मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मल्हारी मार्तंड विजय|

मल्हारी मार्तंड विजय - खंडेरायाची आरती

श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.


जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकीं दुसरें कैलासशिखर ।
नानापरिंची रचना रचिली अपार ।
तये स्थळीं नांदे स्वामी शंकर ॥१॥
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारि तूंचि प्रचंडा ॥ध्रु॥
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ॥
त्रिभुवनीं त्यानें प्रळय मांडीला ॥
नाटोपे कोणास वरें मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला । जय ॥२॥
चंपाषष्ठी दिवशीं अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणीं पृष्ठी खड्गे वर्मी स्थापीसी ।
अंती वर देऊनि त्यां मुक्तीतें देसी । जय ॥३॥
मणिमल्लदैत्य मर्दुनि मल्लारि ।
देवां संकट पडतां राहे जेजुरीं ।
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाव मागे दास नरहरी । जय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP