मल्हारी मार्तंड विजय - अध्याय सातवा
श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.
॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ मग धर्म पुत्र साती ॥ जोडोनि पाणी स्तवन करिती ॥ नमो नमो जी महामूर्ति ॥ सदाशिवा ॥१॥
नमो नमो जी गंगाधरा ॥ भस्मोध्दारण व्याघ्रांबरा ॥ त्रिपुरांतका त्रितापहरा ॥ गिरिजावरा तुज नमो ॥२॥
नमो नमो जी जगदीश्वरा ॥ जटाजूटचंद्रभूषणरुद्रा ॥ जगन्नाथा वरदेश्वरा ॥ नागभूषणा तुज नमो ॥३॥
भूतभव्यत्रिनयना ॥ पिनाकपानि पंचवदना ॥ त्रिदशेश्वरा अरिमर्दना ॥ दीनवत्सला तुज नमो ॥४॥
स्तवनी शिव तोषले ॥ म्हणे किं निमित्य आगमन जाहलें । द्विज म्हणती मल्लें गांजिलें ॥ म्हणोनि सांगो आलों तुज ॥५॥
करुनि दुर्धर अनुष्ठान ॥ एकांगुष्टधूम्रपान ॥ ब्रह्मदेवासी केले प्रसन्न ॥ मल्ल दैव्यें ॥६॥
तेणें आमुचे आश्रम नासिले ॥ कामधेनुसि मारिलें ॥ वेदींत मद्य प्याले ॥ स्त्रिया मुलांसि ताडण बहु ॥७॥
तसे विष्णूसि नाटोपे ॥ शक्र तयांसि थरथरां कांपे ॥ पृथ्वीवरील भूप ॥ दिसती त्या मशक सम ॥८॥
ऐसे मल्लदुर्जन ॥ व्यासी कोण करी मर्दन ॥ सांबा तुज आलों शरण ॥ दीनवत्सल म्हणोनियां ॥९॥
ऐसे ऐकोन द्विजबोली ॥ क्रोधें कडोन जटा आपटिली ॥ तेथें महामारी जाहली ॥ भयानक रुप जिचें ॥१०॥
भयानक दाढा दिर्घ जिव्हा ॥ पुढें कर जोडोनि उभी जेव्हां ॥ ती सर्व चंद्रचूडसभा तेव्हां ॥ भयभीत जाहली ॥१३॥
मग द्विज मिळोनि समस्त ॥ तीवरी सिंपिंलें घृत ॥ म्हणोनि घृतमारी तियेतें ॥ नाम आलें असे ॥२२॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१३॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां शिवविज्ञापनो नाम सप्तमोऽध्याय गोड हा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : December 11, 2023
TOP