प्राणवहस्त्रोतस् - व्रण शोष
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
रक्तक्षयाद्वेदनाभिस्तथैवाहारयन्त्रणात् ।
व्रणितस्य भवेच्छोष: स चासाध्यतम: स्मृत: ॥
व्रणशोषिलक्षणमाह - रक्तक्षयादित्यादि ।
व्रणशोषिणो वैशेषिकलक्षणानुपदेशात् सामान्यलक्षणं ज्ञेयम् ।
यद्येवं, कुतोऽस्य पृथगभिधानमिति चेत्, विशिष्टकारणतया
असाध्यतमत्वख्याते: ।
सु.उ.४१-२३, सटीक, पान ७१३
शोणितक्षये त्वक्पारुष्यमम्लशीतप्रार्थना सिराशैथिल्यं च ।
सु.सू. १५-९, पान ६९
चिरकारी व्रणामुळें विशेषत: नाडीव्रणामुळें रक्त क्षीण होतें. व्रणाच्या उपचारामध्यें पाळावें लागणारें नियंत्रण व व्रणभेदनेनें येणारें अस्वास्थ्य यामुळें रुग्ण अधिकाधिक क्षीण होत जातो. त्वचेचा वर्ण म्लान होतो. त्वचा रुक्ष, खरखरीत होते. शिरांना शिथिलता येते. रक्ताच्या विकृतीनें रोगी अधिकाधिक दुर्बल होत जातो. व्याधीचें स्वरुप असाध्य असतें.
N/A
References : N/A
Last Updated : July 22, 2020
TOP