प्राणवहस्त्रोतस् - शोक शोष
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
प्रध्यानशील: स्त्रस्ताड्ग शोकशोष्यपि तादृश: ।
विना शुक्रक्षयकृततैर्विकारैरभिलक्षित: ॥
शोकशोषिणमाह-प्रध्यानशील इत्यादि ।
प्रध्यानशील: चिन्तापर:, स्त्रस्ताड्ग अवसन्नगात्र: ।
तादृश: इति व्यवायशोषितवदभिलक्षित:, परं
शुक्रक्षयकृतैर्लिड्गैर्विना; एतेन पाण्डुदेह इत्यर्थ: ।
सु.उ. ४१-१८ सटीक, पान ७१२
मज्जक्षयेऽल्पशुक्रता पर्वभेदोऽस्थिनिस्तोदोऽस्थिशून्यता च ।
सु.सू. १५-९, पान ६९
शीर्यन्त इव चास्थीनि दुर्बलानि लघूनि च ।
प्रततं वातरोगीणि क्षीणे मज्जनि देहिनाम् ॥
च.सू. १७-६८, पान २१७
अस्थ्नां मज्जनि सौषिर्य भ्रमस्तिमिरदर्शनम् ॥
वा.सू. ११-१९, पान १८५
प्रिय व्यक्तीचा वियोग, धनादि संपत्तीचा नाश, संकटें. यामुळें उत्पन्न झालेल्या अतिशोकाचा, चिंतेचा परिणाम म्हणून शोकशोष हा व्याधि उत्पन्न होतो. यामध्यें सुश्रुताच्या टीकाकारानें सांगितलेल्या अनुक्रमाप्रमाणें मज्जक्षयाची लक्षणें दिसतात. बाह्य लक्षणें व्यवायशोषी रोग्याप्रमाणें दिसतात. शुक्रक्षयामुळें उत्पन्न होणारे कष्टप्रसेक, शिस्त्रवेदना हे विकार मात्र या व्याधींत असत नाहींत. रोगी कोठें तरी लक्ष लावून उदास व सचिंत बसलेला असतो. अंग गळून जाणें, डोके रिकामें पोकळ वाटणें, अंधारी येणें, चक्कर येणें, अंग कापणें अशीं लक्षणें दिसतात. वातरोगाप्रमाणें लक्षणें दिसतात.
N/A
References : N/A
Last Updated : July 21, 2020
TOP