प्राणवहस्त्रोतस् - क्षयज स्वरभेद
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
धूप्येत वाक् क्षयकृते: क्षयमाप्नुयाच्च
वागेष चा (वा) पि हतवाक् परिवर्जनीय: ।
क्षयजस्वरभेदलक्षणमाह - धूप्येतेत्यादि ।
धूप्येत मुखाद्धूमभिवोद्वमति, `ब्रुवन्' इति वाक्यशेष: ।
क्षयमाप्नुयाद् वागिति वचनक्षयं प्राप्नुयात् `वातात्' इति शेष: ।
सु.उ. ५३-६ सटीक पान ७७१
क्षयामध्यें उत्पन्न होणार्या स्वरभेदामध्यें मुखावाटें जणुं धूर बाहेर पडत आहे असें वाटतें. स्वरहि घुसमटल्यासारखा वाटतो. वातप्रकोपामुळें स्वर संपूर्ण नष्ट झाल्यासारखा होतो (छातीमध्यें दुखणें, कृशता, मंदज्वर, दौर्बल्य अशीं लक्षणें अनुषंगानें असतात.)
N/A
References : N/A
Last Updated : July 21, 2020
TOP