साध्य आहेत. गंभीरा व महती या हिक्का असाध्य आहेत. व्यपेता ही चरकोक्त हिक्काहि तिच्या लक्षणांचा विचार करतां असाध्यच आहे. यमला हिक्का अवस्थानुरुप साध्य वा असाध्य असते. यमला हिक्केंत रोगी स्थिरधातु, स्थिरेंद्रिय, सत्ववान असा असला, कृशता आली नसली तर व्याधि बरा होतो. प्रलाप, वेदना, तृष्णा, मोह या लक्षणांनीं युक्त यमला हिक्का असाध्य होते. रोगी वृद्ध, अतिमैथुन करणारा, व्याधीनें क्षीण देह झालेला, व्याधींतील दोषसंचय अतिशय असलेला वा अन्न तुटल्यामुळें कृश झालेला असेल तर अशा स्थितींत स्वभावत: साध्य स्वरुपाच्या असलेल्या हिक्का सुद्धा असाध्य होतात.

रिष्ट लक्षणें
श्वासैकहेतुप्राग्रूप्सड्ख्याप्रकृतिसंश्रया: ॥ हिध्मा: ॥
वा.नि.४-१८, पान ४७४

हिक्केचे बहुतेक सर्व भाव श्वासासारखे असतात असें म्हटलें आहे. त्यावरुन श्वासकासांची म्हणून सांगितलेलीं ज्वर, छर्दि, तृष्णा, अतिसार, शोथ ही रिष्ट लक्षणें हिक्केचीहि रिष्ट लक्षणें असतात असें म्हणतां येईल. या व्यतिरिक्त देहविनमन, गात्रस्तंभ, संरुद्ध देहोष्मता, (अंग गार पडणें) मूर्च्छा, ही हिक्केच्या विविध प्रकारांत वर्णिलेलीं लक्षणेंहि रिष्ट लक्षणें असूं शकतात.

चिकित्सा सूत्रें
प्राणायामोद्वेजनत्रासनानि सूचीतोदै: संभ्रमश्चात्र शस्त: ।
इदानीं हिक्कानां चिकित्सितमाह - प्राणायामोद्वेजनेत्यादि ।
अत्र हिक्कासु, प्राणायामादि शस्तमिति संबन्ध: ।
प्राणायामो वायोर्निरोध: । यद्यपि रेचकपूरककुम्भकभेदात्
प्राणायामस्त्रिविध:, तथाऽप्युर्ध्वगतिनिरोधात् कुम्भक एवात्र ।
त्रासनमल्पसत्त्वस्य भयोत्पादकैर्वाक्यै: । उद्वेजनं परुषवचनै: ।
सूचीतोदै: संभ्रम: सूचीव्यथाभिर्मनस आकुलीकरणम् ।
एतच्च प्राय: क्षुद्रायामन्नजायां च योजनीयम् ।
सु.उ. ५०-१६, सटीक. पान ७५९

शीताम्बुसेक: सहसा त्रासो विस्मापनं भयम् ।
क्रोधहर्षाप्रियोद्वेगा हिक्काप्रच्यावना मता: ॥
च.चि. १७-१३७, पान १२४६

रोग्याला कुंभक करावयास सांगावें वा कोणत्यातरी उपायानें त्याचा कुंभक सहजपणें घडेल असें करावें. एखादी चांगली पिशवी तोंडावर चढवून श्वासोच्छ्‍वासाला मिळणारे बाह्य वायूचें प्रमाण नियंत्रित करावें. पिशवीतल्या पिशवींत जर श्वासोच्छ्‍वास करावयास लागला तर कुंभकाचें कार्य आपोआप होतें. वायूची विमार्गगता नष्ट होऊन तो मार्गग व्हावा यासाठीं एकदम उद्वेग उत्पन्न होईल, भीती वाटेल, रोगी दचकेल असें कांही उपचार करावेत. त्यासाठीं भय दाखवावें, अंगावर एकदम ओरडावें, सुया टोचाव्यात, वा अंगावर गार पाणी शिंपडावें. फार आनंद होईल, फार दु:ख होईल अशीं परिस्थिती उत्पन्न करावी. हे वा यासारखे उपचार करावेत. वातावर कराव्या लागणार्‍या त्रासन चिकिसेचाच हा एक भाग आहे असें समजावें. इतर चिकित्सा सूत्रें श्वासाप्रमाणेंच जाणावीत.

कल्प
पिंपळी, अहळीव, वचा, जटामांसी, सर्पगंधा, खुरासनी ओवा, जीरक, गैरिक, मयूरपिच्छामशी, शंखभस्म, मौक्तिक, कामदुहा, त्रिफला, द्राक्षा-आरग्वध फांट, सूतशेखर, लक्ष्मीविलास, यांतील योग्य तीं द्रव्यें एकत्र करुन रोग्यास वरचेवर चाटवावीत. अनुलोमन होईल असें उपचार करावेत. दोषांचें बलाबल असेल त्याप्रमाणें वमन, स्त्रंसन, या उपायांचा अवलंब करावा.

अन्न
लघु, द्रव, संतर्पण, अनुलोमन असा आहार द्यावा.

विहार
हालचाली कमी कराव्यात.

पथ्यापथ्य
हिक्काश्वासविकाराणां निदानं यत् प्रकीर्तितम्
वर्ज्यमारोग्यकामैस्तद्विक्काश्वासविकारिभि: ॥
च.चि.१७-१३८, पान १२४६

स्वेदनं वमनं नस्यं धूमपानं विरेचनम् ।
निद्रा स्निग्धानि चान्नानि मृदूनि लवणानि च ॥
जीर्णा: कुलित्था गोधूमा: शालय: षष्टिका यवा: ।
एणतित्तिरलावाद्या जाड्गला मृगपक्षिण: ॥
उष्णोदकं मातुलुंगं पटोलं बालमूलकम् ।
पक्वं कपित्थं लशुनं क्षौद्रं चेष्टानि हिक्किनाम् ॥
यो.र. हिक्का, पान ३६६

निष्पावमाषपिण्याकवारिजानूपमामिषम् ।
अविदुग्धं दन्तकाष्ठं बस्तिं मत्स्यांश्च सर्षपान् ॥
अम्लं तुम्भीफलं कन्दं तैलभृष्टोपोदिकाम् ।
गुरु शीतं चान्नपानं हिक्कारोगी विवर्जयेत् ।
यो.र.हिक्का, पान ३६६

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP