बालकांड - श्रीरामाची आरती

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.


ओवाळू आरती प्रभु रामाची ।
जीवन ज्योतीत उजळून छाया
गेऊन आलो सुकृत ठेवा ।
चरणी वहाया देवाधीदेवा
जाळून विरागी मदमोहमाया ॥१॥

कांही ना आता आशा मनात ।
द्यावा विसावा चरणी निवांत ।
गाईन गाथा नयनात साया ॥२॥

जे जे दिसाया या जगती अनंत ।
तुझीच रूपे जाणी हृदयात ।
द्वैत मनीचे जातसे विलया ॥३॥

सावळी मूर्ती मनमंदीरात ।
मानसपूजा होई दिनरात ।
प्रणाम पतीतपावन  पाया ॥४॥

विसरून गेले जनबंधूभाव ।
कुणी ठेवीना मनि प्रमभाव ।
परतूनी यावे जग उद्धराया ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP