मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय| अध्याय दहावा श्री मल्हारी मार्तंड विजय नमो मार्तंड अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा मार्तंडभैरवाष्टक खंडेरायाची आरती ध्यान श्लोक प्रभावी मंत्र श्री मल्हारी कवच भूपाळी भंडारमंत्र आणि अभंग गोंधळ म्हाळसा बाणांची आरती मल्हारी मार्तंड विजय - अध्याय दहावा श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय. Tags : khandobamalharimarathipothiखंडोबापोथीमराठीमल्हारी अध्याय दहावा Translation - भाषांतर ॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ सप्तकोटि गण घे घे म्हणोन ॥ दैत्यसेना वेष्टिली जाण ॥ सिंहनाद गर्जनेकडून ॥ आकाश समग्र कोंदिलें ॥१॥गजास गज भिडती ॥ गंडस्थलें रक्तें बुडतीं ॥ बार्णावरी बाण सोडिती ॥ रुधिर पूर वाहतसे ॥२॥शस्त्रास शस्त्र लागोन ॥ वन्हीज्वाळा उठती जाण ॥ दळाचे धुळीं कडोन ॥ आकाश समग्र झांकिले ॥३॥असिलतें सीर छेदिती ॥ मुद्गल मुसळें ताडिती ॥ चक्रांकुष प्राण घेती ॥ रणीं कबंध नाचूं लागे ॥४॥गजांची शीरें उडोन ॥ मेदिनीवरी पडती जाण ॥ तेणेंचि दळ होय चूर्ण ॥ रथ रथासि भिडती ॥५॥एकाचे केश एकाचे हाती ॥ हृदयावरी लाथ मारिती ॥ मूर्च्छा येवोनि पडती ॥ सांवरोनि पुन्हां झुंजे ॥६॥देवसैन्य जें मेलें ॥ तें उठोनि झुंजूं लागलें ॥ सुरवरें पुष्पवर्षाव केले ॥ जयजयकारें करोनि ॥७॥इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥८॥श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लसैन्ययुधवर्णनो नाम दशमोऽध्याय गोड हा ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP