प्रलिम्पन्निव गात्राणि घर्मेण गौरवेण च ।
मन्दज्वरविलेपी च सशीत: स्यात्प्रलेपक: ॥
म.-प्रलेपकमाह - प्रलिम्पन्नित्यादि । मन्दज्वरश्वासौ विलेपी
चेति मन्दज्वरविलेपी, विलेपित्वं चास्य यस्माद्धर्मगौरवाभ्यां
लिम्पति संबघ्नातीत्यर्थ: ।
अयं च कफपित्तज: । यदुक्तं सुश्रुतेन, - ``प्रलेपकं वातबलासकं वा''-
(सु.उ.तं.) अ.३९) इत्यादि ।
तथा यक्ष्मणि ``ज्वरो दाहोऽतिसारश्च पित्ताद्रक्तस्य चागम:''
(सु.उ.तं.अ.४१) इत्युक्तं, यक्ष्मणि चायं भवतीति ।
अन्ये तु त्रिदोषजयक्ष्मजनितत्वेन त्रिदोषज एवायं,
उद्भूतवेन तु कफपित्तव्यपदेश: ।
मा.नि. ज्वर ४१, म. टीकेसह, पान ५५
संधीमध्यें स्थानंश्रय केलेल्या कफप्रधान दोषानें उत्पन्न होणार्या या ज्वरामध्यें शरीर गार, चिकट, व घामाचा लेप लागल्याप्रमाणें होतें. सर्व अंग जड होतें. थंडी वाजते, ज्वरवेग मंद असतो.
तथा प्रलेपको ज्ञेयं शोषिणां प्राणनाशन: ।
दुश्चिकित्स्यतमो मन्द: सुकष्टो धातुशोषकृत् ॥
प्रलेपकलक्षणमाह - तथा प्रलेपको ज्ञेय इत्यादि ।
दु:चिकित्स्यतम इति हेतुभावेन सन्निपातात्मकत्वात् ।
मन्दो मन्दवेग: । सुकष्ट इति हेतुफलभावेन मारणात्मकत्वात् ।
सु.उ. ३९-५४ सटीक, पान ६७५
हा प्रलेपक ज्वर अत्यंत कष्टदायक असून क्षयी रोग्याच्या प्राणास बहुधा घातक ठरतो. या विकारानें धातु शुष्क होत जातात. कफप्राधान्य आणि संधिगतत्व हें याच्या कष्टदायकतेचें कारण आहे.
गोसर्गे वदनाद्यस्य स्वेद: प्रच्यवते भृशम् ।
लेपज्वरोपसृष्टस्य दुर्लभं तस्य जीवितम् ।
मृत्युश्च तस्मिन् बहुपिच्छिलत्वाच्छीतस्य
जन्तो: परीत: सरत्वात् ।
स्वेदो ललाटे हिमवन्नरस्य शीतार्दितस्यैति सुपिच्छिलश्च ।
कण्ठे स्थितो यस्य न याति वक्षो नूनं यमस्यैति गृहं स मर्त्य: ॥
स्त्रुतस्वेदो ललाटाद्य: श्लथसन्धानबन्धन: ।
मुह्येदुत्थाप्यमानस्तु स स्थूलोऽपि न जीवति ।
यस्य स्वेदोऽतिबहुल: पिच्छिलो याति: सर्वत: ।
रोगिण: शीत गात्रस्य तदा मरणमादिशेत्''-इति ॥
मा.नि. ज्वर ७३ सटीक पान ६७
राजयक्ष्म्यामध्यें जो हा प्रलेपकज्वर असतो त्यानें पीडित रुग्णास सकाळच्या वेळीं तोंडावर, कपाळावर, विशेष घाम येत असून घाम चिकट असेल, अंगाचा स्पर्श सापेक्षत: शीत असतांनाहि कपाळावर घाम येत असेल, गळ्याला खूप घाम येतो पण छातीला मुळींच येत नाहीं अशी स्थिती असेल, तर कृशता आली नसली तरी रोग्याचें आयुष्य टिकणें कठीण असतें. ज्वर प्रकरणांत आलेलें हें वर्णन प्रलेपकासाठींच असलें पाहिजें. कारण त्या प्रकारांतच अशी स्थिति बहुधा येते.
१६ वातबलासक ज्वर
नित्यं मन्दज्वरो रुक्ष: शूनकस्तेन सीदति ।
स्तब्धाड्ग: श्लेष्मभूयिष्टो नरो वातबलासकी ॥
म. - उक्तसंगत्या प्रलेपकादनूपद्रवत्वेन तत्सधर्मिणि
वातबलासके वाच्ये प्रतिलोमतन्त्रयुक्त्या वातबलासकमेवाह-
नित्यमित्यादि । वातबलासकाख्यो ज्वरोऽस्यास्तीति
वातबलासकी नर:, तेन ज्वरेण, शूनक: शोथी, सीदत्यवसन्नो
भवति, शोथिन: स उपद्रव इत्यर्थ: ।
`शून: कृच्छ्रेण सिध्यति' इति पाठान्तरे `तेन' इति शेष: ।
वातबलासकमेके कुम्भाख्यपाण्डुरोगविषयमाहुरिति गदाधर: ।
वातबलासकारब्धत्वाद्वातबलासक:; बलासक: श्लेष्मा,
पित्तमप्यत्र बौद्धव्यम् । यदुक्तं तन्त्रान्तरे, - ``वायु: प्रकुपितो
दोषावुदीर्योभौ विधावति । स शिरस्य: शिर: शूलम्'' इत्यादि ।
यच्चोक्तं सुश्रुतेन, - ``प्रलेपकं वातबलासकं वा कफा-
धिकत्वात्प्रवदन्ति तज्ज्ञा:'' इति (सु.उ.तं.अ. ३९)
तत्तु श्लेष्मणो नित्यानुसक्तत्वेनेति जेज्जट: ।
रुक्षत्वं चास्य वातपित्ताभिभूतत्वात्कफस्नेहस्य, व्याधिप्रभावाद्वेति ।
मा.नि. ज्वर ४० म. टीकेसह पान ५५
अन्यत्र तु वाताधिकत्वेन दर्शित:, तत्कथमत्र श्लेष्मभूयिष्ठत्वमुक्तम् ।
अत्रोच्यते-वातेरितसर्वसंधिरुपकफारब्धत्वात् वातबलासकस्तु
यथार्थनामा वातेरितो बलासक आरम्भको यस्येति ।
मा.नि. ज्वर ४०, आ.टीका, पान ५५
वातबलासक हा उपद्रव म्हणून येणारा राजयक्ष्म्यांतील एक विकारविशेष आहे. यांत ज्वर सतत असतो. त्याचा वेग मंद असतो. रोग्याच्या अंगावर सूज येते. शरीर स्तब्ध होतें. रुक्षतेमुळें मूत्रादींची प्रवृत्ति होत नाहीं. वातानें कफाचें उदीरण होऊन विकार उत्पन्न होतो म्हणून यास वातबलासक असें म्हणतात. पित्ताचा अनुबंधहि येथें असतो. वातपित्तामुळें कफाचें उपशोषण होऊन रुक्षतादि लक्षणें उत्पन्न होतात. कांहीं वैद्य वातबलासक विकारास पांडु, कुंभकामला या व्याधींचा उपद्रव मानतात. या विकारानें रोगी क्रमानें क्षीण होत जातो. प्रलेपक आणि वातबलासक या दोन्ही विकारामध्यें कफाचे प्राधान्य असतें. राजयक्ष्म्यांचेच उपभेद म्हणून विशिष्ट कारणांनीं उत्पन्न होणारे कांहीं शोष वर्णन केले आहेत त्यांचीं नांवें उत्पादक कारणांवरुनच दिलीं आहेत. ते शोष असे -
व्यवायशोकस्थाविर्यव्यायामाध्वोपवासत: ।
व्रणोर:क्षतपीडाभ्यां शोषानन्ये वदन्ति हि ।
एकीयमतेन शोषभेदान्निर्दिशन्नाह - व्यवायशोकेत्यादि ।
व्यवाय: स्त्रीसेवा, शोक:पुत्रादिवियोगेन चित्तोद्वेग:, स्थाविर्य
वृद्धत्वं, अन्ये वार्धक्यमिति पठन्ति, तत्राप्येकोऽर्थ:; व्यायाम:
शरीरायासजनकं कर्म, अध्वा दीर्घमार्गाटनं; व्यवायाद्युपवा-
सान्तैर्हेतुभिस्तथा व्रणपीडया उर:क्षतपीडया चान्ये शोषान्
वदन्तीति संबन्ध: ।
सु.उ. ४१-३६ सटीक, पान ७१२
मैथुन, शोक, वार्धक्य, व्यायाम, मार्गक्रमण, उपवास, व्रणपीडा आणि उर:क्षत या कारणांनीं शोष हा व्याधि उत्पन्न होतो.
केषाचिदेवं शोषो हि कारणैर्भेदमागत: ।
न तत्र दोषलिड्गानां समस्तानां निपातनम् ॥
एकीयमतमाह - केषांचिदित्यादि । केषांचिदाचार्याणां मते
एवं व्यवायादिभिरनेकै: कारणै: कृत्वा हि यस्मात् शोषो
भेदमागत:, अत एक एव स्वमते शोषो नेतरे व्यवायादिजा:।
कुतो व्यवायादिजा: शोषो न भवन्तीत्याह न तत्रेत्यादि ।
तत्र तेषु व्यवायादिजेषु ।
सु.उ. ४१-२६. सटीक पान ७१३
क्षया एव हि ते ज्ञेया: प्रत्येकं धातुसंज्ञितां: ॥
यदि ते व्यवायादिजा: शोषा: न भवन्ति तर्हि किंनामधेया
भवन्तीत्याह-क्षया एवेत्यादि ।
ते व्यवायादिजा: क्षया एव, किंविशिष्टा: ?
प्रत्येकं धातुसंज्ञिता: धातुक्षयसंज्ञका इत्यर्थ: ।
यत: शुक्रमारभ्य विलोमेन व्यवायादिभिर्धातूनां
यथापूर्व संशयात् ।
सु.उ. ४१-२७ सटीक, पान ७१३
एकेका कारणानें उत्पन्न होणार्या या शोषामध्यें तीन दोषामुळें निर्माण होणारीं सर्व प्रकारचीं लक्षणें दिसून येत नाहींत. लक्षणें मर्यादित राहातात. उपद्रवहि फारसे असत नाहींत. यामुळें या विकारांना राजयक्ष्मा न म्हणतां त्या त्या कारणानें उत्पन्न होणारा विशिष्ट धातूंचा क्षय असें म्हटलें आहे. वर जीं सात कारणें सांगितलीं आहेत त्यामध्यें क्रमानें शुक्रापासून एकेका धातूचा विशेषेंकरुन क्षय होतो. मैथुनामुळें शुक्राचा, शोकानें मज्जेचा, वार्धक्यानें अस्थीचा, व्यायामानें मेदाचा, मार्गक्रमणानें मांसाचा, व्रन व उरक्षत यामुळें रक्ताचा आणि उपवासामुळें रसाचा विशेषेंकरुन क्षय होतो असें मत सुश्रुत व त्यावरील टीकाकार यानें मांडलें आहे. विकार उत्पन्न झाल्यानंतर त्याचा परिणाम उण्याअधिक प्रमाणांत सर्व देहधातूंवर होत असला तरी प्राचीनांनीं वर्णन केलेली उत्पत्तिक्रमाची विशिष्टता लक्षांत ठेवण्यासारखी आहे.